मरिन इंजिनीअरिंग संबंधित विविध विद्याशाखा आणि ‘इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिी’शी संलग्न असणाऱ्या विविध संस्थांमधील अभ्यासक्रमांची इत्थंभूत माहिती..
आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुख्यत्वे सागरी मार्गानेच होतो. यात मरिन इंजिनीअर महत्त्वाची भूमिका बजावतात. मरिन इंजिनीअिरग ही अभियांत्रिकीची शाखा असून जहाज बांधणी, जहाज वास्तुकला आणि देखभाल-दुरुस्ती या संदर्भातील शास्त्राशी संबंधित आहे. नेव्हल आíकटेक्चर, मरिन इंजिनीअिरग आणि ओशन इंजिनीअिरग ही क्षेत्रे परस्परांशी संबंधित असली तरी प्रत्येकाची स्वतंत्र वैशिष्टय़े आहेत. नेव्हल आíकटेक्ट्स हे जहाजाचे डिझाइन, स्थर्य, जहाजाची वास्तुकला, जहाजाची ऊर्जा गरज यांसारख्या बाबींशी संबंधित आहेत. ओशन इंजिनीअर्स हे सागरी पर्यावरणाचा विविध प्रकारची जहाजे, बोटी, पाणबुडय़ा आदींवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करतात. हे अभियंते तात्पुरत्या सागरी फलाटांची बांधणी करतात तसेच सागरातील अंतरंगातील संशोधनासाठी जहाज व तत्सम वाहनांसाठी मानव संचालित व यंत्र संचालित तळाची बांधणीसुद्धा करतात. मरिन इंजिनीअरला जहाजाच्या तांत्रिक व्यवस्थापनाची जबबादारी स्वीकारावी लागते.
हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना देश-विदेशात करिअरच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. मरिन इंजिनीअिरग हा जहाज, नावा, पाणबुडी किंवा अशा प्रकारच्या सागरिक वाहतुकीच्या साधनांच्या निर्मिती, देखभाल आणि दुरुस्तीशी संबंधित आहे. विशेषत: इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल बाबींचा अधिक संबंध येतो. यंत्रसामग्री, पायिपग, नियंत्रण व्यवस्था, स्वयंचलन, ऊर्जा आणि इतर बाबी या अभियंत्यांना बघाव्या लागतात. मरिन इंजिनीअरना चार ते सहा महिने सागरावर व्यतीत करावे लागतात. त्यांना उत्तम वेतन व इतर सुविधा दिल्या जातात.
मरिन इंजिनीअिरग अभ्यासक्रम चार वष्रे कालावधीचा आहे. बारावी विज्ञानशाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील जहाज बांधणी व्यवसाय कंपन्या, इंजिन व इतर यंत्रसामग्री निर्मिती कंपन्या, जहाज व इतर सागरी वाहनांच्या डिझाइन करणाऱ्या कंपन्या, संशोधन संस्था यामध्ये करिअरच्या संधी मिळू शकतात.
मरिन इंजिनीअिरगशी संबंधित अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- बी.ई. मरिन इंजिनीअिरग, बी.टेक. नॉटिकल सायन्स, डिप्लोमा इन मरिन, इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक इंजिनीअिरग, डिप्लोमा इन र्मचट नेव्ही, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, जनरल पर्पज रेटिंग्ज, ग्रॅज्युएट मरिन इंजिनीअिरग, हायर नॅशनल डिप्लोमा इन मरिन इंजिनीअिरग, हायर नॅशनल डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, एम.ई. इन मरिन इंजिनीअिरग, प्री सी ट्रेनिंग फॉर डिप्लोमा होल्डर्स, प्री सी ट्रेनिंग फॉर ग्रॅज्युएट.
इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिी
इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिी ही केंद्र सरकारच्या जहाज व नौकानयन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेची स्थापना २००८ साली करण्यात आली. या संस्थेस केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सागरी शिक्षण-प्रशिक्षण, संशोधनसाठी कार्यरत असणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. या संस्थेच्या विस्तारित कार्यामध्ये सागराचा अभ्यास, सागरी इतिहास, या क्षेत्राशी संबंधित कायदे व अधिनियम, सुरक्षा, शोध आणि सुटका, धोकादायक मालवाहतुकीचे दळणवळण, पर्यावरणीय अभ्यास आदी विषयांचा समावेश आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभरात विस्तारलेले आहे. या संस्थेशी पुढील संस्था संलग्न आहेत
महाराष्ट्रतील संस्था :
- द ग्रेट ईस्टर्न इन्स्टिटय़ूट ऑफ मेरिटाइम स्टडीज, मुंबई. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, प्रवेश जागा- १२०.
- तोलाणी मेरिटाइम इन्स्टिटय़ूट, पुणे. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- १२०.
- ट्रेनिंग शिप रहमान, मुंबई. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- १२०.
- विश्वकर्मा मेरिटाइम इन्स्टिटय़ूट, पुणे. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ४०.
- याक एज्युकेशन ट्रस्ट. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- १२०.
- अँग्लो ईस्टर्न मेरिटाइम अॅकॅडेमी, मुंबई. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- १६०.
- महाराष्ट्र अॅकॅडेमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अॅण्ड ट्रेनग, पुणे. अभ्यासक्रम बी. टेक- मरिन इंजिनीअिरग. प्रवेश जागा- २००.
- एमएमटीआयएस एज्युकेशन अॅण्ड रिसर्च ट्रस्ट, मुंबई. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ४०.
इतर राज्यातील संस्था
- अॅप्लाइड रिसर्च इंटरनॅशनल, न्यू दिल्ली, अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- १२०.
- सी.व्ही. रमण कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, भुवनेश्वर.
अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ४०, बी.टेक- मरिन इंजिनीअिरग. प्रवेश जागा- ४०.
- कोईम्बतूर मरिन कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, कोईम्बतूर. अभ्यासक्रम- बी.टेक- मरिन इंजिनीअिरग. प्रवेश जागा- ८०.
- कॉलेज ऑफ शिप बिल्डग, पल्लकड. अभ्यासक्रम- बी.एस्सी इन शिप बिल्डग अॅण्ड रिपेअिरग. प्रवेश जागा- ४०.
- डॉ. बी.आर. आंबेडकर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पोर्ट ब्लेअर. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स,
प्रवेश जागा- ३०.
- युरो टेक मरिन अॅकॅडेमी, कोचीन. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ८०, बी.टेक- मरिन इंजिनीअिरग. प्रवेश जागा- ८०
- एचआयएमटी कॉलेज, किलपॉक, चेन्नई. अभ्यासक्रम- बी.एस्सी. इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ४०, बी.टेक- मरिन इंजिनीअिरग. प्रवेश जागा- ४०.
- हिंद इन्स्टिटय़ूट ऑफ नॉटिकल सायन्स अॅण्ड इंजिनीअिरग, नॉयडा. अभ्यासक्रम- बी.एस्सी. इन शिप बिल्डग अॅण्ड रिपेअिरग. प्रवेश जागा- ४०.
- इंटरनॅशनल मेरिटाइम इन्स्टिटय़ूट, न्यू दिल्ली. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- १२०, बी.टेक- मरिन इंजिनीअिरग, प्रवेश जागा- ४०.
- पार्क मेरिटाइम अॅकॅडेमी, कोईम्बतूर. अभ्यासक्रम- बी.टेक- मरिन इंजिनीअिरग. प्रवेश जागा- ४०.
- मेरिटाइम ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, मुंबई. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- १२०.
- मेरिटाइम ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, तुतिकोरीन. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ४०.
- पेरुंथलायवर कामराज इन्स्टिटय़ूट ऑफ मेरिटाइम सायन्स अॅण्ड इंजिनीअिरग, चिदम्बरम. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ४०.
- आर. एल. इन्स्टिटय़ूट नॉटिकल सायन्स, मदुराई. अभ्यासक्रम- बी.टेक मरिन इंजिनीअिरग. प्रवेश जागा- १२०.
- सेलर्स मेरिटाइम अॅकॅडेमी, विशाखापट्टणम. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ४०.
- समुद्र इन्स्टिटय़ूट ऑफ मेरिटाइम स्टडीज, विशाखापट्टणम. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- १२०, बी.टेक मरिन इंजिनीअिरग. प्रवेश जागा- ४०.
- श्रीराम इन्स्टिटय़ूट ऑफ मेरिटाइम स्टडीज, दिल्ली. अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ४०.
- सदर्न अॅकॅडेमी ऑफ मेरिटाइम स्टडीज.
अभ्यासक्रम- डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. प्रवेश जागा- ४०.
– सुरेश वांदीले