केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल अॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट या संस्थेच्या ‘बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमाविषयी..
देशाच्या विकासदर वृद्धीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हॉटेल, हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन या क्षेत्रांचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या क्षेत्रांतील तज्ज्ञ मनुष्यबळ निर्मितीसाठी शिक्षण-प्रशिक्षणक्रम सुरू केले आहेत. ही जबाबदारी नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल अॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट या राष्ट्रीय संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने हॉटेल उद्योगाशी संबंधित- प्रमाणपत्र ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचे, विविध कालावधीचे रोजगारक्षम व उत्तम करिअर घडण्याची क्षमता असलेले अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यांत बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट या महत्त्वाच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दर वर्षी सामायिक प्रवेश चाचणी घेतली जाते. त्याद्वारे देशातील सर्वोत्कृष्ट ५१ संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. यांमधील २१ संस्थांना केंद्रीय अर्थसाहाय्य मिळते तर १९ संस्था राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.
करिअर संधी
या कौन्सिलद्वारे प्रमाणित केलेला अभ्यासक्रम दर्जेदार असतो. हा अभ्यासक्रम जागतिक स्तरावरील अभ्यासक्रमाशी सुसंगत असल्याने या क्षेत्रात पाऊल रोवण्यासाठी उमेदवारांची संपूर्ण तयारी या अभ्यासक्रमाद्वारे होते. आतापावेतो या संस्थेने सुमारे ८० हजार उमेदवारांना या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले आहे. यांतील बहुतेक उमेदवार देश-विदेशातील हॉटेल उद्योगामध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्याशिवाय अध्यापनाच्या क्षेत्रातही या उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. या संधींमध्ये रिसॉर्ट व्यवस्थापक, हॉटेल आणि संबंधित उद्योगात व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी, बहुराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी कंपन्यांमध्ये व्यवस्थापक, प्रारंभीच्या प्रशिक्षणानंतर मोठय़ा हॉटेल समुहांमध्ये किचन व्यवस्थापक, हाऊसकीिपग व्यवस्थापक, राज्य पर्यटन विकास महामंडळात विविध संधी, विमान सेवेतील फ्लाइट किचन आणि विमानांतर्गत सेवा, रेल्वे आतिथ्य आणि खानपान सेवा, भारतीय नौसेना- आतिथ्य सेवा, हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रातील विक्री व विपणन अधिकारी, हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रांसाठी आवश्यक ग्राहक सेवा अधिकारी, प्रवासी जहाजांवरील खानपान व आतिथ्य सेवा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फास्टफूड साखळी उद्योगासाठी आवश्यक व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी आणि अधिकारी, रुग्णालये आणि मोठय़ा कॉर्पोरेट संस्थांमधील आतिथ्य व खानपान सेवा आदींचा ठळकरीत्या उल्लेख करावा लागेल.
हा अभ्यासक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. उमेदवारांना हॉटेल व तत्सम उद्योग व्यवसायासाठी आवश्यक अशा सर्व प्रकारच्या पर्यवेक्षकीय जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळता याव्यात अशा तऱ्हेने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. अन्नपदार्थ निर्मिती, अन्नपदार्थ व पेय सेवा, हाऊसकीिपग आणि फ्रंट ऑफिस सेवा सांभाळण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र, कौशल्य आणि प्रशिक्षण या अभ्यासक्रमाद्वारे उपलब्ध करून दिले जाते. हॉटेल व्यवसायाशी संबंधित लेखाविषयक बाबी (अकाउंटन्सी), अन्नसुरक्षा, गुणवत्ता व दर्जा नियंत्रण, मनुष्यबळ विकास, वित्तीय व्यवस्थापन, पर्यटन विपणन व व्यवस्थापन आणि व्यूहात्मक व्यवस्थापकीय कौशल्य या बाबीही शिकवल्या जातात.
अर्हता- या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण उमेदवाराला प्रवेश मिळू शकतो. मात्र, या उमेदवाराने इंग्रजी विषयाचा अभ्यास बारावीला करणे आवश्यक आहे. खुल्या आणि इतर मागासवर्ग उमेदवारांसाठी उमेदवाराचे कमाल वय १ जुल रोजी २२ वष्रे असावे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी हे वय २५ वष्रे असावे. राखीव जागा- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्ग, २७ टक्के जागा नॉन क्रिमिलेअर ओबीसींसाठी आणि ३ टक्के जागा शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येतात.
परीक्षा पद्धती : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची चाळणी परीक्षा दरवर्षी साधारणत: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घेतली जाते. ती २०० गुणांची असते. प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतात. हे प्रश्न पुढील विषयांवर विचारले जातात- इंग्रजी भाषा (६० गुण), सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (३० गुण), सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल (५० गुण), संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल (६० गुण), कार्यकारणभाव आणि ताíकक क्षमता (६० गुण) असे २०० प्रश्न विचारले जातात. कालावधी- तीन तास.
इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल, कार्यकारणभाव आणि ताíकक क्षमता या विषयात अचूक उत्तरांसाठी १ गुण दिला जातो. उत्तर चुकल्यास ०.२५ टक्के गुण कापले जातात. सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल या विषयाचे गुण देताना संपूर्णरीत्या अचूक उत्तरासाठी एक गुण, त्यापेक्षा कमी अचूक उत्तरासाठी ०.७५ गुण, त्यापेक्षा कमी अचूक उत्तरासाठी ०.५० गुण अशा श्रेणीने गुण दिले जातात. उत्तर चूक असल्यास ०.२५ गुण वजा केले जातात. ही परीक्षा देशातील ३३ शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये राज्यातील पुणे, नागपूर आणि मुंबई शहरांचा समावेश आहे. या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात घोषित केला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ १८ जुलपासून होतो.
शुल्क अर्थसाहाय्य- केंद्रीय संस्थांमधील योजनेंतर्गत प्रत्येक सत्रातील शुल्काच्या ५० टक्के रकमेचा परतावा मिळतो. प्रत्येक वर्षांतील दोन्ही सत्रांच्या समाप्तीनंतर होणाऱ्या अखिल भारतीय वार्षकि परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकांच्या उमेदवारांना हॉटेल उद्योजकांच्या सहकार्याने गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या संवर्गातील उमेदवारांना त्यांच्या राज्यातील शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती मिळू शकते.
संपर्क- नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी, ए-३४, सेक्टर-६२, नॉयडा- २०१३०९. संकेतस्थळ- http://www.nchm.nic.in
हॉटेल अॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट
‘बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमाविषयी..
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-04-2016 at 05:42 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career guidance career options