भूकवचातील पदार्थ : खडक
(वळ्यांचे प्रकार- उर्वरित भाग)
= असमान वळ्या (Asymmetrical Folds) : भूकवचावर जेव्हा दोन्ही बाजूंकडील दाब असमान म्हणजेच कमी-अधिक असेल अशा वेळी भूकवचास वळी पडून एका बाजूस तीव्र उतार व एक बाजू सौम्य उताराची असते.
अशा प्रकारच्या वळीस ‘असमान वळ्या’
असे म्हणतात.
= समतन वळ्या ((Isoclinal Folds) : जेव्हा दोन्ही बाजूंकडील दाब कमी तीव्रतेचा असेल अशा वेळी भूकवचास वळी पडून एक बाजू जास्त दाबली जाते. थोडक्यात अपनती ही अवनतीवर डोकावते आणि वळीच्या बाजू एकाच दिशेने झुकलेल्या असतात. अशा प्रकारच्या वळीस ‘समनत वळ्या’ असे म्हणतात.
= परिवलन वळी (Recumbet Folds) : या वलीकरण प्रक्रियेत वळीच्या दोन्ही बाजू एकाच दिशेने झुकलेल्या असतात. त्या परस्परांना समांतर असतातच, पण त्याच वेळी त्या भूकवचालाही समांतर असतात. अशा वळ्यांना
‘परिवलन वळ्या’ असे म्हणतात.
= पंखसदृश वळ्या (Fan Folds) : भूकवचावर जेव्हा दोन्ही बाजूंकडील दाब समान, सारखाच असतो आणि तीव्र दाबामुळे भूकवचास अनेक लहान वळ्या पडून हा दाब ज्या भागात केंद्रित होतो, त्या भागातील वळी इतर वळींपेक्षा जास्त वर आलेली असते. अशा रीतीने भूकवचाला वळ्या पडून भूकवचास पंख्याचा आकार प्राप्त होतो, म्हणून या वळ्यांना ‘पंखसदृश वळ्या’ असे म्हणतात.
= ग्रीवा खंड (Nappes) : या वलीकरण प्रक्रियेत वळीच्या दोन्ही बाजूंनी येणारा दाब अतिप्रचंड असतो. त्यामुळे वळीच्या आसावर इतका ताण पडतो की, आसाजवळील वळीचा भाग दुभंगतो व त्यामुळे काही वेळेस दुभंगलेल्या भागाला अनुसरून जास्त दाबाकडील वळीची भुजा दुसऱ्या भुजेवर सरकते. अशा विखंडीत वळीला ‘ग्रीवाखंड’ असे म्हणतात. सागर किनाऱ्यावर आणि क्षितिजसमांतर थर असणाऱ्या स्तरीय खडकात ग्रीवाखंड प्रक्रिया मोठय़ा प्रमाणात घडण्याची शक्यता जास्त असते.
ऊध्र्वगामी किंवा उभ्या हालचाली (Vartical Movement) : भूपृष्ठातील अग्निजन्य किंवा कठीण खडकावर दाब किंवा ताण पडून खडकाला भेगा किंवा तडे जातात, त्यास ‘प्रस्तरभंग’ असे म्हणतात. भूपृष्ठातील किंवा भूकवचावरील खडकांना मोठमोठय़ा भेगा पडतात किंवा त्यात जोड निर्माण होतात. खडकांना भेग पडून त्या भेगेजवळील खडकांच्या तुकडय़ांमध्ये स्थानांतर झाल्यास त्या भेगेला ‘भ्रंश’ असे म्हणतात. ताण किंवा दाब यामुळे भूपृष्ठ दुभंगून प्रस्तरभंग निर्माण होतो.
प्रस्तरभंगाचे प्रकार (Types of Fault) :
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा