दूरसंवेदन- भाग २
दूरसंवेदनाचे प्रकार  
अ) साधनांवर अवलंबून असलेले प्रकार :
=    हवाई वाहक जनित दूरसंवेदन (Air Borne) : यात प्रामुख्याने दूरसंवेदनासाठी विमानांचा व हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. पूर्वी त्यासाठी बलूनचा वापर केला जात असे.
=    उपग्रह जनित दूरसंवेदन (Space Borne) : यात प्रामुख्याने उपग्रहांचा विशेषत: दूरसंवेदन उपग्रहांचा वापर केला जातो. यातून डिजिटल प्रकारच्या प्रतिमा प्राप्त होतात.
ब) पद्धतींवर अवलंबून असलेले प्रकार :
=    क्रियाशील दूरसंवेदन : क्रियाशील दूरसंवेदनात जी साधने वापरली जातात, ती स्वत: ऊर्जानिर्मिती करतात. त्याचा मारा करून परत आलेल्या ऊर्जेच्या साहाय्याने प्रतिमा निर्माण होतात. रडार हे त्याचे एकमेव उदाहरण मानता येईल.
=    निष्क्रिय दूरसंवेदन : यात पदार्थापासून उत्सर्जति झालेल्या ऊर्जेचा वापर करून प्रतिमा निर्माण केल्या जातात.
क) संवेदकावर आधारित प्रकार :
=    छायाचित्रण दूरसंवेदन : यात दृक्प्रकाशाचा वापर करून छायाचित्रे काढली जातात, त्याला प्रकाशीय (Optical)  किंवा छायाचित्रण (Photographic) दूरसंवेदन असेही म्हटले जाते.
=    अवरक्त तरंग दूरसंवेदन : या प्रकारात साध्या प्रकाशाऐवजी अवरक्त तरंगाचा Infrared)  वापर करून चित्रण केले जाते.
हवाई छायाचित्रण (Aerial Photography)
mpu02जेव्हा पृथ्वीच्या कोणत्याही भागाचे सर्वेक्षण कॅमेऱ्याच्या साहाय्याने फोटो घेऊन केले जाते तेव्हा त्याला छायामिती  (Photogrammetry) असे म्हणतात. याचे दोन प्रकार पडतात-
=    भूछायाचित्रण : जेव्हा कॅमेऱ्याच्या साहाय्याने पृथ्वीच्या एखाद्या ठिकाणाहून छायाचित्रे घेतली जातात, तेव्हा त्यास भूछायाचित्रण असे म्हणतात.
=    जेव्हा विमानातून कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे घेतली जातात तेव्हा त्याला हवाई छायाचित्रण असे म्हणतात.
mpu01हवाई छायाचित्रणासाठी वापरले जाणारे कॅमेरे व फिल्म्स : हवाई छायाचित्रणासाठी विमानात विशिष्ट प्रकारचे कॅमेरे बसवलेले असतात. विमानाचा वेग जास्त असल्यामुळे कॅमेरे वेगवेगळय़ा प्रकारचे असतात. या कॅमेऱ्यात अतिजलदतेने उघडझाप करणारी झडप असते. वेगाने छायाचित्रण घेणारी िभगे असतात. जलदपणे परिणाम होणारी अतिसंवेदक फिल्म असते. या विशिष्ट प्रकारच्या कॅमेऱ्यात जास्तीत जास्त छायाचित्रे सामावून घेणारे कप्पे असतात. छायाचित्रांची स्पष्टता कॅमेऱ्यांवर अवलंबून असते.  कॅमेऱ्यातील नाभी अंतर कमी असते, त्या प्रकारच्या कॅमेऱ्याला ‘वाइड अँगल कॅमेरा’ असे म्हणतात. या कॅमेऱ्याकडून छायाचित्रणासाठी अधिक प्रमाणात क्षेत्र व्याप्त केले जाते. त्यामुळे त्या क्षेत्रातील भूवैशिष्टय़े स्पष्टपणे छायांकित होत नाही.  कॅमेऱ्यातील नाभी अंतर जास्त असणाऱ्या कॅमेऱ्याला ‘नॅरो अँगल कॅमेरा’ असे म्हणतात. अशा प्रकारच्या कॅमेऱ्याकडून छायाचित्रणासाठी कमी प्रमाणात क्षेत्र व्यापले जाते. यामध्ये प्राप्त झालेल्या छायाचित्रांची स्पष्टता अधिक असून लहान भूवैशिष्टय़ेसुद्धा स्पष्टपणे छायांकित होतात.
कॅमेऱ्याचे प्रकार :
=    फ्रेिमग कॅमेरा :  हवाई छायाचित्रणासाठी सामान्यपणे छायाचित्रात दाखवल्यानुसार प्रकारचा कॅमेरा वापरला जातो. फ्रेमद्वारे छायाचित्र घेतले जात असल्याने याला फ्रेिमग कॅमेरा म्हणतात.
=    पॅनोरॅमिक कॅमेरा : या कॅमेऱ्यातील िभग स्थिर नसते, त्यामुळे हवाईचित्रणासाठी या प्रकारच्या कॅमेऱ्याचा फारसा उपयोग करीत नाहीत.
=    स्टीप कॅमेरा : या प्रकारच्या कॅमेऱ्यात िभग स्थिर स्वरूपाचे असते, परंतु फिल्म मात्र सतत फिरती असते. त्यामुळे सलगपणे छायाचित्रे घेता येतात. यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नसल्याने चांगल्या प्रतीची छायाचित्रे मिळतात.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com

ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा