प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस सर्वात महत्त्वाची ठरते ती म्हणजे आवश्यक प्रमाणपत्रांची जमवाजमव! विद्यार्थ्यांला ज्या विद्याशाखेला प्रवेश घ्यायचा आहे, त्यानुसार आवश्यक ठरणारे दाखले अथवा प्रमाणपत्रे प्राप्त करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करायला हवी. त्याविषयी..
बारावी आणि JEE-MAIN किंवा सीईटीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची-पालकांची अर्ज भरण्याची लगबग सुरू होते. प्रवेशअर्ज भरताना आयत्यावेळेस होणारी धावपळ टाळणे शक्य आहे. मात्र त्यासाठी पूर्वतयारी आवश्यक आहे. ती केल्यास  शांतपणे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते आणि घाईगडबडीत होणाऱ्या बऱ्याच चुका टाळता येतात. आता सर्व अर्ज yash4ऑनलाइन भरावे लागतात. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रियाही सोपी होते.
प्रवेशप्रक्रियेसाठी काही प्रमाणपत्रे व दाखले आधीच प्राप्त करून ठेवणे आवश्यक आहे. हे दाखले अत्यावश्यक आहेत, हे माहीत असूनही अनेक पालक त्या प्रक्रियेबाबत चालढकल करतात. त्यामुळे प्रवेशाच्यावेळी वेगवेगळ्या समस्या अनपेक्षितपणे समोर उभ्या ठाकू शकतात. यामुळे मुलाचा प्रवेश धोक्यात येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन प्रवेशाचा अर्ज भरताना आवश्यक ठरणाऱ्या प्रमाणपत्रांची आणि दाखल्यांची जुळवाजुळव आतापासूनच करून ठेवायला हवी.
प्रवेशासाठी राखीव जागांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे/पालकांकडे जात प्रमाणपत्र असते. पण जात पडताळणी प्रमाणपत्र नसते. हे अत्यंत आवश्यक  प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास प्रवेश, शुल्क, शिष्यवृत्ती आदींवर विपरीत परिणाम होऊ शकतो. सहा महिन्यांपूर्वीच शासनाने जाहीर सूचनेद्वारे जात पडताळणी प्रमाणपत्रांची कार्यवाही पूर्ण करून ठेवावी असे आवाहन केले आहे. अद्यापही, ज्या पालकांनी याबाबत हालचाल केली नसेल त्यांनी या कामास प्राधान्य द्यायला हवं. हे प्रमाणपत्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, व्हीजे/डीटी (एनटी-ए, एनटी-बी, एनटी-सी, एनटी-डी) आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सादर करावं लागतं.
व्हीजे /डीटी (एनटी-ए, एनटी-बी, एनटी-सी, एनटी-डी), स्पेशल बॅकवर्ड क्लास आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश आणि शुल्क सवलतीसाठी नॉन क्रिमी लेअरची गरज भासते. सध्या सहा लाखाच्या उत्पन्नाच्या मर्यादेत हे प्रमाण दिलं जातं. हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे. यासाठी मागील तीन वर्षांचं एकूण उत्पन्न (फॉर्म नंबर १० मध्ये दर्शवलेलं) ग्राह्य धरलं जातं. १ एप्रिलपासून हे प्रमाणपत्र पुढील मार्च महिन्यापर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहतं. (या वर्षांच्या शैक्षणिक सत्रासाठी देण्यात येणारे हे प्रमाणपत्र ३१ मार्च २०१६ पर्यंत ग्राह्य धरले जाईल.) काही ठिकाणी दोन वर्षांसाठीही हे प्रमाणपत्र दिलं जातं. केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठीसुद्धा हे प्रमाणपत्र आवश्यक ठरतं.
शिकवणी शुल्क सवलत योजना
अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच टक्के जागा या आíथकदृष्टय़ा कमकुवत गटासाठी राखीव असतात. या जागा ‘टय़ुशन फी व्हेवर स्कीम’द्वारे भरल्या जातात. यासाठी स्वतंत्ररीत्या गुणवत्ता यादी तयार केली जाते. या योजनेचा फायदा ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना घ्यायचा असेल त्यांनी अर्ज करताना या योजनेचा पर्याय नमूद करणे आवश्यक आहे. या जागा सामायिक प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेऱ्यांमध्ये भरल्या जातात. कोणत्याही जातीतील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी या राखीव जागेसाठी अर्ज करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचं उत्पन्न वार्षकि साडेचार लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येतो. त्यामुळे अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या आíथक उत्पन्नाचा दाखला तयार ठेवणं आवश्यक ठरतं.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रवेशासाठी इतर प्रमाणपत्रांसोबत अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाइल प्रमाणपत्रही मागतात. हे प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून मिळतं. त्याची प्रक्रिया आधीपासूनच करून ठेवायला हवी. अद्याप दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यास प्रवेशाच्या वेळेस धावपळ होणार नाही. मनस्तापही टळेल. अपंग कोटय़ातून अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विशिष्ट अपंगत्वाचं सुयोग्य अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र प्राप्त करून ठेवणं आवश्यक आहे.
प्रवेशप्रक्रियेच्या वेळेस अदर दॅन होम युनिव्हर्सटिी कोटा याअंतर्गत काही जागा भरल्या जातात. उदा- गोंडवाना विद्यापीठाचे विद्यार्थी हे अमरावती, मुंबई वा पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी या कोटय़ाअंतर्गत अर्ज भरू शकतात. खएए-टअकठ पेपर एकमधील गुणांवर आधारित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) ने तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील १५ टक्के जागा अखिल भारतीय कोटय़ामधून भरल्या जातात.
इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेतील
३० टक्के जागा अशा प्रकारे भरल्या जातात. या जागा खुल्या प्रवर्गातील मानल्या जातात. या जागांना राखीव प्रवर्ग लागू केला जात नाही.

महत्त्वाची प्रमाणपत्रे/ दाखले पुढीलप्रमाणे-
 ही मूळ प्रमाणपत्रे आणि त्यांच्या छायांकित आणि स्वाक्षरांकित प्रती तयार ठेवाव्यात.
=    दहावी आणि बारावीच्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (बोर्डाच्या) गुणपत्रिका
=    खएए-टअकठ पेपर एकची गुणपत्रिका
=    शाळा /महाविद्यालय सोडल्याचा दाखला
=    जन्मदाखला
=    भारतीयत्वाचे प्रमाणपत्र
=    दहावी अथवा बारावी बोर्डाचे प्रमाणपत्र
=    जात प्रमाणपत्र
=    जात पडताळणी प्रमाणपत्र
=    उत्पन्नाचा दाखला

नया है यह!
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल इंजिनीअिरग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट अर्हता- कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी पदवी आणि (अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन क्लिनिकल इंजिनीअिरग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट (अर्हता-कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी पदविका)- हे अभ्यासक्रम भारत सरकारचा उपक्रम असलेल्या एएचएलएल लाइफ केअर लिमिटेड या संस्थेने सुरू केले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी एक वर्ष. पत्ता- एचएलएल लाईफ केअर लिमिटेड, एचएलएल अ‍ॅकॅडेमी, टीसी २४/६०६, तेनरा-२२, थायकौड, त्रिवेंद्रम, केरळ- ६९५०१४,
वेबसाइट-www.hllacademy.in
ईमेल- hllacademy@lifecarehell.com

 

Story img Loader