मरिन इंजिनीअिरगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या करिअरची सुरुवात प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून होते आणि तो झपाटय़ाने मुख्य अभियंता पदापर्यंत पोहोचू शकतो. नॉटिकल सायन्सचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवाराच्या करिअरची सुरुवात डेक कॅडेट म्हणून होते. हा विद्यार्थी गुणवत्ता, दर्जा, कौशल्य आणि परिश्रमाच्या बळावर सेंकड ऑफिसर, चीफ ऑफिसर अशी पदोन्नती मिळवत कॅप्टन पदापर्यंत झपाटय़ाने पोहोचू शकतो. चीफ मरिन इंजिनीअर आणि कॅप्टन या दोन्ही पदाला साधारणत: दरमहा तीन लाख रुपये वेतन मिळते.
इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिी :
= सामायिक प्रवेश चाचणी : या विद्यापीठाच्या पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी राष्ट्रीय स्तरावर सामायिक प्रवेश चाचणी (सीईटी) दरवर्षी जून महिन्यात घेतली जाते. याशिवाय एमबीए आणि एलएलएम (मेरिटाइम) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाते. सीईटीचा पेपर हा बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो. या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित निवडक विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाते. या विद्यार्थ्यांना समुपदेशनासाठी बोलावले जाते. सीईटी कॉम्प्युटरबेस्ड असते. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना तीन वेळा मॉक (अभिरूप) परीक्षा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. सीईटीसाठी राज्यातील केंद्रे आहेत- पुणे, नागपूर आणि मुंबई. यंदाची सीईटी ९ जून २०१५ रोजी होईल.
स्कूल ऑफ नॉटिकल स्टडीज- या संस्थेत नॉटिकल सायन्स आणि मेरिटाइम सायन्स या विषयात पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. जहाज वाहतूक संनियंत्रण करणाऱ्या तज्ज्ञ आणि कौशल्यप्राप्त उमेदवारांची निर्मिती या अभ्यासक्रमाद्वारे केली जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम संधी मिळाल्या आहेत.
= बी.एस्सी (नॉटिकल सायन्स)- हा अभ्यासक्रम चेन्नई, मुंबई, कोचीन, कांडला पोर्ट, कोलकाता या कॅम्पसमध्ये शिकवला जातो. अर्हता- बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ६० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्केगुण मिळायला हवेत. प्रतिवर्षी अभ्यासक्रमाची फी मुलांसाठी- २ लाख २० हजार रुपये, मुलींसाठी- १ लाख ४० हजार ५०० रुपये.
= बी.एस्सी (मेरिटाइम सायन्स)- हा अभ्यासक्रम मुंबई कॅम्पसमध्ये शिकवला जातो. अर्हता- बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने
६० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. प्रत्येक वर्षांला अभ्यासक्रमाची फी मुलांसाठी-
२ लाख २० हजार रु., मुलींसाठी- १ लाख ४० हजार ५०० रुपये. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी तीन वष्रे.
= डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स : डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स हा एक वर्ष अभ्यासक्रम मुंबई, चेन्नई आणि कोलकाता कॅम्पसमध्ये करता येतो. अर्हता- बारावी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांत किमान ६० टक्के गुण किंवा ५० टक्के गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बीएस्सी किंवा भौतिकशास्त्र या एक विषयासह बी.एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा बीई/ बी.टेक. या अभ्यासक्रमासाठी मुलांसाठी फी २ लाख २० हजार रुपये. मुलींसाठी फी
१ लाख ४० हजार रुपये.
स्कूल ऑफ मरीन इंजिनीअिरग- बीटेक- मरीन इंजिनीअिरग हा अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचा अभ्यासक्रम असून तो चेन्नई, कोलकाता, मुंबई या कॅम्पसमध्ये करता येतो. कालावधी- तीन वष्रे. फक्त अविवाहित उमेदवारच या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात.
प्रवेश : = कोलकाता कॅम्पस : बी.टेक- मरिन टेक्नॉलॉजी. प्रवेश जागा- २४६, बीएस्सी- नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ४०, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ८० विद्यार्थी. = मुंबई कॅम्पस : बीएस्सी- नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- १८५, बीएस्सी- मेरिटाइम सायन्स. प्रवेश जागा- ४०, बी.टेक- मरिन इंजिनीअिरग. प्रवेश जागा- ४०.
= चेन्नई कॅम्पस- बीएस्सी- नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ८०, बीएस्सी- मेरिटाइम सायन्स- प्रवेश जागा- ४०, बी.टेक- मरिन इंजिनीअिरग. प्रवेश जागा- ८०, बीएस्सी- मेरिटाइम सायन्स. प्रवेश जागा- ४०, बी.टेक- मरिन इंजिनीअिरग. प्रवेश जागा- ३०. = मुंबई आणि कोची कॅम्पस : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मरिन इंजिनीअिरग- कालावधी- एक वर्ष.
राखीव जागा : शासनाच्या नियमानुसार या अभ्यासक्रमांसाठी १५ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्गातील उमेदवारांसाठी, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी, २७ टक्के जागा इतर मागासवर्गीय संवर्गातील उमेदवारांसाठी, ३ टक्के जागा अपंग संवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवतात. या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेले विद्यार्थी वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त असणे आवश्यक आहेत. तंदुरुस्तीच्या व्याख्येसाठी संस्थेने काही मानके निश्चित केली आहेत. या संदर्भात काही तक्रारी असल्यास संस्थेच्या वैद्यकीय मंडळाकडे अपील करता येते. हे अपील फेटाळले गेल्यास प्रवेश नाकारला जातो. या विद्यापीठाशी राज्यातील पुढील संस्था संलग्न आहेत-
= बी.पी. मरिन अकॅडेमी, मुंबई = मेरिटाइम ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, मुंबई. = एमएमटीआयएस एज्युकेशन अॅण्ड रिसर्च ट्रस्ट, मुंबई. = समुद्र इन्स्टिटय़ूट ऑफ मेरिटाइम स्टडीज, मुंबई. = द ग्रेट ईस्टर्न इन्स्टिटय़ूट ऑफ मेरिटाइम स्टडीज, मुंबई. = तोलानी मेरिटाइम इन्स्टिटय़ूट, पुणे.
= ट्रेिनगशिप रहमान, मुंबई. = विश्वकर्मा मेरिटाइम इन्स्टिटय़ूट, पुणे. = याक एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई. पत्ता- इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिी, इस्ट कोस्ट रोड, उत्थंडी, चेन्नई- ६००११९. वेबसाइट- http://www.imu.edu.in
अॅकॅडेमी ऑफ मेरिटाइम एज्युकेशन अॅण्ड ट्रेिनग : बी.एस्सी- नॉटिकल सायन्स, बी.ई.- मरिन इंजिनीअिरग, बी.ई.- इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग- मरिन हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांना संस्थेच्या स्वतंत्र चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. पत्ता- एएमईटी, युनिव्हर्सटिी, १३५, ईस्ट कोस्ट रोड, कांथूर- ६०३११२. वेबसाइट- http://www.ametuniv.in
ई-मेल- office@ametuniv.ac.in
महाराष्ट्र अॅकॅडेमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अॅण्ड ट्रेिनग: या संस्थेमध्ये बी.टेक- मरिन इंजिनीअिरग, बी.एस्सी- नॉटिकल सायन्स हे अभ्यासक्रम करता येतात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. पत्ता- लोणी काळभोर, पुणे- ४१२२०१.
वेबसाइट- http://www.ametuniv.in
ईमेल- office@ametuniv.ac.in
नया है यह!
सर्टििफकेट कोर्स इन इलेक्ट्रॉनिक पॅकेजिंग अॅण्ड इंडस्ट्रियल डिझाइन- हा अभ्यासक्रम सी-डॅक संस्थेने सुरू केला आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी या विभागांतर्गत कार्यरत आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा आठवडे. अर्हता- ५५ टक्के गुणांसह बी.ई/बीटेक- इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग. पत्ता- सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, अमीरपेठ, हैदराबाद- ५०००१६.
वेबसाइट- http://www.manetpune.edu.in
ईमेल-admissions@manetpune.edu.in
-सुरेश वांदिले – ekank@hotmail.com