सांख्यिकी विषयाचे शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन उपलब्ध असणाऱ्या द इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट या जागतिक कीर्तीच्या संस्थेतील अभ्यासक्रमांचा परिचय..
द इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूटची स्थापना १९३१ साली प्रा. प्रसन्नचंद्र महालानोबीस यांनी केली. गेल्या ८० वर्षांत ही संस्था सांख्यिकी विषयाचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास वाव देणारी जागतिक कीर्तीची संस्था म्हणून नावारूपास आली आहे.
या संस्थेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेत संसदेने विशेष अधिनियम पारित करून या संस्थेस ‘इन्स्टिटय़ूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स’चा दर्जा प्रदान केला आहे. यामुळे या संस्थेस स्वतंत्ररीत्या पदवी आणि पदविका देण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
ही संस्था सांख्यिकी शास्त्रातील पदवी व पदविका देण्यासोबतच गणित, संख्यात्मक अर्थशास्त्र, संगणकशास्त्र आदी विषयातील पदवी व पदविका प्रदान करते.
या संस्थेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे आणि तेजपूर, बंगळुरू, दिल्ली आणि चेन्नई येथे विभागीय केंद्रे आहेत. गिरीध येथील केंद्र कृषी आणि सामाजिक संशोधन कार्यावर लक्ष केंद्रित करते. कोईम्बतूर, हैदराबाद, पुणे आणि मुंबई येथील केंद्रे सांख्यिकी गुणवत्ता नियंत्रण आणि कार्यान्वय संशोधन या विषयांवर लक्ष केंद्रित करते. कोलकाता येथील कॅम्पसमध्ये बहुतेक सर्व अभ्यासक्रम शिकवले जातात. तथापि, काही अभ्यासक्रम दिल्ली, बंगळुरू, तेजपूर आणि चेन्नई येथील कॅम्पसमध्येही शिकवले जातात.
या सर्व ठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी सर्वसोयींनी युक्त वसतिगृह आहे. सांख्यिकी आणि संबंधित उपयोजित विषयांवर संशोधन कार्याला वाहून घेतलेले संशोधक येथे कार्यरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करिअर संधी
या संस्थेतील अनेक माजी विद्यार्थी आज सांख्यिकी, गणित, संगणकशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत तज्ज्ञ आणि संशोधक म्हणून आपापल्या क्षेत्रात नावारूपास आले आहेत. विविध उद्योगांत या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अपूर्व यश प्राप्त केले आहे. या संस्थेतील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बडय़ा कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेन्ट उपलब्ध होतात.
या संस्थेने टाटा कन्सल्टन्सी सíव्हस, बिर्ला अ‍ॅग्रिकल्चरल युनिव्हर्सटिी, चेन्नई मॅथेमॅटिक इन्स्टिटय़ूट, डी बीअर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, डीएसटी-इन्डो जर्मन मॅक्स-प्लँक सेंटर, इकॉले पॉलिटेक्निक मॅस्ट्रो, आयबीएम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, फिको, होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट, टेक मिहद्र, आयआयटी-मद्रास, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स, नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सटिी, नॅशनल युनिव्हर्सटिी ऑफ सिंगापूर, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, मॅस्ट्रिच्ट युनिव्हर्सटिी- नेदरलँड यांसारख्या जगातील नामवंत शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक घटक यांच्यासोबत शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी सामंजस्य करार केले आहेत.

या संस्थेतर्फे चालविण्यात येणारे अभ्यासक्रम
बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स (ऑनर्स) – हा अभ्यासक्रम केवळ कोलकाता कॅम्पसमध्ये शिकवला जातो. या अभ्यासक्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, त्याच्या पूर्ततेनंतर संबंधित उमेदवारांना गणित आणि सांख्यिकी शास्त्र, संगणक शास्त्र, अर्थशास्त्र आणि तत्सम क्षेत्रे यांत उच्च शिक्षण घेणे शक्य होते. या शिवाय संशोधन आणि वैज्ञानिक संस्था, प्रयोगशाळा, विविध शासकीय संस्था आणि उद्योगांमध्ये सांख्यिकी तज्ज्ञ म्हणून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअर सुरू करता येऊ शकेल. गणित आणि इंग्रजी या विषयांसह बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
प्रवेश प्रक्रिया : प्रवेशासाठी दोन चाळणी परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये पहिली परीक्षा बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ पद्धतीची आहे. प्रश्न बारावी स्तरावरच्या गणित विषयावर बेतलेले जातात. वर्णनात्मक प्रश्न असलेली दुसरी परीक्षा घेतली जाते. यातील प्रश्नही बारावी गणितावर आधारित असतात. या परीक्षेतील कामगिरीच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड ट्रेिनग कॅम्पसाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेपासून सवलत देण्यात येते. हे ऑलिम्पियाड नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथेमॅटिक्स, डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी यांच्यामार्फत घेतले जाते. मात्र, या उमेदवारांनाही इतर उमेदवारांसारखाच या अभ्यासक्रमासाठी अर्ज करावा लागतो. या उमदेवारांची अंतिम निवड ही मुलाखतीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर होते.
बॅचरल ऑफ मॅथेमॅटिक्स (ऑनर्स)- तीन वष्रे कालावधीचा हा अभ्यासक्रम बेंगळुरु कॅम्पस येथे शिकवला जातो. या अभ्यासक्रमाची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला गणित,
सांख्यिकी, संगणकशास्त्र, गणिती भौतिकशास्त्र या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेता येणे सुलभ ठरते.
हे उमेदवार गणित विषयाचा ज्या क्षेत्रात थेट उपयोग केला जातो, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करू शकतात.
उमेदवारांच्या निवडीसाठी बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. बी.मॅथ्स या अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेला उमेदवार फक्त एकदाच बी.स्टॅट अभ्यासक्रमाच्या प्रवेश बदलासाठी विनंती करू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना संस्थेच्या अधिष्ठात्यांना लेखी अथवा admissionsupport@isical.ac.in या ई-मेलवर कळवावे लागते.

श्रीराम जिंदाल फाऊंडेशन शिष्यवृत्ती
या फाऊंडेशनमार्फत कला, तत्त्वज्ञान, विज्ञान, वाणिज्य, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, औषधशास्त्र, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, बिझनेस, अर्थशास्त्र, वित्त, कृषी, हॉस्पिटॅलिटी, वास्तूशास्त्र, फिजिओथेरपी, मायक्रोबायोलॉजी, फोरेन्सिक सायन्स, सामाजिक कार्य या विषयातील पदवी अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विषयाच्या नियमित स्वरूपाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेणे आवश्यक आहे. ही शिष्यवृती दरमहा ४०० रु. ते २ हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेत दिली जाते. पत्ता- द ट्रस्टी, श्रीराम जिंदाल फांऊडेशन, जिंदाल नगर, तुमकूर रोड, बंगळुरू- ५६००७३.
संकेतस्थळ- http://www.sitaramjindalfoundation.org
ई-मेल- scholarship.blr@sitaramjindalfoundation.org

टाटा स्कॉलरशिप/कॉन्रेल युनिव्हर्सटिी न्यूयॉर्क
कॉन्रेल युनिव्हर्सटिीमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या भारतीय विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. अर्हता- बारावी. ज्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे, तेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
दरवर्षी २० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
संपर्क- admissions.cornell.edu/ apply/ international-students/ tata-scholarship

अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन मेडिकल इमेजिंग टेक्निक
टाटा मेमोरिअल सेंटर या संस्थेने हा दोन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बी.एस्सी किंवा बी.फार्म. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वष्रे. या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने मान्यता प्रदान केली आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या काही निवडक अप्रायोजित विद्यार्थ्यांना दरमहा ९००० रुपये शिष्यवृत्ती/ विद्यावेतन दिले जाते.
संपर्क- टाटा मेमोरिअल सेंटर, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, परळ, मुंबई- ४०००१२. संकेतस्थळ- tmc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० एप्रिल २०१६