भूकवचातील पदार्थ : खडक
रूपांतरित खडक
अग्निजन्य खडक बेसॉल्ट हॉर्न ब्लेंडशिस्ट
स्तरित खडक वालुकाश्म क्वार्टझाइट
पंकाश्म स्लेट
चुनखडीमिश्रित संगमरवर
कोळसा ग्रॅफाइट
दगडी कोळसा अॅथ्रासाइट
ज्वालामुखी ((Volcano)
= ज्वालामुखी क्रियांचे प्रकार : ज्वालामुखीय क्रियांचे दोन प्रकार पडतात- भूपृष्ठांतर्गत ज्वालामुखी क्रिया आणि भूपृष्ठबा ज्वालामुखी क्रिया.
१) भूपृष्ठांतर्गत ज्वालामुखी क्रिया : ज्वालामुखीय क्रियांमुळे भूगर्भातील तप्त शिलारस भूपृष्ठाकडे फेकला जातो. परंतु हा तप्त शिलारस भूपृष्ठावर न येता भूगर्भातच थंड होतो व त्याचे कठीण खडकात रूपांतर होते, त्याला अंतर्निर्मित अग्निजन्य खडक असे म्हणतात.
२) भूपृष्ठबा ज्वालामुखी क्रिया : भूअंतर्गत शीघ्र हालचालींमुळे भूकवचाला खोल व विस्तीर्ण भेग पडून या भेगेतून पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तप्त शिलारस, वायू आदी पदार्थ भूपृष्ठावर येऊन पसरतात. तप्त शिलारस भूपृष्ठावर आल्यानंतर थंड होतो. त्याचे रूपांतर कठीण खडकात होते.
ज्वालामुखीचे प्रकार :
अ) ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरूपानुसार..
१) केंद्रीय ज्वालामुखी : तप्त शिलारस भूगर्भातून येताना नलिकेतून येतो, त्याला ‘केंद्रीय ज्वालामुखी’ म्हणतात.
२) भ्रंशमूलक ज्वालामुखी : भूगर्भातून येणारा तप्त शिलारस भूपृष्ठाला पडलेल्या लांबच लांब भेगेतून बाहेर पडतो, त्या ज्वालामुखीच्या उद्रेकास भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणतात.
ब) ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे प्रकार :
१) जागृत ज्वालामुखी : अशा ज्वालामुखीचे उद्रेक वारंवार व केव्हाही होतात. जगात ५०० जागृत ज्वालामुखी आहेत.
२) निद्रिस्त ज्वालामुखी : ज्वालामुखीचा उद्रेक एकदा झाल्यानंतर कित्येक वष्रे उद्रेक होणे थांबते. काही काळानंतर पुन्हा या ज्वालामुखीचा आकस्मिक उद्रेक होतो, म्हणून याला ‘निद्रिस्त ज्वालामुखी’ असे म्हणतात.
३) मृत ज्वालामुखी : ज्या ज्वालामुखीचा एकदा उद्रेक झाल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा कधीही उद्रेक होत नाही किंवा उद्रेक होण्याची शक्यता नसते. त्याला ‘मृत ज्वालामुखी’ असे म्हणतात.
= ज्वालामुखीचे भौगोलिक वितरण :
१) पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यालगतचा प्रदेश : भूगर्भीयदृष्टय़ा हा भाग कमकुवत असून तिथे मोठय़ा प्रमाणावर भू-हालचाली होत असतात. या पट्टय़ांत उत्तर व दक्षिण अमेरिका यांचा पश्चिम किनाऱ्यालगतचा प्रदेश तसेच आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगतची बेटे आणि न्यूझीलंड इत्यादींचा समावेश होतो. जगातील एकूण ज्वालामुखींपकी ६६ % ज्वालामुखी या पट्टय़ात आहेत. त्यातील बहुतेक ज्वालामुखी जागृत असल्यामुळे या पट्टय़ाला पॅसिफिकचे अग्निकंकण असे म्हणतात. या पट्टय़ात रॉकी पर्वतातील हूड, शास्ता, रेनीयर, अँडीज पर्वतातील चिम्बोराझो व जपानमधील फुजियामा इत्यादी महत्त्वाचे ज्वालामुखी येतात.
२) अटलांटिक पट्टा : वेस्ट इंडिज, अटलांटिक महासागराच्या पूर्वेकडील आइसलँडपासून सेंट हेलेनापर्यंतची सर्व बेटे.
३) युरेशिअन पट्टा : ज्वालामुखीचा पट्टा युरोप आणि आशिया खंडाच्या मध्य भागातून घडीच्या पर्वतरांगांवरून गेला आहे. इटली, ग्रेशियन द्वीपसमूह, आम्रेनिया, आशिया मायनरमधील घडीच्या पर्वतरांगा, कॉकेशस पर्वत, अफगाणिस्तान, बलुचिस्तान यांच्या सीमावर्ती प्रदेशात ज्वालामुखी आढळतात. यातील काही ज्वालामुखी अजूनही जागृत आहेत. उदा. व्हेसूव्हएस, एटना, स्ट्राम्बोली इ.
यूपीएससी
ज्वालामुखीय क्रियांचे दोन प्रकार पडतात- भूपृष्ठांतर्गत ज्वालामुखी क्रिया आणि भूपृष्ठबा ज्वालामुखी क्रिया.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-03-2016 at 08:28 IST
मराठीतील सर्व स्पर्धा परीक्षा गुरू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc test