फुलांच्या शेतीला मोठी मागणी असून यासंबंधित करिअरमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती देत आहेत..
भारतात पुष्पशेती या उद्योगाच्या परिघात फुलांची विक्री, नर्सरीसाठी आवश्यक असणाऱ्या झाडांची निर्मिती, फुलांच्या बी-बियाणांची निर्मिती, खाद्यतेलांची निर्मिती या बाबींचा समावेश होतो. देशात फुलांची मागणी वार्षकि २५ टक्क्यांनी वाढत आहे. देशातील विविध पर्यावरणीय क्षेत्रांत येणारा भूभाग, वेगवेगळ्या प्रकारचे कृषी हवामान, वेगवेगळ्या भागांत सापडणाऱ्या व उगवू शकणाऱ्या फुलांच्या असंख्य प्रजाती, मुबलक मनुष्यबळ यांमुळे देशात पुष्पशेतीच्या विकासाला चालना मिळू शकते. केंद्र सरकारने पुष्पशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. निर्यातप्रधान फुलशेतीला चालना देण्यासाठी पुणे, बेंगळुरू, नवी दिल्ली, हैदराबाद या केंद्रांवर सरकारने लक्ष केंद्रित केले असून अॅग्रिकल्चरल अॅण्ड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स अॅण्ड एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी- अपेडा या संस्था याकरता विशेष कार्यरत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शिक्षण-प्रशिक्षण :
या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फुलांच्या लागवडीची मनापासून आवड असायला हवी. फुलांच्या शेतीचे शास्त्रीय प्रशिक्षण घेणे फायदेशीर ठरू शकते. पदवी स्तरावर पुष्पशेती (फ्लोरिकल्चर) हा विषय स्पेशलायझेशनसाठी उपलब्ध नाही. पुष्पशेतीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी उद्यानशास्त्रात बी.एस्सी. किंवा कृषीशास्त्रात बी.एस्सी. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे संयुक्तिक ठरेल. त्यानंतर एम.एस्सी. स्तरावर फ्लोरिकल्चरमध्ये स्पेशलायझेशन करण्याची सुविधा काही कृषी विद्यापीठांनी उपलब्ध करून दिली आहे. काही विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पुष्पशेतीशी संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बी.एस्सी. कृषी किंवा हॉर्टकिल्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायशास्त्र या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. एम.एमस्सी. इन हॉर्टकिल्चर या विषयाच्या प्रवेशासाठी बी.एस्सी. कृषी/ हॉर्टकिल्चर ही अर्हता आणि पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एम.एस्सी. कृषी/ हॉर्टकिल्चर अर्हता आवश्यक ठरते. बी.एस्सी. कृषी/ हॉर्टकिल्चर या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वष्रे तर एम.एस्सी. कृषी/ हॉर्टकिल्चर या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वष्रे असतो. प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा कालावधी सहा महिने ते एक वर्ष असतो. पदवी अभ्यासक्रमांसाठी चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इंडियन कौन्सिल फॉर अॅग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेमार्फत अखिल भारतीय स्तरावर चाळणी परीक्षा घेतली जाते.
करिअर संधी :
या विषयात कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना पुढील करिअर संधी मिळू शकतात- फार्म किंवा इस्टेट मॅनेजर, प्लान्टेशन तज्ज्ञ, पर्यवेक्षक, प्रकल्प समन्वयक, संशोधन अध्यापन, पुष्पविक्री व्यवस्थापन, सल्लागार, पुष्पनिर्मिती उद्यान उद्योजक, फुलांचे डिझायनर, हॉर्टकिल्चरल थेरपिस्ट. प्रत्यक्ष शेती, आऊट डोअर डिझाइन कन्सल्टन्सी फम्र्स, बगीचे अथवा उद्यानांची देखभाल व इतर बाबींचे नियंत्रण करण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासते. अत्तर आणि सुंगधी द्रव्ये निर्मिती क्षेत्रात या तज्ज्ञांना उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. पुष्पशेतीच्या ज्ञानास व्यवस्थापकीय कौशल्याची जोड दिल्यास फूल प्रक्रिया विक्री उद्योगात व्यवस्थापकीय पदे मिळू शकतात. फ्लॉरिकल्चर विषयात पीएच.डी. केल्यास विविध कंपन्या आणि कॉर्पोरेट्सच्या संशोधन आणि विकास विभागामध्ये वैज्ञानिक म्हणूनही
करिअर करता येते.
शिक्षण संस्था :
तामिळनाडू कृषी विद्यापीठ : या विद्यापीठाने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रॉडक्शन अॅण्ड क्वालिटी कंट्रोल इन मेडिसीनल प्लँट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. अर्हता- पदवी. संपर्क- http://www.tnau.ac.in
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे- या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालयांमध्ये बी.एस्सी. हॉर्टकिल्चर (उद्यानविद्या) हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- चार वष्रे. १. उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे, ता. कुडाळ, जिल्हा-सिंधुदुर्ग. २. उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली. ३. उद्यानविद्या महाविद्यालय परभणी. ४. उद्यानविद्या महाविद्यालय अकोला. ५. उद्यानविद्या महाविद्यालय शिवाजीनगर, पुणे.
एम.एस्सी. उद्यानविद्या या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्हता- बी.एस्सी.- उद्यानविद्या किंवा बी.एस्सी.- वनशास्त्र किंवा बी.एस्सी. कृषी. या विषयांतर्गत- फळशास्त्र हा अभ्यासक्रम राहुरी, धुळे, अकोला, परभणी, लातूर आणि दापोली बदनापूर येथे करता येतो. भाजीपालाशास्त्र- हा अभ्यासक्रम राहुरी, कोल्हापूर, अकोला, परभणी, लातूर आणि दापोली येथे करता येतो. फूलशेती व प्रांगण सुशोभीकरण आरेखन हा अभ्यासक्रम पुणे, नागपूर आणि परभणी येथे करता येतो. या विषयात स्पेशलायझेशन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क संकेतस्थळ- http://www.mcaer.org,
maha-agriadmission.in
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ प्लँट हेल्थ मॅनेजमेंट : या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लँट हेल्थ मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत बायोसिक्युरिटी अॅण्ड इन्कर्शन मॅनेजमेंट, पेस्टिसाइड मॅनेजमेंट, बायोकंट्रोल एजंट्स प्रॉडक्शन मॅनेजमेंट, व्हर्टब्रिेट अॅण्ड स्ट्रक्चरल पेस्ट मॅनेजमेंट, प्लँट हेल्थ इंजिनीअिरग या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. अर्हता- कृषी किंवा उद्यानशास्त्र या विषयातील पदवी. कालावधी- एक वर्ष.
संस्थेने सहा महिने कालावधीचे पुढील पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत- डिप्लोमा इन प्लँट हेल्थ मॅनेजमेंट, डिप्लोमा इन बायोसिक्युरिटी अॅण्ड इन्कर्शन मॅनेजमेंट, डिप्लोमा इन पेस्टिसाइड मॅनेजमेंट, डिप्लोमा इन बायोकंट्रोल इनपुट प्रॉडक्शन मॅनेजमेंट, डिप्लोमा इन व्हर्टब्रिेट अॅण्ड स्ट्रक्चरल पेस्ट मॅनेजमेंट, प्लॅन्ट हेल्थ इंजिनीअिरग. संपर्क- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ प्लँट हेल्थ मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद- ५०००३०.
संकेतस्थळ- niphm.gov.in ईमेल- niphm@nic.in
डिप्लोमा प्रोग्रॅम इन व्हेटर्नरी फार्मसी
उत्तर प्रदेश पंडित दीनदयाल उपाध्याय पशू चिकित्सा विज्ञान विश्वविद्यालय आणि गो अनुसंधान या संस्थेने डिप्लोमा प्रोग्रॅम इन व्हेटर्नरी फार्मसी हा अभ्याक्रम सुरू केला आहे. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयांसह बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाचा प्रारंभ २ ऑगस्ट २०१६ पासून होणार आहे.
संपर्क- पंडित दीनदयाल उपाध्याय पशू चिकित्सा विज्ञान विश्वविद्यालय आणि गो अनुसंधान, मथुरा- २८१००१.
संकेतस्थळ- http://www.upvetuniv.edu.in
शिष्यवृत्ती
ऑक्सफर्ड आणि केंब्रिज सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांमार्फत इंग्लडमधील केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात अर्थसाहाय्य केले जाते. केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना चार लाख रुपये, केंब्रिज विद्यापीठाच्या इम्यॅन्युएल कॉलेजमध्ये आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट हिल्डा कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. संपर्क- http://www.oxbridgeindia.com/ scholarships ईमेल- scholarship@ oxbridgeindia.com