आर्थिक व सामाजिक विकास :
अभ्यासक्रमात भारतीय अर्थव्यवस्थेऐवजी आíथक व सामाजिक विकास हा शब्द वापरला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो. हा घटक परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. अभ्यास करताना सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या काही संकल्पना समजावून घ्याव्यात.
जुन्या अभ्यासक्रमात असलेल्या पंचवार्षकि योजना, बँक प्रणाली, आयात-निर्यात धोरण, कर प्रणाली, विविध आंतरराष्ट्रीय संघटना उदा. जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, दारिद्रय़निर्मूलन, रोजगार निर्मिती यांचाही अभ्यास करावा.
 याशिवाय वरील अभ्यासाची सांगड शाश्वत विकास, लोकसंख्या, सामाजिक क्षेत्र, भारत व महाराष्ट्राची कृषी व्यवस्था व सहकार अशा मुद्दय़ांशी घालत तयारी करावी. या घटकावर २०१३ साली दहा आणि २०१४ साली आठ प्रश्न विचारले गेले होते.  
सामान्य विज्ञान :
सामान्य विज्ञान या घटकात जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध घटनांशी संबंधित असलेल्या सामान्य विज्ञानावर प्रश्न विचारले जातात. यासाठी विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके यांचा अभ्यास करावा.
  जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्यातील शास्त्रीय घटकांच्या अभ्यासावर जास्त भर देऊ नये. उदा. रसायनशास्त्रातील निरनिराळय़ा अभिक्रिया, जीवशास्त्रातील प्राणीविज्ञान इत्यादी.
मात्र, जीवशास्त्राचा एक भाग म्हणजे शरीरशास्त्राशी संबंधित निरनिराळे आजार आणि त्यासाठी वापरात असलेली औषधे, जीवनसत्त्वे, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार इत्यादींचा अभ्यास व्यवस्थित करावा.
त्याचबरोबर ऊर्जा, ऊर्जा समस्या, भारताची संरक्षण व्यवस्था इत्यादींचा अभ्यास सविस्तर करावा. या घटकावर २०१३ साली २१ आणि २०१४ साली ३१ प्रश्न विचारले गेले होते.  
राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी संदर्भग्रंथ :
* इतिहास
    इतिहासाचा अभ्यास करताना सर्वप्रथम क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे. प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी क्रमिक पुस्तकांचा आधार घ्यावा.
    –    आधुनिक भारताचा इतिहास- बिपिनचंद्र (हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे.)
    –    आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर अ‍ॅण्ड ग्रोवर  हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे.
* भूगोल
    सर्वप्रथम इ. पाचवी ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे.
    –    भारताचा भूगोल प्रा. ए. बी. सवदी
    –    महाराष्ट्राचा समग्र भूगोल – प्रा. ए. बी. सवदी
* पर्यावरण व परिस्थितीकी
    या घटकांचा अभ्यास करण्यासाठी इंटरनेटचा वापर अधिक उपयोगी पडेल.
    –    पर्यावरण व परिस्थितीकी -आपले पर्यावरण- नॅशनल बुक ट्रस्ट ( एनबीटी प्रकाशन)
* भारतीय राज्यघटना
    अकरावी व बारावीची क्रमिक पुस्तके वाचावीत.
    –    भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत (इंग्रजीत)  
    –    आपली संसद- डॉ. सुभाष कश्यप. हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे.
* आर्थिक व सामाजिक विकास
    इयत्ता अकरावी- बारावीची क्रमिक पुस्तके वाचावीत.
    –    भारतीय अर्थव्यवस्था- प्रतियोगिता दर्पण (हे हिंदीत तसेच इंग्रजीत उपलब्ध आहे. या पुस्तकातील  शेवटचे प्रश्न अवश्य वाचावेत.)
    –    महाराष्ट्राची आर्थिक पाहणी- २०१५
* विज्ञान आणि तंत्रज्ञान
    इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीपर्यंतची क्रमिक पुस्तके वाचावीत. स्पेक्ट्रम पब्लिकेशनच्या (इंग्रजी) पुस्तकाचे वाचन करावे तसेच योजना, कुरूक्षेत्र, लोकराज्य या मासिकांमधील अभ्यासक्रमासंदर्भातील लेख अवश्य वाचावेत.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा