दूरसंवेदन- भाग २
दूरसंवेदनाचे प्रकार
अ) साधनांवर अवलंबून असलेले प्रकार :
= हवाई वाहक जनित दूरसंवेदन (Air Borne) : यात प्रामुख्याने दूरसंवेदनासाठी विमानांचा व हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. पूर्वी त्यासाठी बलूनचा वापर केला जात असे.
= उपग्रह जनित दूरसंवेदन (Space Borne) : यात प्रामुख्याने उपग्रहांचा विशेषत: दूरसंवेदन उपग्रहांचा वापर केला जातो. यातून डिजिटल प्रकारच्या प्रतिमा प्राप्त होतात.
ब) पद्धतींवर अवलंबून असलेले प्रकार :
= क्रियाशील दूरसंवेदन : क्रियाशील दूरसंवेदनात जी साधने वापरली जातात, ती स्वत: ऊर्जानिर्मिती करतात. त्याचा मारा करून परत आलेल्या ऊर्जेच्या साहाय्याने प्रतिमा निर्माण होतात. रडार हे त्याचे एकमेव उदाहरण मानता येईल.
= निष्क्रिय दूरसंवेदन : यात पदार्थापासून उत्सर्जति झालेल्या ऊर्जेचा वापर करून प्रतिमा निर्माण केल्या जातात.
क) संवेदकावर आधारित प्रकार :
= छायाचित्रण दूरसंवेदन : यात दृक्प्रकाशाचा वापर करून छायाचित्रे काढली जातात, त्याला प्रकाशीय (Optical) किंवा छायाचित्रण (Photographic) दूरसंवेदन असेही म्हटले जाते.
= अवरक्त तरंग दूरसंवेदन : या प्रकारात साध्या प्रकाशाऐवजी अवरक्त तरंगाचा Infrared) वापर करून चित्रण केले जाते.
हवाई छायाचित्रण (Aerial Photography)
= भूछायाचित्रण : जेव्हा कॅमेऱ्याच्या साहाय्याने पृथ्वीच्या एखाद्या ठिकाणाहून छायाचित्रे घेतली जातात, तेव्हा त्यास भूछायाचित्रण असे म्हणतात.
= जेव्हा विमानातून कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे घेतली जातात तेव्हा त्याला हवाई छायाचित्रण असे म्हणतात.
कॅमेऱ्याचे प्रकार :
= फ्रेिमग कॅमेरा : हवाई छायाचित्रणासाठी सामान्यपणे छायाचित्रात दाखवल्यानुसार प्रकारचा कॅमेरा वापरला जातो. फ्रेमद्वारे छायाचित्र घेतले जात असल्याने याला फ्रेिमग कॅमेरा म्हणतात.
= पॅनोरॅमिक कॅमेरा : या कॅमेऱ्यातील िभग स्थिर नसते, त्यामुळे हवाईचित्रणासाठी या प्रकारच्या कॅमेऱ्याचा फारसा उपयोग करीत नाहीत.
= स्टीप कॅमेरा : या प्रकारच्या कॅमेऱ्यात िभग स्थिर स्वरूपाचे असते, परंतु फिल्म मात्र सतत फिरती असते. त्यामुळे सलगपणे छायाचित्रे घेता येतात. यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नसल्याने चांगल्या प्रतीची छायाचित्रे मिळतात.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा