हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट क्षेत्राचा वाढता
विस्तार लक्षात घेत विविध शिक्षणसंस्थांनी हॉटेल मॅनेजमेन्ट, केटरिंग टेक्नॉलॉजी, हॉस्पिटॅलिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यासारखे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन
केंद्र सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी ही संस्था आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत बॅचलर ऑफ सायन्स इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम चालवला जातो.
हा अभ्यासक्रम सहा सत्रांत विभाजित करण्यात आला आहे. हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रातील सर्व प्रकारच्या पर्यवेक्षीय जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना दिले जाते. या अभ्यासक्रमात प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थी फूड प्रॉडक्शन, फूड अ‍ॅण्ड बिव्हरेजेस सíव्हस यामध्ये कौशल्य प्राप्त करू शकतो. या अभ्यासक्रमात फ्रंट ऑफिस ऑपरेशन, हाऊसकीिपग, हॉटेल अकाउंटन्सी, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता दर्जा नियंत्रण, मनुष्यबळ विकास, वित्तीय व्यवस्थापन, सुविधा व्यवस्थापन, व्यूहात्मक व्यवस्थापन, पर्यटन व्यवस्थापन, पर्यटन विपणन आदी बाबींचेही प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या उद्योगासाठी लागणारे परिपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांला मिळू शकते.
करिअर संधी : हा अभ्यासक्रम केल्यानंतर हॉटेल आणि तत्सम व्यवसायामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून करिअरची सुरुवात होऊ शकते. याशिवाय किचन मॅनेजमेंट किंवा हाऊसकीिपग मॅनेजमेंट या क्षेत्रात संधी मिळू शकते. विमान कंपन्यांमधील फ्लाइट किचन किंवा ऑन बोर्ड किचनमध्ये कामाचा पर्याय उपलब्ध होतो. भारतीय नौदलाच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी ही पदवी घेतलेल्या उमेदवारांची निवड होऊ शकते. हॉटेल आणि इतर सेवा क्षेत्रातील गेस्ट/ कस्टमर रिलेशन अधिकारी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फूड चेनमध्ये मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी किंवा एक्झिक्युटिव्ह, रुग्णालये आणि मोठय़ा संस्थांमधील भोजनगृहे, हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटिरग महाविद्यालयातील अध्यापक, हॉटेल आणि इतर सेवा क्षेत्रांत मार्केटिंग आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह, राज्य पर्यटन मंडळ, रिसॉर्ट मॅनेजमेंट, स्वयंरोजगार अशा विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. उमेदवाराची आवड आणि कौशल्य लक्षात घेऊन पंचतारांकित हॉटेल्समध्ये फ्रंट ऑफिस, फूड प्रॉडक्शन, हाऊसकीिपग, फूड अ‍ॅण्ड बिव्हरेजेस सíव्हस या क्षेत्रांतही संधी मिळू शकते.
प्रवेश प्रक्रिया : बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयाच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यात येते. २०१५-१६ सालातील शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश परीक्षा २५ एप्रिल २०१५ रोजी झाली. मे २०१५ च्या दुसऱ्या आठवडय़ात निकाल घोषित केला जाईल. २० जुल २०१५ पासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा प्रारंभ होणार आहे.
या परीक्षेद्वारे तीन वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांसाठी प्रवेश दिला जातो. या परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील २१ सेंट्रल इन्स्टिटय़ूट हॉटेल मॅनेजमेंट आणि राज्य सरकारांच्या अखत्यारीत असलेल्या १६ स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, ९ फूड क्राफ्ट इन्स्टिटय़ूट आणि १४ खासगी संस्था अशा ७,४८२ जागा भरल्या जातात. १५ टक्के जागा अनुसूचित जाती आणि ७.६ टक्के जागा अनुसूचित जमाती आणि ३ टक्के जागा अपंग संवर्गासाठी राखीव आहेत. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील संस्थांमध्ये इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, वीर सावरकर मार्ग, दादर पश्चिम, मुंबई- ४०००२८ या संस्थेचा समावेश आहे.
अर्हता : या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मात्र, प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी बारावीला इंग्रजी विषय घेतलेला असावा. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा २२ वर्षे. अनुसूचित जाती-जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे.
परीक्षेचे स्वरूप : सामायिक प्रवेश चाचणी देशभरातील
२७ शहरांमध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा मेच्या पहिल्या आठवडय़ात घेतली जाते. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद, अहमदाबाद, भोपाळ, रायपूर या शहरांचा समावेश आहे. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असतो. या परीक्षेचा पेपर बहुपर्यायी पद्धतीचा असतो. यामध्ये न्यूमरिकल एबिलिटी/ सायंटिफिक अ‍ॅप्टिटय़ूड, रिझिनग अ‍ॅण्ड लॉजिकल डिडक्शन, जनरल नॉलेज अ‍ॅण्ड करंट इव्हेण्ट्स या तीन विषयांवर प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न विचारले जातात. इंग्रजी विषयावर ६० गुणांचे प्रश्न विचारले जातात. अ‍ॅप्टिटय़ूड फॉर सíव्हस सेक्टर या विषयावर ५० गुणांचे प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी १ गुण मिळतो. चार चुकीच्या उत्तरांसाठी १ गुण वजा केला जातो.
शिष्यवृत्ती: या संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती दिली जाते. अखिल भारतीय स्तरावरची ही शिष्यवृत्ती प्रत्येक सत्रातील गुणांवर आधारित पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना दिली जाते. संस्थेत प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. पत्ता : नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी, ए- ३४, सेक्टर-६२, नॉयडा- २०१३०९. वेबसाइट- http://www.nchmct.nic.in
ई-मेल- jeenchm@gmail.com
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी :
डॉ. वाय.एस.आर. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ही संस्था केंद्र सरकार आणि आंध्र सरकार यांच्या साहाय्याने स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेत सुरू करण्यात आलेले अभ्यासक्रम-
= बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी- कालावधी तीन वर्षे.
= बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी- कालावधी चार वर्षे.
दोन्ही अभ्यासक्रम हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सटिीशी संलग्न आहे. हे अभ्यासक्रम
१ सप्टेंबर रोजी सुरू होतील. या अभ्यासक्रमाला प्रवेश परीक्षा व मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो. लेखी प्रवेश परीक्षा ५० गुणांची असते. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेतील बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या परीक्षेत खुल्या संवर्गातील उमेदवारांनी ५० टक्के आणि अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. वयोमर्यादा २२ वर्षे. राखीव संवर्गासाठी
२५ वर्षे. पत्ता- डॉ. वाय.एस.आर. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, टेलेकॉम नगर, हैदराबाद-
आंध्र प्रदेश- ५०००३२. वेबसाइट-  http://www.nithm.ac.in
नया है यह!
सर्टििफकेट कोर्स इन ऑटोमोटिव्ह इंजिनीअिरग
अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसीस-
हा अभ्यासक्रम टीव्हीएस- आयआयटी मद्रास फिनििशग स्कूल या संस्थेने सुरू केला आहे. अर्हता- बीई/ बीटेक इन मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाइल किंवा एरोनॉटिकल. कालावधी- ९ महिने.
वेबसाइट- http://www.tvsiitfisinishingschool.com,
ई-मेल- tvsiit_fs@tvslvs.com.
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com