लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६) : व्हॉइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई-मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता. दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे विलिंग्डनच्या कार्यकाळात झाली.
* १६ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित केली. तिलाच ‘जातीय निवाडा’ म्हणतात.
* गांधीजींनी याविरोधात उपोषण केले आणि येरवडा तुरुंगात २४ सप्टेंबर १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला.
* भारत सरकार अधिनियम, १९३५ चा कायदा संमत झाला.
* विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता राहिला.
व्हॉइसरॉय लिनलिथगो (१९३६ – १९४४) : स्टॅनलेकडून लिनलिथगोने व्हॉइसरॉय पदाची सूत्रे हाती घेतली. लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष होता.
* १९३५ च्या कायदा निर्मितीत लिनलिथगोचा सहभाग होता. १९३५ च्या कायद्यान्वये केंद्रीय भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य झाल्या आणि १९३७ मध्ये निवडणुका झाल्या. काँग्रेसने ८ प्रांतांत सरकार स्थापन केले.
* दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहमतीशिवाय युद्धाला पाठिंबा देण्याची घोषणा व्हॉइसरॉयने १९३९ मध्ये केली. या घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय शासनाने १९३९ मध्ये राजीनामे दिले. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला.
* १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीस दडपून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न इंग्रज सरकारने केला. सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले. १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले.
लॉर्ड वेव्हेल (१९४३ – १९४७) : ऑक्टोबर १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हॉइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले. वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी जून १९४५ मध्ये सर्वपक्षीय बठक सिमला येथे बोलवली.
* इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात १९४६ मध्ये कॅबिनेट
मिशन पाठवले.
* कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन २ सप्टेंबर १९४६ रोजी नेहरूंचे हंगामी सरकार स्थापन झाले. भारतात घटना समितीच्या बठकांना सुरुवात झाली.
* आझाद हिंद सेनेच्या सनिकांच्या फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे व्हॉइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या लागल्या.
* पंतप्रधान अॅटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला.
व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन (मार्च १९४७ ते ऑगस्ट १९४७ – जून १९४८) : मार्च १९४७ मध्ये हे व्हॉइसरॉय म्हणून भारतात आले. मे १९४७ मध्ये ब्रिटन संसदेशी चर्चा करण्यास लंडनला गेले. २ जून १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. ३ जून १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्याची तारीख जाहीर करण्यात आली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
* स्वतंत्र भारताचा तिरंगा प्रथम व्हॉइसरॉय माउंटबॅटनच्या हस्ते फडकविण्यात आला.
* स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व इंग्रज सरकारचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन ठरले.
* माउंटबॅटन जून १९४८ पर्यंत स्वतंत्र भारताचे गव्हर्नर
जनरल होते.
गव्हर्नर जनरल राजगोपालाचारी (जून १८४८ ते जानेवारी १९५०) : स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी होते. स्वतंत्र भारताची घटना
२६ जानेवारी १९५० पासून अमलात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा