भूकवचातील पदार्थ : खडक
ब) शेल : जलाशयाच्या तळभागावर गाळाचे संचयन होत असताना त्यात बारीक मातीचे प्रमाण जास्त असल्यास जो खडक तयार होतो, त्याला पंकाश्म किंवा शेल असे म्हणतात. या खडकांमध्ये चिकणमाती व फेल्स्फार यांचे प्रमाण जास्त असते. हे खडक अतिशय मृदू असल्याने बा घटकांद्वारे त्यांची झीज लवकर हेते.
क) गारगोटी : गाळाच्या संचयनात खडकांच्या सूक्ष्म परंतु टणक कणांचे प्रमाण जास्त असल्यास जो कठीण खडक तयार होतो, त्याला गारगोटी खडक असे म्हणतात.
२. सेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक : जलाशयात गाळाचे संचयन होत असताना बऱ्याच वेळा त्यात प्राण्यांचे व वनस्पतींचे अवशेषही साचतात. त्यावर दाब पडून खडकांची निर्मिती होते, त्यांना सेंद्रिय खडक म्हणतात. वनस्पतीपासून तयार होणाऱ्या खडकांमध्ये कॅल्शियम काबरेनेटचे प्रमाण जास्त असते. त्यावरून त्यांचे दोन उपप्रकार पडतात-
अ) वनस्पतीजन्य खडक : भूकंपामुळे किंवा इतर काही कारणांनी भूपृष्ठावरील वनस्पती अंतर्गत भागात गाडली जातात. त्यावर गाळाचे संचयन होते. वरील भूपृष्ठाचा प्रचंड दाब व आतील उष्णता यामुळे वनस्पतीचे कोळशात रूपांतर होते. यात कार्बनचे प्रमाण जास्त असते. यालाच वनस्पतीजन्य स्तरित खडक म्हणतात. यांची निर्मिती ३० ते ३५ कोटी वर्षांपूर्वी झाली असावी.
ब) प्राणिजन्य खडक : जलाशयात गाळाचे संचयन होत असताना बऱ्याच वेळा त्यात जलचर प्राणी दबले जातात. त्यापासून जो खडक तयार होतो त्याला प्राणिजन्य स्तरित खडक असे म्हणतात. या खडकांमध्ये प्राण्यांच्या सांगाडय़ांपासून तयार झालेला कॅल्शियम काबरेनेट हा पदार्थ आढळतो. खडू, चुनखडी, डोलामाइट ही या प्रकारच्या खडकांची उदाहरणे आहेत. हे खडक मृदू असून कार्बन डायऑक्साइड मिश्रित पाण्यात ते विरघळतात.
स्तरित खडकांची निर्मिती बहुतांश उथळ पाण्यात होत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन झाल्यावर क्षारयुक्त पदार्थाचे संचयन असलेले खडक उघडे पडतात. उदा. जिप्सम सॉल्ट.
* स्तरित खडकांचे गुणधर्म :
= या खडकांमध्ये अनेक थर असतात.
= एका स्तरित खडकाच्या थरात अनेक कण संघटित
झालेले असतात.
= हे खडक मृदू असतात.
= खडकांत अनेक प्रकारची खनिजे असल्याने यांना विविध रंग प्राप्त झालेले असतात.
= स्तरित खडक सच्छिद्र असतात.
= या खडकांमध्ये जे अवशेष सापडतात, त्यावरून खडकनिर्मितीचा काळ व त्या काळच्या हवामानाची कल्पना
येऊ शकते.
३) रूपांतरित खडक : पृथ्वीवरील बा किंवा अंतर्गत शक्तीच्या कार्यामुळे बऱ्याच मूळ अग्निजन्य व स्तरित खडकांमध्ये मोडतोड न होता मूळ खडकांच्या रचनेत व गुणधर्मामध्ये बदल होतात. नंतर नवीनच गुणधर्माचा वेगळा खडक तयार होतो. त्यालाच रूपांतरित खडक असे म्हणतात. मूळ खडकात होणारे बदल काही वेळा भौतिक स्वरूपाचे असतात तर काही वेळा रासायनिक स्वरूपाचे असतात. वरील दोन्ही प्रकारांच्या बदलांमुळे मूळ खडकातील घटकद्रव्यांमध्ये बदल होऊन वेगवेगळ्या गुणधर्माची घटकद्रव्ये खडकात तयार होतात. मूळ घटकद्रव्याच्या रचनेतही बदल होतो. या बदलांमुळे मूळ खडकात विकृती निर्माण होते, म्हणून या खडकांना विकृत खडक असेही म्हणतात. मूळ खडकांत होणारा बदल एकतर अधिक दाबामुळे किंवा अतिउष्णतेमुळे किंवा संयुक्त परिणामांनी होतो. पुढच्या भागात काही मूळ अग्निजन्य व स्तरित खडकांपासून तयार झालेली रूपांतरित खडकांची उदाहरणे अभ्यासूयात..
लेखन : डॉ. जी. आर. पाटील
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा