छायाचित्रणात गती आणि आवड असल्यास या छंदाचे रूपांतर करिअरमध्ये करता येणे शक्य आहे. छायाचित्रण क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची आणि त्यातील करिअर संधींची ओळख-
छायाचित्रण कलेची आवड आणि हटके काम करण्याची ऊर्मी असल्यास या क्षेत्रात उत्तम करिअर करता येऊ शकते. या क्षेत्रात पूर्णवेळ काम करायचे असेल तर छायाचित्रणाचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करायला हवे. छायाचित्रणाच्या स्वतंत्र शाखा विकसित होत असून यातील प्रत्येक शाखेचे बलस्थान आणि त्यासाठी आवश्यक ठरणारे कौशल्य वेगळे असते. आज छायाचित्रणाचे आणि त्यातही वैशिष्टय़पूर्ण शाखेचे छायाचित्रण शिकण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
करिअर संधी
वृत्तपत्रांचे छायाचित्रकार किंवा छायाचित्र पत्रकार (फोटो जर्नालिस्ट), फॅशन छायाचित्रण, पोटर्र्ेट छायाचित्रण, लग्नसोहळा चित्रित करणारे छायाचित्रकार, औद्योगिक छायाचित्रण, वन्यजीव छायाचित्रण, विषयानुरूप (फीचर) छायाचित्रण, फोरेन्सिक छायाचित्रण, ललित कला छायाचित्रण, मुक्त छायाचित्रण, विज्ञान छायाचित्रण, क्रीडा छायाचित्रण. या शिवाय इंटिरिअर फोटोग्राफी, अन्नपदार्थ फोटोग्राफी, ज्वेलरी अॅण्ड वॉचेस फोटोग्राफी अशा क्षेत्रांतही स्पेशलायझेशन करता येते.
शिक्षणसंस्था
* जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स- या संस्थेत अॅप्रेंटिस कोर्स इन फोटोग्राफी हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- एक वर्ष (अंशकालीन). या संस्थेतील दोन वष्रे कालावधीच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फाइन आर्ट्स या अभ्यासक्रमात फोटोग्राफीचे शिक्षण दिले जाते. चार वष्रे कालावधीच्या
बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स या अभ्यासक्रमांतर्गत फोटोग्राफी या विषयामध्ये स्पेशलायझेशन करता येते. पत्ता- द रजिस्ट्रार, सर जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्ट, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१. वेबसाइट- jjiaa.org
* फग्र्युसन महाविद्यालय- या संस्थेत बी.एस्सी. इन फोटोग्राफी अॅण्ड ऑडिओ व्हिज्युअल प्रॉडक्शन हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कालावधी- ३ वष्रे. अर्हता- बारावी. पत्ता- प्राचार्य, फग्र्युसन कॉलेज, पुणे- ४११००४. principal@fergussion.edu.
छायाचित्रणातील संधी
छायाचित्रणात गती आणि आवड असल्यास या छंदाचे रूपांतर करिअरमध्ये करता येणे शक्य आहे. छायाचित्रण क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची आणि त्यातील करिअर संधींची ओळख-
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-05-2015 at 03:40 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta marg yashacha 30 may