जोमाने वाढणाऱ्या इव्हेन्ट मॅनेजमेन्ट या क्षेत्रातील करिअर संधींचा आणि या क्षेत्राशी संबंधित वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमांचा घेतलेला वेध..
इव्हेन्ट मॅनेजमेंट या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या उद्योग- व्यवसायांपकी एक महत्त्वाचा उद्योग मानला जातो. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पुढील एक-दोन वर्षांत या उद्योगाची वार्षकि उलाढाल ५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. इतर उद्योगक्षेत्रांत मंदीचे वातावरण असताना या क्षेत्राची वार्षकि वाढ मात्र १४ ते १५ टक्के आहे. त्यातही वेिडग इव्हेन्ट प्लॅिनग क्षेत्रातील वाढ अधिक दिसून आली आहे.
या क्षेत्रातील उलाढाल १८०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राला नवी झळाळी मिळत असून निर्मिती, प्रदर्शने, विपणन आदी सर्व बाबतीत अधिकाधिक सफाईदारपणा आणि व्यावसायिकता आली आहे.
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने इव्हेन्ट मॅनेजमेंट या अभ्यासक्रमास कौशल्य विकास अभ्यासक्रम म्हणून मान्यता प्रदान करण्याची मागणी आता होत आहे. काही इव्हेन्ट कंपन्यांची वार्षकि वाढ १०० टक्क्यांहून अधिक आहे. व्यक्तिगत आणि कॉर्पोरेट इव्हेन्ट्समध्ये सातत्याने होणारी वाढ, व्यक्तिगत इव्हेन्ट्समध्ये सढळ हाताने केला जाणारा खर्च, थीम पार्टी आयोजित करण्याकडे व्यक्तिगत आणि कॉर्पोरेट ग्राहकांचा वाढलेला कल यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत.
संभाव्य संधींचा विचार केल्यास या क्षेत्रातील विविध कालावधीचे अभ्यासक्रम करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. इव्हेन्ट मॅनेजमेंटद्वारे ग्राहकांशी थेट संपर्क साधता येत असल्यामुळे अनेक कंपन्याही लहानसहान बाबींच्या आयोजनासाठी इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपन्यांची मदत घेतात. विविध चित्रवाहिन्यांवरील रिअॅलिटी शो, पुरस्कार प्रदान समारंभ आदींच्या आयोजनाची जबाबदारी अशा कंपन्यांकडे दिली जाते.
या अशा विविध प्रकारचे सोहळे साजरे करण्याचे कौशल्य व तंत्र भारतीय इव्हेन्ट मॅनजमेंट कंपन्यांनी प्राप्त केले असून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही या क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांच्या कौशल्याची दखल घेण्यात येत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सोहळ्यांच्या, परिषदांच्या आयोजनाची जबाबदारी भारतीय कंपन्यांना प्राप्त होऊ लागली आहे.
‘इव्हेन्ट मॅनेजमेन्ट’मधील करिअर संधी
जोमाने वाढणाऱ्या इव्हेन्ट मॅनेजमेन्ट या क्षेत्रातील करिअर संधींचा आणि या क्षेत्राशी संबंधित वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमांचा घेतलेला वेध..
Written by सुरेश वांदिले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-05-2016 at 06:04 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career opportunities in event management