मानव संसाधन विकासासाठी कार्यरत संस्था
मानव संसाधन व विकास हा पेपर-३ मधील पहिल्या विभागाचा  महत्त्वाचा घटक आहे. आज आपण मानव संसाधन विकासासाठी कार्यरत असणाऱ्या शासकीय व निमशासकीय संस्थांचा अभ्यास करूयात.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद
(NCERT):   
‘एनसीईआरटी’ची स्थापना ‘रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी अ‍ॅक्ट’च्या अंतर्गत एक सोसायटी म्हणून ६ जून १९६१ साली झाली. एनसीईआरटी स्थापनेची घोषणा केंद्र सरकारने २७ जुल १९६१ साली केली.
रचना : अध्यक्ष केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री, सदस्य- विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, चार विभागातील विद्यापीठांपकी चार विद्यापीठांचे कुलगुरू, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, केंद्रीय मानव संसाधन खात्याचे सचिव इत्यादी.
कार्य :
=    शालेय शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन देणे.
=    विविध शासकीय, निम शासकीय व स्वयंसेवी संस्थांना शिक्षणविषयक कामांमध्ये विस्तार सेवा पुरवणे.
=    शिक्षणविषयक माहिती, ज्ञानाचा प्रसार करणे.
=    शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे.
=    शिक्षणासंदर्भात पुस्तके, नियतकालिके तसेच विविध साहित्याचे प्रकाशन करणे.
उपसंस्था :
= पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था, भोपाळ. ही संस्था व्यावसायिक व कार्यानुभव शिक्षणामध्ये संशोधन, प्रशिक्षण विकास व विस्तार कार्यक्रम राबवते.
=    राष्ट्रीय शिक्षण संस्था, दिल्ली : ही ‘एनसीईआरटी’ची  प्रमुख संस्था आहे. या संस्थेअंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत. उदा. शालान्तपूर्व व प्राथमिक शिक्षण विभाग, विज्ञान व गणित शिक्षण विभाग, शिक्षणाविषयक मूल्यमापन विभाग, संगणक शिक्षण व तांत्रिक साधने विभाग इत्यादी.
=    केंद्रीय शिक्षण तंत्रज्ञान संस्था, दिल्ली : शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमे उदा. रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट इत्यादींच्या साहाय्याने शिक्षण प्रचार व प्रसार करणे. या संस्थेने महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओरिसा व उत्तर प्रदेश अशा सहा राज्यांमध्ये शिक्षण तंत्रज्ञान संस्था स्थापन केलेल्या आहेत. या संस्थेमार्फत केंद्रीय चित्रपट ग्रंथालय चालवले जाते तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या साह्याने हा उपक्रम राबवला जातो.
प्रकाशने : प्रकाशनासाठी ‘एनसीईआरटी’ची अलाहाबाद, कोलकाता, बंगळुरु येथे तीन प्रादेशिक प्रकाशन केंद्रे आहेत. साहित्य प्रामुख्याने इंग्रजी, िहदी व उर्दू भाषेतून प्रकाशित केले जाते. याशिवाय द सायन्स टीचर,  द प्रायमरी टीचर, जर्नल ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन यांचे प्रकाशन ‘एनसीईआरटी’तर्फे प्रकाशित केले जाते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) :
२० सप्टेंबर १९८५ रोजी या विद्यापीठाची स्थापना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते करण्यात आली.
उद्दिष्टे :
=    शिक्षणाच्या संधी अधिकाधिक लोकापर्यंत पोहचवणे.
=    भारतीय शिक्षण पद्धतीत मुक्त शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन देणे.
=    रोजगार निर्मितीसाठी पूरक पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करणे.
=    समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण, कौशल्य विकास, अद्ययावत ज्ञान व प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे.
या विद्यापीठांशी असणाऱ्या संलग्न संस्था :
=    जागतिक आरोग्य संघटना
=    नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड
केटिरग टेक्नॉलॉजी
=    कॉमनवेल्थ ऑफ लìनग
=    इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इत्यादी.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com