पत्रकारितेच्या पदवी-पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची माहिती-
मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारिता, जनसंपर्क, जाहिरात, ब्रॉडकॉस्टिंग, माध्यम संशोधन, वेब कम्युनिकेशन या क्षेत्रांत करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.  
क्रीडा पत्रकारिता
क्रीडा व पत्रकारिता या दोन्ही विषयांत आवड असलेल्यांना  ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्टस् जर्नालिझम हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील पदवीधराला करता येतो. केंद्र सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष. पत्ता- रजिस्ट्रार, लक्ष्मीबाई इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, शक्ती नगर, रेस कोर्स रोड, ग्वालियर- ४७४००२.
बिझनेस जर्नलिझम
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस जर्नालिझम हा अभ्यासक्रम बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इन्स्टिटय़ूटने सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. निवड- मुलाखतीद्वारे. पत्ता- अ‍ॅडमिशन इनचार्ज (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस जर्नालिझम), बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इन्स्टिटय़ूट लिमिटेड, १८ वा मजला, पी.जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई- ४००००१
वेबसाइट- pgpbj.bsebti.com, http://www.bsebti.com
ई मेल-  admissions@bseindia.com.
व्हॉइसिंग अँड रेडियो जॉकिइंग
स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग अँड कम्युनिकेशन या संस्थेने पुढील अल्प कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत –
* सर्टिफिकेट कोर्स ऑन व्हाइसिंग अँड रेडियो जॉकिइंग
* सर्टिफिकेट कोर्स ऑन टीव्ही अँकरिंग
* सर्टिफिकेट कोर्स ऑन स्क्रिप्ट रायटिंग
* सर्टिफिकेट कोर्स ऑन डॉक्युमेंटरी अँड शार्ट फिल्म मेकिंग, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. पत्ता- गिल्बर्ट हिल रोड, भवन्स कॉलेजजवळ, अंधेरी पश्चिम,
मुंबई- ४०००५८. वेबसाइट-   info@sbc.ac.in   ई मेल- http://www.sbc.ac.in
गुरुनानक खालसा कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स
बॅचलर ऑफ मास मीडिया. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. पत्ता- गुरुनानक खालसा कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स, माटुंगा मुंबई- ४०००१९
वेबसाइट- http://www.gnkhalsa.edu.in
घनश्यामदास सराफ कॉलेज ऑफ आर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्स
या संस्थेने बॅचलर ऑफ मास मीडिया हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण.
पत्ता- स्वामी विवेकानंद रोड, मालाड (पश्चिम),
मुंबई- ४०००६४ वेबसाइट- http://www.sarafcollege.org
इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन
* बॅचलर ऑफ आर्टस् इन जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन. कालावधी- तीन वर्षे. अर्हता- बारावी उत्तीर्ण.
* मास्टर ऑफ आर्टस् इन जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रिंट आणि ब्रॉडकास्ट जर्नालिझम, अ‍ॅडव्हर्टायजिंग आणि प्रिंट, पब्लिक रिलेशन्स, फिल्म आणि टीव्ही प्रॉडक्शन या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. पत्ता- ८५/५- बी, समन्वय आयटी कॅम्पस, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, तथवाडे, पुणे-४११०३३.
वेबसाइट- http://www.indiraisc.edu.in
ई मेल-  isc@indiraedu.com
एमईईआर आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, कोथरूड, पुणे.
* एम.ए. इन मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम.
एमआयटी इंटरनॅशनल स्कूल ऑफ ब्रॉडकॉस्टिंग अ‍ॅण्ड जर्नालिझम, पुणे.
पोस्ट गॅ्रज्युएट प्रोग्रॅम इन मास कम्युनिकेशन.
कॉलेज ऑफ जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन, औरंगाबाद.
* बी.ए. इन मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम
* बी.ए. इन इंटरनॅशनल जर्नालिझम
* एम.ए. इन मास्टर ऑफ इंटरनॅशनल जर्नालिझम
* डिप्लोमा इन टीव्ही जर्नालिझम
मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
* मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम.   
नागपूर विद्यापीठ
* बॅचलर ऑफ जर्नालिझम
* एम.ए. इन मास कम्युनिकेशन
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
* बॅचलर ऑफ जर्नालिझम
* मास्टर्स ऑफ जर्नालिझम
माखनलाल चर्तुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नालिझम अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, भोपाळ.
* मास्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट (माध्यम संबंधित) माध्यमांशी निगडित व्यवस्थापकीय कौशल्यनिर्मितीस उपयुक्त ठरू शकतील असे हे अभ्यासक्रम आहेत. एमबीए इन मीडिया मॅनेजमेंट, एमबीए इन एन्टरटेनमेंट कम्युनिकेशन,  एमबीए इन कार्पोरेट कम्युनिकेशन, एमबीए अ‍ॅडव्‍‌र्हटायजिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग कम्युनिकेशन. अर्हता- या सर्व अभ्यासक्रमांना कोणत्याही शाखेतील पदवीधरांना प्रवेश मिळू शकतो.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम :
* मास्टर ऑफ ब्रॉडकॉस्ट जर्नालिझम (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण), मास्टर ऑफ सायन्स इन इलेक्ट्रॉनिक मीडिया (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण), मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन मीडिया स्टडीज (अर्हता- ५५ टक्के गुणांसह जनसंवाद विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण. अनुसूचित जाती आणि जमातीच्या संवर्गातील उमेदवारांसाठी गुणांमध्ये पाच टक्के सवलत). वरील अभ्यासक्रम भोपाळ कॅम्पसमध्ये चालवले जातात. मास्टर  ऑफ सायन्स इन मीडिया रिसर्च हा अभ्यासक्रम नॉयडा कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे.
पदवी अभ्यासक्रम : बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन प्रिंटिंग अ‍ॅण्ड पॅकेजिंग (अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.). बॅचलर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ सायन्स इन इलेक्ट्रॉनिक मीडिया, बॅचलर ऑफ सायन्स इन मल्टीमीडिया, बॅचलर  ऑफ सायन्स इन ग्राफिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमेशन.
पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम-
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन व्हिडीओ प्रॉडक्शन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन वेब कम्युनिकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एन्व्हिरॉन्मेन्टल कम्युनिकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिल्म जर्नालिझम, पोस्ट ग्रॅज्युएट  डिप्लोमा इन डिजिटल फोटोग्राफी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगिक हेल्थ मॅनेजमेन्ट अ‍ॅण्ड स्पिरिच्युएल कम्युनिकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडियन कम्युनिकेशन ट्रेडिशन्स. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी.
प्रवेश प्रक्रिया- या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी http://www.mponline.gove.in  या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. मास्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनने घेतलेल्या कॉमन मॅनेजमेन्ट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टमध्ये मिळालेले गुण ग्राह्य़ धरले जातात. या परीक्षेतील मेरिटनुसार प्रवेश दिला जातो. ही परीक्षा भोपाळ, इंदौर, जबलपूर, खांडवा, ग्वॉलिअर, रायपूर, कोलकत्ता, लखनौ, पाटना, रांची, जयपूर, नॉयडा, खांडवा या केंद्रांवर घेतली जाते.
पत्ता- माखनलाल चर्तुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नालिझम अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, भोपाळ- ४६२०११.
ई मेल-  mcu.pravesh@gmail.com
वेबसाइट- http://www.mcu.ac.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा