= खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) पहिल्या गोलमेज परिषदेनंतर इंग्रज सरकारने काँग्रेससोबत तडजोड करण्याचे ठरवले, त्या वेळी भारताचा व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्वनि व महात्मा गांधी यांच्यात ५ मार्च १९३१ रोजी एक करार झाला.
२) दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित नव्हते.
३) १९३२ मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड अॅटली यांनी जातीय निवाडा जाहीर केला.
१) फक्त १ बरोबर २) फक्त २ बरोबर
३) फक्त ३ बरोबर ४) सर्व बरोबर
= १९१६ मधील राष्ट्रसभेच्या … अधिवेशनात जहाल आणि मवाळ यांच्यात तडजोड झाली.
१) मुंबई २) लखनौ ३) लाहोर ४) सुरत
= खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) सन १९३८ मध्ये हरीपुरा येथील काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषवले.
२) सन १९३९ च्या त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद सुभाषचंद्र बोस यांनी भूषवले.
३) काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनात ८ ऑगस्ट १९४२ रोजी ‘चले जाव’ हा ठराव संमत करण्यात आला.
४) भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष आचार्य कृपलानी होते.
५) क्रिप्स मिशनने भारताला वसाहतीचा दर्जा देण्याची
ग्वाही दिली.
६) तात्या टोपे यांना आद्यक्रांतिकारक म्हणून संबोधले जाते.
७) टोकियो येथील कॅथी हॉलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या हंगामी सरकारची घोषणा केली.
१) १,२,३,४,५ बरोबर २) २,३,४,५,६,७ बरोबर
३) २,३,४,५ बरोबर ४) सर्व बरोबर
= खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) इंडिया हाऊसच्या अनंत कान्हेरे यांनी कर्झन वायलीचा खून केला.
२) खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी मुजफ्फर येथील किंग्ज फोर्ड यांच्या वधाचा प्रयत्न केला, जो
अपयशी ठरला.
३) काकोरी कटात चंद्रशेखर आझाद, राजेंद्रनाथ लाहिरी, रामप्रसाद बिस्मील यांचा समावेश होता.
४) काकोरी कटात रामप्रसाद बिस्मील, रोशनसिंग, राजेंद्रनाथ लाहिरी तसेच अश्फाकउल्ला यांना फाशीची शिक्षा झाली. ते फाशीवर जाणारे पहिले मुस्लीम क्रांतिकारक होते.
१) २ व ३ बरोबर २) फक्त २ बरोबर
३) २, ३ व ४ बरोबर ४) सर्व बरोबर
= खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) १९०९ च्या मोल्रे-िमटो सुधारणा कायद्यान्वये केंद्रीय कायदे मंडळातील सभासद संख्या ६८ करण्यात आली. या ६८ सदस्यांपकी ३२ सभासद हे निवडून
आलेले होते.
२) १९०९ च्या सुधारणा कायद्यान्वये सभासदांना प्रश्न विचारण्याचा, अंदाजपत्रकांवर चर्चा करण्याचा अधिकार देण्यात येणार होता. सभासदांना ठराव मांडण्याचाही अधिकार होता. हा संमत झालेला ठराव सरकारवर बंधनकारक असणार होता.
३) १९०९ च्या सुधारणा कायद्यान्वये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.
१) १ व ३ बरोबर २) फक्त २ बरोबर
३) २ व ३ बरोबर ४) सर्व बरोबर
= १९१९ च्या माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यात खालीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) या कायद्यानुसार द्विदल राज्यपद्धतीचा पुरस्कार करण्यात आला.
२) भारतमंत्र्याचे वेतन इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायचे ठरले.
३) १९१९ च्या कायद्याची रूपरेषा ठरवण्यात आली. त्या वेळी माँटेग्यू हे भारतमंत्री होते, तर लॉर्ड चेम्सफोर्ड व्हॉइसरॉय होते.
४) १९१९ च्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे केंद्रीय मंडळाच्या कनिष्ठ सभागृहाला ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह’ असे म्हटले जाई.
डॉ. जी. आर. पाटील – grpatil2020@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा