कॉर्पोरेट तसेच व्यक्तिगत स्तरावर वित्तीय नियोजनाची गरज वाढत असल्याने साहजिकच फायनान्शियल प्लानर अथवा फायनान्शियल मॅनेजमेन्ट या क्षेत्रांना चांगलीच मागणी आली आहे. या विषयक अभ्यासक्रमांची ओळख-
बारावीनंतर वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. वित्तीय आकडेमोड आणि उपलब्ध निधीचे व्यवस्थापन उत्तमरीत्या करण्याचे कौशल्य या विद्याशाखेत शिकवले जाते. या शाखेचा एक भाग समजल्या जाणाऱ्या फायनान्शियल मार्केट मॅनेजमेंट अथवा फायनान्शियल प्लॅिनग या विषयाला सध्या चांगलीच मागणी आहे.
व्यक्तिगत आणि आणि संस्थात्मक उत्पन्न जसजसे वाढत आहे तशी वित्तीय नियोजनकारांची अथवा वित्तीय व्यवस्थापकांची गरजही वाढत चालली आहे. आज मात्र, उपलब्ध पशाला शास्त्रशुद्धरीत्या गुंतवले तर त्यातून संपत्तीनिर्मिती करता येते, हे सर्वसामान्यांना पटू लागले आहे. यासाठी वित्तीय नियोजनकार मदत करतात. यासंबंधी मोठय़ा प्रमाणावर जाणीवजागृती होत आहे. विविध बँका, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज यांच्या वतीने वित्तीय नियोजनाचे महत्त्व विशद करणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन नियमितपणे केले जाते. यामुळे वित्तीय नियोजनाकडे लोकांचा कल वाढू लागला आहे आणि अर्थातच वित्तीय नियोजनकार या करिअरलाही उठाव आला आहे.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इन्स्टिटय़ूट लिमिटेड या संस्थेने पुढील काही अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
* मास्टर ऑफ फायनान्स- हा अभ्यासक्रम फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फायनान्स अॅण्ड मॅनेजमेंट या संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात कॅपिटल मार्केट, रिस्क मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट फायनान्स या विषयांवर भर दिला जातो. साधारणत: २१ महिन्यांत हा अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. उमेदवारांच्या सोयीनुसार प्रत्येक आठवडय़ात तीन दिवसांचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. या अभ्यासक्रमाचा प्रारंभ ३१ ऑगस्ट २०१५ रोजी होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१५ आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. प्रवेशासाठी GMAT, TOEFLचे गुण ग्राह्य धरले जातात. त्याखेरीज मुलाखतीमध्ये यशस्वी होणे आवश्यक आहे.
* मास्टर ऑफ इंटरनॅशनल फायनान्स- हा अभ्यासक्रम ऑस्ट्रेलियातील डिएॅकिन युनिव्हर्सटिीच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात अप्लाइड कॉर्पोरेट फायनान्स, इकॉनॉमिक्स ऑफ मॅनेजर, फायनान्शियल मार्केट या तीन बाबींवर प्रमुख भर दिला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. प्रवेशासाठी मुलाखती घेतल्या जातात. उत्तम इंग्रजी संवादकौशल्य असल्यास प्राधान्य मिळू शकते. वर्षांतून मार्च/ जुल/ सप्टेंबर अशा तीन वेळेस प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रम सुरू होण्याच्या एक महिन्याआधी प्रवेश प्रकिया सुरू होते.
* मास्टर ऑफ अॅप्लाइड फायनान्स- हा अभ्यासक्रम ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटि ऑफ वेस्टर्न सिडनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात फायनान्शियल इन्स्टिटय़ूट्स अॅण्ड मार्केट्स, इंटरनॅशनल फायनान्स, डेरिव्हेटिव्हज, सिक्युरिटी अॅनालिसिस अॅण्ड पोर्टफोलिओ या बाबींवर प्रमुख भर दिला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी- २७ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. प्रवेशासाठी मुलाखत घेतली जाते. उत्तम इंग्रजी संवादकौशल्य असल्यास अग्रक्रम दिला जातो. वर्षांतून जुल/ सप्टेंबर अशा दोन वेळेस प्रवेश प्रकिया होत असून त्यानंतर महिन्याभरात अभ्यासक्रमाला सुरुवात होते.
* पोस्ट गॅ्रज्युएट प्रोग्रॅम इन ग्लोबल फायनान्शियल मार्केट्स- अभ्यासक्रमाचा कालावधी- २४ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. प्रवेशासाठी CAT/ MAT/ MH-CET/ C-MAT चे गुण ग्राह्य धरले जातात. निवडक विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. उत्तम इंग्रजी संवादकौशल्य असणाऱ्यांना प्राधान्य मिळू मिळते.
* ग्लोबल फायनान्शियल मार्केट्स प्रोफेशन प्रोग्रॅम- अभ्यासक्रमाचा कालावधी- चार सत्रे. अर्हता- बारावी किंवा कोणत्याही विषयातील पदवी. प्रवेशासाठी CAT/ MAT/ MH-CET/ C-MATचे गुण ग्राह्य धरले जातात. निवडक विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. उत्तम इंग्रजी संवादकौशल्य असल्यास प्राधान्य मिळू शकते. या अभ्यासक्रमात प्रोफेशनल ट्रेडर, कस्टमर सíव्हस मॅनेजर अॅण्ड बँकिंग स्पेशॅलिस्ट, बँकिंग सेंटर सुपरवायझर, इन्व्हेस्टमेंट बँकिंग असोसिएट, डेटाबेस अॅनालिस्ट, इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्ट, इन्व्हेस्टमेंट बँकर, रिस्क मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर, फायनान्शियल अॅडव्हायजर, रिस्क अॅण्ड इन्शुरन्स मॅनेजर, क्रेडिट मॅनेजर आदी विषयांवर भर देण्यात येतो.
* अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम ऑन स्टॉक मार्केट- या अभ्यासक्रमात फायनान्शियल प्लॅिनग (इन्शुरन्स/ इन्व्हेस्टमेन्ट/ रिटायरमेंट/ टॅक्स/ इस्टेट), फंडामेंटल अॅनालिसिस, फायनान्शियल स्टेटमेंट अॅनालिसिस आदी विषयांवर भर दिला जातो.
पत्ता- बीएसई इन्स्टिटय़ूट लिमिटेड, १८वा मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई- ४००००१.
वेबसाइट- http://www.bseindia.com
ईमेल- training@bseindia.com
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्शियल मार्केट प्रॅक्टिस- हा अभ्यासक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. पत्ता- स्कूल ऑफ मॅनेजमेंट
स्टडीज, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटि,
नवी दिल्ली- ११००६८.
ईमेल- soms@ignou.ac.in
वेबसाइट- http://www.ignou.ac.in
* मास्टर ऑफ फायनान्स अॅण्ड कंट्रोल- हा अभ्यासक्रम युनिव्हर्सटिी ऑफ दिल्लीच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल स्टडीजने सुरू केला आहे. कालावधी- दोन वष्रे. अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी. हा अभ्यासक्रम केल्यावर फायनान्शियल कन्सिल्टग, कॉर्पोरेट फायनान्स, रिअल इस्टेट अॅण्ड कमॉडिटी मार्केट, इक्विटी रिसर्च, वेल्थ मॅनेजमेंट आदी क्षेत्रांत करिअर करण्याची संधी मिळू शकते. CAT मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडक उमदेवारांची यादी तयार केली जाते. त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. पत्ता- बेनिटो जौरेझ रोड,
नवी दिल्ली- ११००२१.
वेबसाइट- http://www.mfc.edu
ईमेल- admissions@mfc.edu
वित्तीय नियोजनकार व्हा!
कॉर्पोरेट तसेच व्यक्तिगत स्तरावर वित्तीय नियोजनाची गरज वाढत असल्याने साहजिकच फायनान्शियल प्लानर अथवा फायनान्शियल मॅनेजमेन्ट या क्षेत्रांना चांगलीच मागणी आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-05-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta marg yashacha 8 may