द चार्टर्ड अकौन्टन्ट्स ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या सी.ए. अभ्यासक्रमाची आणि हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असलेल्या करिअर संधींचा परिचय-

कोणत्याही लहान-मोठय़ा व्यवसायाच्या यशात चार्टर्ड अकौंटन्सी म्हणजेच सनदी लेखापालांचा मोठा हातभार लागतो. कंपनीच्या लेखा परीक्षण, करनिर्धारण आणि वित्तीय नियोजनात सनदी लेखापाल महत्त्वाची भूमिका बजावतो. हे क्षेत्र आव्हानात्मक असले तरी त्यात व्यक्तिगत प्रगतीच्या संधी
अमाप आहेत.
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड लक्षात घेता दरवर्षी सात ते आठ हजार सीएंची गरज भासणार आहे. दरवर्षी त्यात १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थेत आणि व्यापार- व्यवसायाच्या पद्धतींमध्ये होणारे बदल लक्षात घेता त्याअनुषंगाने कराव्या लागणाऱ्या वित्तीय व्यवस्थापनासाठी सीएंच्या ज्ञान-कौशल्यांचा उपयोग होतो. बदलत्या आíथक परिस्थितीशी  सुसंगत राहिल्याने हा अभ्यासक्रम जागतिक पातळीवरही मान्यताप्राप्त आहे.
अनुभवी सीए हे प्रकल्प व्यवस्थापक, निधी व्यवस्थापक, कॉर्पोरेट हाऊसेससाठी गुंतवणूक व्यवस्थापक आणि निर्णय प्रक्रियेतले सल्लागार आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. सीएंना खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँका, सार्वजनिक कंपन्या, लेखा परीक्षण कंपन्या, वित्तीय कंपन्या, म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट हाऊसेस, स्टॉक ब्रोकिंग कंपन्या, विधीविषयक कामकाज करणाऱ्या कंपन्या, पेटंट फम्र्स, ट्रेड मार्क आणि कॉपीराइट रजिस्ट्रार या ठिकाणी करिअरच्या विविध संधी मिळू शकतात.
कंपन्या आणि उद्योगांचे विविध प्रकारे वित्तीय व्यवस्थापकीय परीक्षण, विश्लेषण, कर निर्धारण, कंपनीची पुनर्रचना, कंपनीची खरेदी-विक्री, नव्या कंपनीला वित्तीय पुरवठा, कंपन्यांचे व्यवस्थापन आणि प्रशासनाचे प्रभावी नियंत्रण, नफ्याच्या चढ-उताराचे संनियंत्रण आदी बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका सनदी लेखापाल बजावतात.
सी.ए. अभ्यासक्रम ‘द चार्टर्ड अकौन्टन्ट्स ऑफ इंडिया’ या संस्थेच्या वतीने चालविण्यात येतो. या अभ्यासक्रमात सुरुवातीपासूनच सैद्धान्तिक आणि प्रात्यक्षिक ज्ञानावर समान भर देण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दोहोंचा पाया भक्कम होतो.
या अभ्यासक्रमाचे टप्पे :
*    कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट (सीपीटी) : हा प्रारंभिक टप्पा असून यात अकौिन्टग, र्मकटाइल लॉज, जनरल इकॉनॉमिक्स आणि क्वान्टिटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड यांची चाचणी घेतली जाते.
*    इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स (आयपीसीसी):
    या टप्प्यात चार्टर्ड अकौन्टन्सी अभ्यासक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होते. यामध्ये लेखाविषयक मुख्य विषयांचा समावेश करण्यात येतो. या टप्प्यातले विषय दोन गटांत विभाजित करण्यात येतात. हे विषय परीक्षेनुसार विद्यार्थी निवडू शकतात किंवा दोन्ही गटांतील विषयांचा एकाच वेळी अभ्यास करू शकतात. या टप्प्यात बिझनेस कम्युनिकेशन, बिझनेस स्ट्रॅटेजीज, टॅक्सेस, इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी आणि ऑडिट यांचे मूलभूत ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते.
*    सीए फायनल : या टप्प्यात फायनान्शियल रिपोìटग, स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट, अ‍ॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट अकौंटिंग, अ‍ॅडव्हान्स्ड ऑडिटिंग, प्रोफेशनल एथिक्स, इन्र्फमेशन सिस्टीम्स कंट्रोल अ‍ॅण्ड ऑडिट, ई-गव्‍‌र्हनन्स, कॉर्पोरेट अ‍ॅण्ड अलाइड लॉज, इंटरनॅशनल टॅक्सेशन, व्हॅट आदी बाबींचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो.
*    आर्टकिलशिप : इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स (आयपीसीसी) गट एक- हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी अनुभवी चार्टर्ड अकौन्टंटकडे आर्टकिलशिपसाठी नाव नोंदणी करावी लागते. या चार्टर्ड अकौन्टंटला किमान १६ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. हे प्रत्यक्ष प्रशिक्षण असून या कालावधीत विषयाच्या तांत्रिक बाजू शिकून त्यात निपुणता संपादन करता येते.
या कालावधीत विद्यावेतनसुद्धा दिले जाते.
    चार्टर्ड अकौन्टन्सीचा अभ्यासक्रम हा अतिशय स्पर्धात्मक व आव्हानात्मक असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची मानसिक तयारी इयत्ता दहावीपासूनच केल्यास उत्तम. बारावीमध्ये असताना अथवा उत्तीर्ण झाल्यावर प्रारंभिक टप्प्याच्या प्रवेशासाठी विद्यार्थी संस्थेकडे नाव नोंदवू शकतात. कोणत्याही शाखेतील बारावीचे विद्यार्थी या टप्प्यासाठी नाव नोंदवू शकत असले तरी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करताना एक पाऊल पुढे राहता येते. विज्ञान आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांनी अकौन्टन्सी आणि विविध व्यवस्थापकीय घटकांच्या अभ्यासात प्रावीण्य मिळवण्यासाठी परिश्रम घेतले तर तेसुद्धा हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करू शकतात. चार्टर्ड अकौन्टन्सी हा महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असूनही अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय तसेच फॅशन डिझायिनग यांसारख्या अभ्यासक्रमांच्या तुलनेत याचे शुल्क अल्प आहे. कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट (सीपीटी)ची फी ६,७०० रुपये आहे तर इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स (आयपीसीसी)ची फी ९००० रुपये आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम सुरू करण्याआधी ‘आयसीएआय’चे सदस्यत्व घ्यावे लागते.
    विद्यार्थ्यांनी संस्थेकडे कॉमन प्रोफिशियन्सी टेस्टसाठी नावनोंदणी केल्यानंतर ६० दिवसांनंतर येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थी बसू शकतो. विद्यार्थ्यांनी एप्रिल/ऑक्टोबरमध्ये नावनोंदणी केल्यास ते जून/डिसेंबरमध्ये होणाऱ्या कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट (सीपीटी)ला बसू शकतात.
    ही परीक्षा वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची
२०० गुणांची परीक्षा आहे. याला निगेटिव्ह माìकग आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्सला प्रवेश मिळू शकतो. याशिवाय नावनोंदणी केल्यापासून ३५ तासांचा ओरिएन्टेशन अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करावा लागतो. इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्सला/ अकौंटिंग टेक्निशियन परीक्षेला बसण्याआधी १०० तासांचे माहिती तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.
*    संस्थेचे पत्ते-
    =    बोर्ड ऑफ स्टडीज, द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकौन्टंटस् ऑफ इंडिया, आयसीआयए भवन, ए-२९,
सेक्टर ६२, नॉयडा- २०१३०९.
        ईमेल- bosnoida@icai.org
        वेबसाइट- http://www.icai.org
    =    वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ आयसीएआय, आयसीआयए भवन- २७ कफ परेड, कुलाबा,
        मुंबई- ४०००५. wro@icai.org
        वेबसाइट- http://www.wirc-icai.org

नया है यह!
पोस्ट ग्रॅज्यूएट प्रोग्रॅम इन कॅपिटल मार्केट्स-
हा अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स या संस्थेने सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. प्रवेशासाठीCAT/
GMAT या परीक्षेतील गुण किंवा या संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेशपरीक्षेतील गुण ग्राह्य़ धरले जातात.
पत्ता- पीजीपीएसएम, अ‍ॅडमिशन ऑफिस, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स, एनआयएसएम भवन, प्लॉट नंबर- ८२, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई- ४००७०३. वेबसाइट- http://www.nism.ac.in
सुरेश वांदिले -ekank@hotmail.com

Story img Loader