छायाचित्रणात गती आणि आवड असल्यास या छंदाचे रूपांतर करिअरमध्ये करता येणे शक्य आहे. छायाचित्रण क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची आणि त्यातील करिअर संधींची ओळख-
छायाचित्रण कलेची आवड आणि हटके काम करण्याची ऊर्मी असल्यास या क्षेत्रात उत्तम करिअर करता येऊ शकते. या क्षेत्रात पूर्णवेळ काम करायचे असेल तर छायाचित्रणाचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करायला हवे. छायाचित्रणाच्या स्वतंत्र शाखा विकसित होत असून यातील प्रत्येक शाखेचे बलस्थान आणि त्यासाठी आवश्यक ठरणारे कौशल्य वेगळे असते. आज छायाचित्रणाचे आणि त्यातही वैशिष्टय़पूर्ण शाखेचे छायाचित्रण शिकण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
करिअर संधी
वृत्तपत्रांचे छायाचित्रकार किंवा छायाचित्र पत्रकार (फोटो जर्नालिस्ट), फॅशन छायाचित्रण, पोटर्र्ेट छायाचित्रण, लग्नसोहळा चित्रित करणारे छायाचित्रकार, औद्योगिक छायाचित्रण, वन्यजीव छायाचित्रण, विषयानुरूप (फीचर) छायाचित्रण, फोरेन्सिक छायाचित्रण, ललित कला छायाचित्रण, मुक्त छायाचित्रण, विज्ञान छायाचित्रण, क्रीडा छायाचित्रण. या शिवाय इंटिरिअर फोटोग्राफी, अन्नपदार्थ फोटोग्राफी, ज्वेलरी अॅण्ड वॉचेस फोटोग्राफी अशा क्षेत्रांतही स्पेशलायझेशन करता येते.
शिक्षणसंस्था
* जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स- या संस्थेत अॅप्रेंटिस कोर्स इन फोटोग्राफी हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- एक वर्ष (अंशकालीन). या संस्थेतील दोन वष्रे कालावधीच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फाइन आर्ट्स या अभ्यासक्रमात फोटोग्राफीचे शिक्षण दिले जाते. चार वष्रे कालावधीच्या
बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स या अभ्यासक्रमांतर्गत फोटोग्राफी या विषयामध्ये स्पेशलायझेशन करता येते. पत्ता- द रजिस्ट्रार, सर जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्ट, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१. वेबसाइट- jjiaa.org
* फग्र्युसन महाविद्यालय- या संस्थेत बी.एस्सी. इन फोटोग्राफी अॅण्ड ऑडिओ व्हिज्युअल प्रॉडक्शन हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कालावधी- ३ वष्रे. अर्हता- बारावी. पत्ता- प्राचार्य, फग्र्युसन कॉलेज, पुणे- ४११००४. principal@fergussion.edu.
* सिम्बॉयसिस स्कूल ऑफ फोटोग्राफी- या संस्थेत तीन वष्रे कालावधीचा बॅचलर ऑफ आर्ट्स इन व्हिज्युअल आर्ट्स अॅण्ड फोटोग्राफी हा अभ्यासक्रम करता येतो. अर्हताको णत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. पत्ता- सिम्बॉयसिस स्कूल ऑफ फोटोग्राफी, सिम्बॉयसिस
इंटरनॅशनल युनिव्हर्सटिी नॉलेज व्हिलेज, पोस्ट लव्हाळे, ता- मुळशी, पुणे- ४१२११५. वेबसाइट- http://www.ssp.ac.in ईमेल-enquiry@ssp.ac.in
* स्कूल ऑफ फोटोग्राफी, भारती विद्यापीठ – या संस्थेत पुढील अभ्यासक्रम करता येतात –
* डिप्लोमा इन फोटोग्राफी अॅण्ड डिजिटल इमॅजिनका लावधी- दोन वष्रे. या अभ्यासक्रमांतर्गत फॅशन फोटोग्राफी आणि अॅडव्हर्टायजिंग अॅण्ड कमí यल फोटोग्राफी या दोन विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.
* डिप्लोमा कोर्स इन फोटोजर्नालिझम. कालावधी- दोन वष्रे.
* प्रमाणपत्र अभ्यासक्रम- या संस्थेने वेिडग अॅण्ड इव्हेन्ट फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम, पोटर्र्ेट अॅण्ड फॅशन फोटोग्राफी, वाइल्ड अॅण्ड ट्रॅव्हल फोटोग्राफी, स्पोर्ट्स फोटोग्राफी या क्षेत्रांमध्ये अल्प मुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत. पत्ता- भारती विद्यापीठ कॅम्पस, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे- ४११०४६.
ईमेल- photography@bharatividyapeeth.edu.
वेबसाइट- http://www.photography.bharatividyapeeth.edu
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफी- या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
* डिप्लोमा इन फॅशन फोटोग्राफी. कालावधी- सहा महिने.
* डिप्लोमा इन टेबलटॉप फोटोग्राफी. कालावधी- पाच महिने. दागिने, काचेच्या वस्तू, स्टीलची भांडी, अन्नपदार्थ यांची छायाचित्रे काढण्यासाठी विशिष्ट प्रकारचे तंत्रकौशल्य अवगत करणे आवश्यक असते. ते या अभ्यासक्रमात शिकवले जाते.
* वेिडग अॅण्ड इव्हेन्ट फोटोग्राफी- कालावधी- सहा महिने. पत्ता- १/२, घामट टेरेस, दुसरा मजला, दादर (पश्चिम) मध्य पूल. ईमेल- info@focusnip.com
वेबसाइट- http://www.focusnip.com
* पर्ल अॅकेडमी- या संस्थेने प्रोफेशनल फोटोग्राफी कोर्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. हा
अभ्यासक्रम केल्यावर फॅशन फोटोग्राफर, फोटो जर्नलिस्ट, स्टील लाइफ फोटोग्राफर, वाइल्ड लाइफ फोटोग्राफी अॅण्ड
डॉक्युमेंट्री आदी करिअरच्या संधी मिळू शकतात. पत्ता- एस.एम. सेंटर, अंधेरी-कुर्ला रोड, मरोळ स्टेशनच्या बाजूला, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००५९.
वेबसाइट- pearlacademy.com
* झेवियर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन- या संस्थेमार्फत फोटोग्राफी विषयावरील १० सत्रांचा अल्प मुदतीचा प्रमाणपत्र
अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पत्ता- सेंट झेवियर कॉलेज, मुंबई- ४००००१.
ईमेल- bano@xaviercomm.org
वेबसाइट- http://www.xaviercomm.org
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी- या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ फॅशन कम्युनिकेशनने सर्टििफकेट कोर्स इन फॅशन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- चार महिने. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. पत्ता- एनआयएफटी कॅम्पस, प्लॉट क्रमांक१५,
सेक्टर- ४, खारघर, नवी मुंबई- ४१०२१०.
ईमेल- nift.mumbai@nift.ac.in
वेबसाइट- nift.ac.in
* जे. डी. इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी- या संस्थेने फॅशन फोटोग्राफी हा तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम
सुरू केला आहे. पत्ता- जे. डी. हेमू आर्केड, विलेपाल्रे स्टेशनच्या विरुद्ध दिशेला, मुंबई- ४०००५६.
http://www.ies.edu/managment ekank@hotmail.com
नया है यह!
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फार्मा अॅण्ड हेल्थ केअर मॅनेजमेंट-
हा अभ्यासक्रम इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजमेंट कॉलेज अॅण्ड रिसर्च सेंटरने सुरू केला आहे.
कालावधी- दोन वष्रे.
अर्हता- बी.फार्म किंवा बी.एस्सी (जीवशास्त्र, रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान किंवा बी.ई. बायोमेडिकल/ बायोटेक्नॉलॉजी)
पत्ता- विश्वकर्मा, एम. डी. लोटलीकर विद्यासंकुल,
७९१, एस.के. मार्ग, वांद्रे रेक्लमेशन, मुंबई- ४०००५०.
वेबसाइट- http://www.ies.edu/managment