प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ठाण्याच्या गोखले मार्गावर पाहावयास ‘लोकसत्ता ठाणे फेस्टिव्हल’च्या बक्षीस वितरण सोहळ्याविषयी स्पर्धकांमध्ये असलेले कुतूहल रविवारीही दिसून आले. ‘एका लग्नाची..’तील आवडत्या ईशा म्हणजेच स्पृहा जोशीसोबत ग्राहकांनी बक्षिसांची लयलूट केली.
‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला २४ जानेवारीपासून मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली. महोत्सवात २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भाग्यवान सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिली आहे. या महोत्सवातील पहिल्या दिवसाचा बक्षीस समारंभ ठाण्यात संपन्न झाला. त्यावेळी स्पृहा जोशी यांच्यासह ‘वामन हरी पेठे सन्स’च्या संचालिका सोनाली पेठे आणि ‘लोकसत्ता’च्या जाहिरात विभागाचे महाव्यवस्थापक तरुणकुमार तिवाडी उपस्थित होते.
पहिल्या दिवसाच्या आठ भाग्यवान विजेत्यांना त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या ग्राहकांना स्पृहाच्या हस्ते बक्षीस स्वीकारणे हा सुखद धक्का ठरला. एखादा शॉपिंग फेस्टिव्हल म्हटला तर त्यामध्ये बक्षिसांचे वितरण आलेच. बक्षिसांचे मानकरी ठरलेल्या विजेत्यांमध्ये आनंद होताच, मात्र स्पृहाच्या हस्ते ती पदरात पडताच तो गगनात मावेनासा झाला.
हर्षोल्हसित झालेल्या विजेत्यांनी यावेळी स्पृहासोबत संवाद साधला आणि तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. गोखले मार्गावरील प्रमुख दुकानांमधून स्पर्धक विजेत्यांची भेट घेऊन स्पृहाने त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, २१ दिवसांच्या या महोत्सवात खरेदी करणाऱ्यांना दररोज वामन हरी पेठे सन्स (ठाणे) यांच्याकडून सोन्याची राजमुद्रा, चांदीची नाणी, कलानिधी-ठाणेतर्फे  पैठणी साडी, पॅपिलॉन डिजीटेक, ठाणेकडून मोबाईल संच, तसेच कलानिधी, ठाणे, वर्ल्ड ऑफ टायटन (कल्याण-डोंबिवली), रेमंड (डोंबिवली-कल्याण-उल्हासनगर), तसेच ऑरबिट-द मेन्स प्लॅनेट (कल्याण) यांच्याकडून गिफ्ट व्हाऊचर्स आणि ‘वीणा वल्र्ड (ठाणे-डोंबिवली) यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर देण्यात आले. तीन आठवडय़ांच्या या महोत्सवात दर आठवडय़ाला टी.व्ही., फ्रीज आणि ‘द ब्लू रूफ’ क्लबचे एक वर्षांचे सभासदत्व अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. शिवाय महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे दोन भाग्यवान ग्राहकांना कार व वीणा वर्ल्डकडून दोन व्यक्तींसाठी सिंगापूरची सहल अशी बंपर पारितोषिके दिली जाणार आहेत.
सहभागी कसे व्हाल..
ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांचा लाभ मिळू शकेल. बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे एक कुपन दिले जाईल. ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेल्या कूपन्स ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत. दररोज ड्रॉप बॉक्समधून कूपन्स संकलीत करून ठाणे लोकसत्ता कार्यालयात आणण्यात येणार आहेत. त्यातून दररोज भाग्यवान विजेत्याची निवड केली जाईल. प्रत्येक भाग्यवान विजेत्याची नावे ‘ठाणे वृत्तान्त’मधून प्रसिद्ध केली जातील. ‘लोकसत्ता’च्या खरेदी योजनेत उपरोक्त तीनही शहरांतील दुकानदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अतुल जोशी- ९८२१४७५९१९ आणि नीलिमा कुलकर्णी- ९७६९४००६८४ यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा