यूएन रेड : (UN-REDD- R-Reduced, E-Emmissions, D-Deforestration and D-Degradation of forest)
वातावरणात कार्बन डायऑक्साईड एका ठरावीक पातळीत राहणे आवश्यक असते. वातावरणातील बऱ्याचशा कार्बन डायऑक्साईडचे शोषण वनांमार्फत होत असते. मात्र, जंगलतोडीमुळे कार्बन साठय़ांमध्ये वाढ झाली आहे. यालाच वनतोड व वनांच्या अवनतीमुळे होणारे उत्सर्जन असे संबोधले जाते. ‘रेड’ ही अशी व्यवस्था आहे, ज्याद्वारे विकसनशील देशांना वनांचे संरक्षण, त्यांचे व्यवस्थापन यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या प्रक्रियेत विकसनशील देशांना वनांचे संरक्षण करण्यासाठी विकसित देशांकडून काही आíथक मदतही दिली जाते. ‘रेड’ हा कार्यक्रम सध्या बदलून आता त्याचे स्वरूप सुधारित ‘रेड प्लस’ असे झाले आहे.
दलदलीय परिसंस्था (Wetlands):
दलदलीय परिसंस्थेत विविध वनस्पती वृक्ष आणि जलीय प्राण्याचा अधिवास असतो. या परिसंस्थांची उत्पादकताही अधिक असते. स्थलांतर करणाऱ्या बहुतांश प्रजाती दलदलीय परिसंस्थेवर अवलंबून असतात. दलदलीय परिसंस्थेत असणारी अन्नाची उपलब्धता, वनस्पतींचे आच्छादन आणि जमिनीवरील भक्षकांपासून मिळणारे संरक्षण यामुळे ही ठिकाणे म्हणजे पाणपक्ष्यांसाठी उत्तम निवासस्थान आहे. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे या परिसंस्थांची अतोनात हानी होत आहे. अनेक परिसंस्था नष्ट होत आहेत. म्हणूनच जैवविविधता संपन्न या परिसंस्थांचे सवंर्धन करणे
आवश्यक आहे.
रामसर करार :
हा करार दलदलीय परिसंस्थांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी करण्यात आला. इराणमधील रामसर येथे २ फेब्रु. १९७१ मध्ये हा आंतरराष्ट्रीय करार म्हणून स्वीकारण्यात येऊन १९७५ पासून हा करार अमलात आला.
भारतातील रामसर क्षेत्र :
अष्टामुडी (केरळ), चिल्का सरोवर (ओडिशा), ओकेरा (जम्मू काश्मिर), कोलेरू सरोवर (आंध्र प्रदेश), रेणुका (हिमाचल प्रदेश), रोपर (पंजाब), सांभर सरोवर (राजस्थान), त्सो मोरारी (जम्मू काश्मीर), वुलार सरोवर (जम्मू काश्मीर), भरतकणिका खारफुटीची वने (ओडिसा), हरिके (पंजाब), लोकटक सरोवर (मणिपूर), पोंग धरण सरोवर (हिमाचल प्रदेश), वेंबनाड- कोल (केरळ) इत्यादी. रामसर यादीत समाविष्ट असलेल्या क्षेत्रांपकी वेंबनाड- कोल (केरळ) हे सर्वात मोठे तर रेणुका (हिमाचल प्रदेश) सर्वात लहान असे दलदलीचे क्षेत्र आहे.
माँट्रिक्स नोंदी :
रामसर यादीचा एक भाग म्हणून माँट्रिक्स नोंदी राखल्या जातात. माँट्रिक्स नोंदीमध्ये मानवी हस्तक्षेपामुळे किंवा प्रदूषणामुळे परिस्थितीकीय स्वरूपामध्ये जे बदल झालेले आहेत किंवा नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे, अशा दलदलीय परिसंस्थांचा या नोंदीमध्ये समावेश केला जातो.
धोक्यात आलेले वन्यप्राणी व वनस्पती प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित करार (Convention on International Trade in Endangered species of wild fauna and flora-CITES):
हा करार प्राणी व वनस्पती याबाबत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित आहे. हा करार प्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जीवप्रजाती धोक्यात तर येत नाही याची
ग्वाही देतो.
स्थलांतरण करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या संवधर्नासंबंधित करार (बॉन करार) :
स्थलांतरित होणाऱ्या वन्य प्राणी संरक्षणासंबंधित हा करार आहे. या करारात सदस्य राष्ट्र धोक्यात आलेल्या स्थलांतरित प्रजाती आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असतात.
एमपीएससी : पर्यावरणशास्त्र (1)
वातावरणात कार्बन डायऑक्साईड एका ठरावीक पातळीत राहणे आवश्यक असते. वातावरणातील बऱ्याचशा कार्बन डायऑक्साईडचे शोषण वनांमार्फत होत असते.
First published on: 29-03-2015 at 05:13 IST
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta mpsc guidence