अध्यापनाच्या क्षेत्रात नवी पिढी घडविण्याची संधी आणि समाधान तर मिळतेच, त्याचबरोबर उत्तम वेतन आणि मानही मिळतो. अध्यापन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या अभ्यासक्रमांविषयी..
शिक्षण क्षेत्राचा विस्तार आज झपाटय़ाने होत आहे. मोठय़ा शहरांप्रमाणेच आता निमशहरी भागांत तसेच ग्रामीण भागांतही विविध अभ्यासक्रमांच्या शाळा, विविध विद्याशाखा असलेली महाविद्यालये, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, वेगवेगळ्या प्रकारचे शिकवणी वर्ग सुरू होत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे भारतात येत आहेत. अशा वेळेस नजिकच्या भविष्यकाळात अध्यापकांची मोठी गरज भासणार हे
सुस्पष्ट आहे.
गेल्या काही वर्षांत शिक्षक-प्राध्यापकांना उत्तम वेतन मिळू लागले आहे. नवी पिढी घडवायची उत्तम संधी अध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना मिळते आणि आजही आपल्या समाजात अध्यापन हे मानाचे करिअर मानले जाते. अध्यापनाच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी बारावीनंतरच घेणे उचित ठरते.
शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शिकवणी वर्ग यांच्यासमवेत स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षक होण्याच्याही अनेक संधी आज उपलब्ध आहेत. सध्या आयआयटी, एमबीबीएस, राज्य आणि केंद्र सरकारच्या नागरी सेवा, लष्करी सेवा, कर्मचारी निवड आयोग, बँक सेवा याकरता विविध स्पर्धा परीक्षा होतात. अशा प्रकारचे शिक्षण देणाऱ्या काही मोठय़ा शिकवणी वर्गामध्ये उच्चशिक्षितांना शिकवता येईल किंवा स्वत:चे शिकवणी वर्गही सुरू करता येतील.
अध्यापन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी बारावीनंतरचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते पुढीलप्रमाणे –
* नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रीसर्च अॅण्ड
ट्रेिनग : या संस्थेमार्फत अध्यापक प्रशिक्षणाचे वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या संस्थेत महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या राज्यांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. या संस्थेमार्फत चालविण्यात येणारे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
= बॅचलर ऑफ सायन्स अॅण्ड बॅचलर ऑफ एज्युकेशन (बीएस्सी-बीएड) :
कालावधी चार वष्रे. अर्हता- बारावी विज्ञान शाखेमध्ये खुल्या संवर्गातील उमेदवारांना ५० टक्के गुण. (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण.) ज्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र गटात प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा अभ्यास केलेला असावा. ज्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र गटात प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला असावा.
= बॅचलर ऑफ आर्टस् अॅण्ड बॅचलर ऑफ एज्युकेशन (बीए-बीएड) :
कालावधी चार वष्रे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण शाखेतील विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. बारावी परीक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण. (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण)
= बॅचलर ऑफ एज्युकेशन (बीएड) :
कालावधी- दोन वर्षे. अर्हता- ५० टक्के गुणांसह बीए किंवा बीएस्सी विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी गुणांमध्ये पाच टक्के सवलत. बीएस्सी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि गणित यांपकी कोणत्याही दोन विषयांचा अभ्यास केलेला असावा. बीए पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी िहदी, गुजराथी, मराठी, इंग्रजी आणि उर्दू यांपकी कोणत्याही एका भाषेतील साहित्याचा आणि इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र यांपकी कोणत्याही एका विषयाचा अभ्यास केलेला असावा.
= मास्टर ऑफ एज्युकेशन (एम.एड.) :
कालावधी एक वर्ष. अर्हता- ५५ टक्के गुणांसह विज्ञान, मानव्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि ५० टक्के गुणांसह बी.एड.
शिष्यवृत्ती : या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या खुल्या गटातील २० टक्के विद्यार्थ्यांना तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सामान्य गटातील उमेदवारांसाठी प्रत्येक सत्रासाठी शुल्क ३ हजार रुपये आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या संवर्गातील उमेदवारांना शुल्कमाफी आहे.
निवड प्रक्रिया : बारावी/ पदवी/ पदव्युत्तर पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादीनुसार विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. प्रत्येक राज्यासाठी जागा राखीव असतात.
पत्ता- प्रिन्सिपल, रीजनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन, श्यामला हिल, भोपाळ – ४६२०१३.
वेबसाइट- http://www.riebhopal.org
* रीजनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन, म्हैसूर-
या संस्थेने मास्टर ऑफ सायन्स अॅण्ड बॅचलर ऑफ एज्युकेशन (एमएस्सी-बीएड) हा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी सहा वष्रे.
हा अभ्यासक्रम पुढील तीन विषयांमध्ये करता येतो-
१) एमएस्सी- बीएड इन फिजिक्स २) एमएस्सी- बीएड इन केमिस्ट्री ३) एमएस्सी- बीएड इन मॅथमॅटिक्स.
अर्हता- बारावी विज्ञान शाखेत ४५ टक्के गुण. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणांमध्ये पाच टक्के सवलत. अभ्यासक्रमांना बारावी परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो.
पत्ता- रीजनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन, म्हैसूर.
वेबसाइट- http://www.riemysore.ac.in
ईमेल- riemysore@rediffmail.com
* डॉ. हरिसिंघ गौर विश्वविद्यालय-
या सेंट्रल युनिव्हर्सटिीमार्फत बीएस्सी-बीएड आणि बीए-बीएड हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
कालावधी- प्रत्येकी चार वष्रे.
अर्हता- ५० टक्के गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना ४५ टक्के गुण. प्रवेशासाठी परीक्षा द्यावी लागते. परीक्षेसाठी महाराष्ट्रात पुणे आणि नागपूर ही केंद्रे आहेत. पत्ता- द चेअरमन, प्रवेश कक्ष, डॉ. हरिसिंघ गौर विश्वविद्यालय, सागर- ४७०००३
मध्य प्रदेश. वेबसाइट- http://www.dhsgsu.ac.in
ईमेल- admissiondhsgsu@gmail.com
नया है यह!
एमटेक इन नॅनोमेडिकल सायन्स-
हा अभ्यासक्रम अम्रिता विश्वविद्यापीठाने सुरू केला आहे. कालावधी- दोन वषे. अर्हता- भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जैवतंत्रज्ञान/ जैवमाहितीशास्त्र/ प्राणीशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बायोमेडिकलमधील बीटेक किंवा बीई किंवा एमबीबीएस/ बीडीएस/ बीफार्म प्रवेशासाठी चाचणी परीक्षा घेतली जाते. पत्ता- द डायरेक्टर, अम्रिता सेंटर फॉर नॅनोसायन्सेस, एमटेक अॅडमिशन्स, अम्रिता विश्वविद्यापीठम, एआयएमएस- पानेक्करा, पोस्ट ऑफिस कोची- ६८२०४१, केरळ.
ईमेल- researchsecretary@amrita.edu
वेबसाइट- http://www.amrita.edu
सुरेश वांदिले -ekank@hotmail.com