सागरी वाहतुकीदरम्यान कॅटिरग आणि हॉस्पिटॅलिटी सेवा या विषयात प्रशिक्षण प्राप्त मनुष्यबळाला असलेली वाढती मागणी लक्षात घेत या विषयाशी संबंधित वैशिष्यपूर्ण अभ्यासक्रमांची व प्रशिक्षण संस्थांची माहिती..
व्यापारी आणि प्रवासी सागरी वाहतुकीत मोठी वाढ होत आहे. ही वाहतूक सुरळीत, सुव्यवस्थित होण्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञांसोबतच इतर सेवा-सुविधा पुरवणाऱ्या कुशल मनुष्यबळाचीही गरज मोठय़ा प्रमाणावर भासत आहे. यामध्ये सागरी वाहतुकीसाठी उपयुक्त ठरू शकतील अशा कॅटिरग आणि खानपान सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचा उल्लेख करता येईल. या मनुष्यबळाची गरज वाढत असल्याने काही संस्थांनी या विषयाशी संबंधित वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या संबंधित अभ्यासक्रम आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत :
ट्रेनिंगशिप रहमान- या संस्थेने बी.एस्सी. मेरिटाइम हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. तीन वष्रे कालावधीच्या या अभ्यासक्रमाला डायरेक्टोरेट जनरल ऑफ शििपग यांची मान्यता प्राप्त आहे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतून बारावीमध्ये ५० टक्के गुण तसेच दहावी-बारावीमध्ये इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम सुरू होण्याच्या दिवशी उमेदवाराचे वय किमान साडेसतरा आणि कमाल २५ वष्रे असावे. दृष्टी उत्तम असावी. प्रवेश प्रक्रिया- या अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यातील निवडक विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. वैद्यकीय चाळणी यशस्वीरीत्या पार पाडलेल्या उमेदवारांचा विचार प्रवेशासाठी केला जातो. हा अभ्यासक्रम नाव्हा कॅम्पस येथे उपलब्ध आहे. या ठिकाणी वसतिगृहाचीही सुविधा
उपलब्ध आहे.
या अभ्यासक्रमात हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटिरग कोर्समध्ये समाविष्ट असलेल्या घटकविषयांचा समावेश करण्यात आला असला तरी त्याला सागरी प्रवासी वाहतुकीच्या गरजा, आवश्यकता, अन्नसुरक्षा, अन्नपदार्थाच्या पोषणमूल्यांचे जतन या बाबींची जोड देण्यात आली आहे. अभ्यासक्रमाच्या सहाही सत्रांत मेरिटाइम स्टडीज या विषयाचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील कौशल्य प्राप्त होऊ शकते- अन्नपदार्थ निर्मिती, खानपान सेवा, निवास आणि सुविधा व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन, संवादकौशल्य, व्यवस्थापनाची सूत्रे आणि मनुष्यबळ विकास, बेकरी पदार्थ निर्मिती, उद्योजकीय कौशल्य, अन्नसुरक्षा आणि पोषण मूल्ये संवर्धन, व्यूहात्मक व्यवस्थापन.
हा अभ्यासक्रम दर वर्षी जुल महिन्यात सुरू होतो. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.
याच संस्थेने सर्टििफकेट इन मेरिटाइम कॅटिरग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. सागरी वाहतुकीसाठी आवश्यक अशा अन्नपदार्थाची निर्मिती आणि सेवा पुरवठा या अनुषंगाने कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कार्यालयीन एटिकेट, अत्यावश्यक कौशल्ये, आवश्यक अशा यंत्रसामग्रीच्या वापराची तंत्रे आणि या कार्यासंबंधातील उत्तम दृष्टिकोनाची निर्मिती होणे अपेक्षित आहे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावीमध्ये ४० टक्के गुण आणि दहावी किंवा बारावीमध्ये इंग्रजी विषयात किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम सुरू होण्याच्या दिवशी उमेदवाराचे वय किमान साडेसतरा आणि कमाल २५ वष्रे असावे. दृष्टी उत्तम असावी. प्रवेश प्रक्रिया- या अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यातील निवडक विद्यार्थ्यांना नाव्हा येथील केंद्रात चाळणी परीक्षेसाठी बोलावले जाते. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी हे दोन टप्पे पार करावे लागतात. अंतिम निवड वैद्यकीय चाचणीनंतर केली जाते.
या अभ्यासक्रमात प्रामुख्याने अन्नपदार्थाच्या निर्मितीसाठी आवश्यक अशी उपकरणे आणि भांडय़ांचा वापर, देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षाविषयक नियम यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अन्न शिजवण्याची उद्दिष्टे, अन्नपदार्थाचे वर्गीकरण आणि निवड, अन्नपदार्थ पुन्हा गरम करण्याचे सिद्धांत, मेनू नियोजन, अन्न सुरक्षा, अन्नपदार्थाचे मूल्य, ब्रेड मेकिंग, ब्रेड रोल, पेस्ट्रीज, केक निर्मिती, अन्नपदार्थाशी संबंधित आजार, त्यांचे स्रोत, प्रसार आणि त्यापासून सावधगिरी आणि आवश्यक त्या उपाययोजना, व्यक्तिगत स्वच्छता, टेबल लेआऊट, केबिन स्वच्छता, बेड मेकिंग या विषयांचा समावेश आहे. या शिवाय भारतीय आणि पाश्चिमात्य अन्नपदार्थाची निर्मिती, सलून सेवा, पाश्चिमात्य अन्नपदार्थ वाढण्याचे व देण्याच्या साहित्याची हाताळणी आदींचे प्रात्यक्षिक दिले जाते. या शिवाय आवश्यक असे माहिती-तंत्रज्ञान कौशल्यसुद्धा प्राप्त करून दिले जाते. अभ्यासक्रमाचा कालावधी २५ आठवडे आहे.
संपर्क- द कॅप्टन, सुपरिंटेन्डन्ट, ट्रेिनग शिप रहमान, सर मोहम्मद युसुफ सिमेन वेल्फेअर फाऊंडेशन, जहाज महाल अनेक्स १७० के, समंदर पॉइंट इस्टेट, वरळी, मुंबई- ४०००१९.
प्रशिक्षण केंद्र- न्हावा, तालुका- पनवेल, जिल्हा- रायगड.
ईमेल- booking.cmch@tsrahaman.org
संकेतस्थळ- http://www.tsrahaman.org
ओशन मेरिटाइम अॅकॅडेमी- या संस्थेने बी.एस्सी. इन मेरिटाइम हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- तीन वष्रे. या अभ्यासक्रमाला डायरोक्टोरेट जनरल ऑफ शििपग यांनी मान्यता प्रदान केली आहे. अर्हता- कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह बारावी आणि दहावी-बारावीमध्ये इंग्रजी विषयामध्ये ५० गुण. वयोमर्यादा- २५ वष्रे. सागरी वातावरणात काम करू शकेल अशी शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असावा. पत्ता- सी-२७, एमआयडीसी शिरोळी, कोल्हापूर- ४१६१२२. संकेतस्थळ- http://www.ocenmarinecademy.com
ईमेल- info@oceanmarineacademy.com
कोइम्बतूर मरिन कॉलेज- या संस्थेने तीन वष्रे कालावधीचा बी.एस्सी. इन मेरिटाइम हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा निवासी स्वरूपाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला डायरेक्टारेट जनरल ऑफ शििपगची मान्यता प्राप्त आहे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावीमध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. पदवी भारतीयार विद्यापीठामार्फत दिली जाते. वैद्यकीय चाळणीनंतर प्रवेश अंतिम केला जातो. संपर्क- २९६, पोल्लाची मेन रोड, मायलेरिपाल्यायाम ओथक्कलमंडपम, कोईम्बतूर- ६४१०३२. संकेतस्थळ- cmcinfo@cms.ac.in
बी.पी. मेरिटाइम अॅकॅडेमी- या संस्थेने सर्टििफकेट कोर्स इन मेरिटाइम कॅटिरग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही शाखेतील ४० टक्के गुणांसह बारावी. वयोमर्यादा- साडेसतरा ते २५ वष्रे. पत्ता- साईपूजा चेम्बर्स, सेक्टर-११, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४. आणि बी.पी.मरिन अॅकॅडेमी, जुने पनवेल, कोर्टाजवळ, जिल्हा रायगड.
संकेतस्थळ- http://www.bpmarineacademy.in
ईमेल- bpmarine.academy@gamil.com
अॅकॅडेमी ऑफ मेरिटाइम एज्युकेशन अॅण्ड ट्रेिनग- या संस्थेने बी.एस्सी. इन मरिन कॅटिरग हा तीन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्रवासी व व्यापारी जहाजावरील आतिथ्यसेवेशी संबंधित कौशल्याची निर्मिती, सागरी वातावरणाला पूरक अशा अन्नपदार्थाची ओळख, सागरी पर्यावरणाशी निगडित अन्न सवयी, पर्यावरणीय संवर्धन आणि सुरक्षा विषयक आंतरराष्ट्रीय नियामकांची माहिती करून देणे, वित्तीय नियोजनाची तत्त्वे समजावून सांगणे, व्यवस्थापकीय कौशल्याची निर्मिती करणे या बाबी या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा