मित्रांनो, ऑगस्ट २०१५ मध्ये यूपीएससीची पूर्वपरीक्षा होईल. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने सीसॅट पेपर- २ हा अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे. हा पेपर २०० गुणांचा असून यात ८० प्रश्न विचारले जातात. यूपीएससी व एमपीएससी या दोन्ही परीक्षांसाठी अभ्यासक्रम सारखाच आहे. मात्र, प्रश्नांची पातळी थोडी वेगळी असते. २०१४ मध्ये, यूपीएससी पूर्वपरीक्षेत सीसॅटचा पेपर असावा किंवा नसावा यासंबंधी मोठय़ा प्रमाणावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी हा पेपर नसावा यासाठी मोठे आंदोलनदेखील केले. मात्र, यूपीएससीने हा पेपर अभ्यासक्रमातून वगळला नाही. फक्त त्यात काही मूलभूत बदल केले आहेत. या बदलाअंतर्गत, इंग्रजी भाषा आकलन क्षमता या उपघटकासंबंधित उतारे प्रश्नपत्रिकेतून वगळले आहेत.
परीक्षेच्या दृष्टीने सीसॅट- २ या पेपरचे महत्त्व :
जर एमपीएससी (राज्यसेवा) पूर्वपरीक्षा तसेच यूपीएससी (नागरी सेवा, पूर्वपरीक्षा) उत्तीर्ण व्हायची असेल तर या पेपरशिवाय पर्याय नाही. याचे कारण सीसॅट पेपर- १ (सामान्य अध्ययनाशी संबंधित पेपर) यांच्या अभ्यासाला मर्यादा पडतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सीसॅट पेपर- २ मध्ये गती असते, त्यांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे सोपे जाते. थोडक्यात, परीक्षेच्या दृष्टीने विचार केल्यास या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
या पेपरमध्ये खालील उपघटक समाविष्ट केलेले आहेत-
= आकलन कौशल्य
= आंतरवैयक्तिक संवाद व संभाषण कौशल्य
= ताíकक विचार व विश्लेषणात्मक क्षमता
= निर्णय प्रक्रिया व समस्यांची सोडवणूक
= सामान्य बुद्धिमत्ता चाचणी
= मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण
= इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य
या पेपरचा अभ्यास करताना सर्वप्रथम कोणत्या घटकांवर किती प्रश्न विचारले गेले आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांचा असा समज असतो की, सीसॅट पेपर- २ म्हणजे गणिताचा पेपर. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, गणिताशी संबंधित प्रश्न हे फारच कमी असतात. २०११ ते २०१४ या काळातील पेपरचे विश्लेषण करून विचारल्या गेलेल्या प्रश्नांसंदर्भात पुढील तक्ता हाती येतो. ही माहिती अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे-
टीप : २०१४ यावर्षी इंग्रजी भाषेच्या संदर्भात असणाऱ्या आकलन कौशल्य (English Language Comprehension) या घटकावर प्रश्न विचारण्यात आले नाहीत. २०१४ या वर्षी निर्णयप्रक्रिया व समस्यांची सोडवणूक (Decision Making) यावर प्रश्न विचारण्यात आले नाहीत.
१) आकलनाची तयारी :
आकलन म्हणजे समजून घेणे. यात सर्वसाधारणत: नवे वा अनोळखी उतारे म्हणता येतील अशा उताऱ्यावरील प्रश्नांच्या आधारे उमेदवाराची आकलन क्षमता तपासली जाते. या विभागाला जास्तीत जास्त ५५ ते ६० मिनिटेच देता येतात आणि या ठरावीक वेळेमध्ये जवळपास १०-११ उतारे आणि त्यांच्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. या सर्व बाबींचा विचार केला तर एक उतारा वाचून त्यावरील प्रश्न सोडविण्यास जास्तीत जास्त सहा ते सात मिनिटे वेळ मिळतो.
२) इंग्रजी भाषेच्या आकलनाची तयारी :
२०१४ साली इंग्रजी भाषेच्या संदर्भात असणारे आकलन कौशल्य (English Language Comprehension) या घटकावर प्रश्न विचारण्यात आले नाहीत. इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य जोखण्याकरता इंग्रजी उतारा दिलेला असतो. तो भाषांतरित नसतो. प्रशासकीय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी हा उतारा दिलेला असतो. साधारणत: याचा स्तर दहावी ते बारावी इयत्तेपर्यंत असतो. हे उतारे सरळ व सोपे असतात. त्यामुळे या ठिकाणी हक्काचे गुण प्राप्त करण्याची संधी असते.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com
यूपीएससी : सीसॅट पेपर- २
मित्रांनो, ऑगस्ट २०१५ मध्ये यूपीएससीची पूर्वपरीक्षा होईल. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने सीसॅट पेपर- २ हा अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे.
First published on: 05-03-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc csat paper no