भारतीय मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रांतील नवनव्या संधींचा मागोवा आणि या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची ओळख..

भारतातील विविध माध्यमे आणि मनोरंजन उद्योगांचा समावेश सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या उद्योगांमध्ये होतो. फिक्की या संस्थेच्या निरीक्षणानुसार या उद्योगांची वार्षकि वाढ १३ ते १४ टक्क्यांहून अधिक आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

भारतीय मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रांत थेट परकीय गुंतवणुकीस केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दूरचित्रवाणी उद्योगाची वाढ वार्षकि १५ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. डीटीएच सेवा उद्योगही अल्पावधीतच दुप्पट झाला आहे. थ्रीजी आणि फोरजीच्या आगमनामुळे मोबाइल टीव्हीच्या क्षेत्रात क्रांतिकारक वृद्धी अपेक्षित आहे. गेल्या दशकात दूरचित्रवाहिनीवरून जाहिरात करणाऱ्या विविध कंपन्यांच्या ब्रँडमध्ये ८० टक्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. आता इंटरनेट, मोबाइल आणि इतर डिजिटल साधनांचा जाहिरातींसाठी वापर केला जात आहे. समाजमाध्यमांनी जाहिरातींसाठी नवे व प्रभावी माध्यम उपलब्ध करून दिले आहे. संगीत क्षेत्रात डिजिटल तंत्राचा अत्याधिक वापर होत असल्याने या क्षेत्राने उंच झेप घेतली आहे. डिजिटल डाऊनलोड्स, िरगटोन्स, डिजिटल म्युझिक, मोबाइल म्युझिक हे आता या क्षेत्रातील परवलीचे शब्द झाले आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील अ‍ॅनिमेशन क्षेत्राने साधलेली प्रगती चकित करणारी आहे. आशिया खंडातील अ‍ॅनिमेशन हब (प्रमुख केंद्र) होण्याच्या दिशने भारताची दमदार वाटचाल सुरू आहे. गेिमग, व्हीएफएक्स (व्हिज्युएल इफेक्ट) तंत्रज्ञान यांची वेगाने वाढ होत आहे. मुद्रित माध्यमे आणि प्रकाशने या क्षेत्रातील वार्षकि वाढ  ६ टक्क्यांच्या आसपास आहे. जगात वर्षांकाठी सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा देश म्हणून भारताने नावलौकिक प्राप्त केला आहे. थेट परकीय गुंतवणूक येऊ लागल्याने या उद्योगाची भरभराट होत आहे.

भारतीय माध्यमांचे उत्तम नियमन व संनियंत्रण, दर्जेदार साहित्य निर्मिती, स्पर्धात्मक मूल्य, वाढते ग्राहक, नावीन्यपूर्णरीत्या विक्री व विपणनाचे कार्यपद्धती, तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर, प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळे भारतीय मनोरंजन आणि माध्यम उद्योगाच्या वाढीस चालना मिळाली आहे.

करिअर संधी- या क्षेत्रातील करिअर संधी- ल्लदूरचित्रवाहिनी, रेडिओ, चित्रपट, व्हिडीओ गेम्स, ब्लॉग्ज, फोरम, संगीत, पुस्तक प्रकाशने, वृत्तपत्रे, नियतकालिके यांत संधी मिळू शकतात. * शासकीय माध्यमांमध्ये दूरदर्शन, आकाशवाणी, फोटो डिव्हिजन, पत्र सूचना कार्यालय, प्रकाशने, रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स, अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड व्हिज्युअल पब्लिसिटी (डीएव्हीपी), संगीत आणि नृत्य विभाग, फिल्म डिव्हिजन, नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया, फिल्म फेस्टिव्हल संचालनालय, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, केंद्रीय सेंसार बोर्ड, बाल चित्रपट संस्था यासारख्या संस्था/ कार्यालयांमध्ये विविध प्रकारच्या संधी मिळू शकतात. ल्लमोठय़ा प्रकाशनगृहांद्वारे विविध वृत्तपत्रे, मासिके आणि यांच्या इंटरनेट आवृत्त्या प्रकाशित केल्या जातात. त्यांना सर्व प्रकारच्या मनुष्यबळाची  गरज भासते. ल्लचित्रपट आणि टीव्हीच्या क्षेत्रात अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या तंत्रज्ञांची-मनुष्यबळाची गरज भासत आहे. कथा, पटकथा, संवादलेखन, जाहिरात मसुदा लेखन, छायाचित्रण, ध्वनीमुद्रण, ध्वनीमिश्रण, संपादन, संगीत नियोजन, पाश्र्वसंगीत संयोजन, दिग्दर्शन, नेपथ्य, स्टायलिस्ट, चित्रपट जनसंपर्क, चित्रपट जाहिरात आदी बाबींचा समावेश करता येतो.

शिक्षण संस्था :

  • फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया- संस्थेचे अभ्यासक्रम-

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन डायरेक्शन अ‍ॅण्ड स्क्रीनप्ले रायटिंग. कालावधी- तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. हा अभ्यासक्रम चित्रपट क्षेत्रासाठी तयार करण्यात आला आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट सर्टििफकेट कोर्स इन डायरेक्शन. कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. हा अभ्यासक्रम टीव्ही माध्यमातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. दोन्ही अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. संपर्क- फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे- ४११००४.

संकेतस्थळ- www.ftiindia.com

  • व्हिसिलग वूड्स इंटरनॅशनल- संस्थेच्या पदवीस्तरीय अभ्यासक्रमांसाठी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेचे सहकार्य घेण्यात आले आहे. चित्रपट आणि टीव्ही उद्योगात करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे विविध अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत..

*बी.ए. इन म्युझिक प्रॉडक्शन अ‍ॅण्ड कम्पोझिशन.

कालावधी- ३ वष्रे. अर्हता- बारावी उत्तीर्ण.

*बी.एस्सी./ बी.ए. इन अ‍ॅनिमेशन विथ स्पेशलायझेशन इन टूडी अ‍ॅनिमेशन फिल्ममेकिंग/ थ्रीडी अ‍ॅनिमेशन फिल्ममेकिंग/ कॉमिक बुक डिझाइन/ व्हिडीओ गेम डिझाइन.

*बी.ए. इन स्क्रीन रायटिंग.

*बी.एस्सी./ बी.ए. इन फिल्ममेकिंग विथ स्पेशलायझेशन इन-डायरेक्शन/ एडिटिंग/ प्रॉडक्शन/ स्क्रीन रायटिंग/ साऊंड रेकॉìडग अ‍ॅण्ड डिझाइन.

ई-मेल- www.whistlingwoods.net

admissions@whistlingwoods.net

  • स्कूल ऑफ ब्रॉडकॉिस्टग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन- अंधेरीस्थित संस्थेचा अभ्यासक्रम- एम.ए. इन ब्रॉडकॉस्ट जर्नलिझम. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.

संकेतस्थळ- www.sbc.ac.in  ईमेल- info@sbc.ac.in

  • डब्ल्यूएलसीआय (विगॅन अ‍ॅण्ड लेह कॉलेज इंडिया)- लोअर परळ येथील या संस्थेचे अभ्यासक्रम-

*बी.ए. ऑनर्स इन मीडिया प्रॉडक्शन. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. कालावधी- चार वष्रे.

*अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन मीडिया प्रॉडक्शन. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. कालावधी- तीन वष्रे. संकेतस्थळ- wlci.in  ईमेल-enquiry.wlci.in

  • अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल ऑफ फिल्म अ‍ॅण्ड मीडिया- हैदराबाद येथील या संस्थेचे अभ्यासक्रम-

*बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन फिल्म मेकिंग. कालावधी-चार वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. तिसऱ्या वर्षी साऊंड डिझाइन किंवा एडिटिंग किंवा सिनेमॅटोग्रॅफी यापकी कोणताही एक विषय स्पेशलायझेशनसाठी निवडता येतो. ही पदवी, जवाहरलाल नेहरू आíकटेक्चर अ‍ॅण्ड फाइन आर्ट्स युनिव्हर्सटिी हैदराबादमार्फत दिली जाते.

* बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन (अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड डिजिटल मार्केटिंग.)   कालावधी- चार वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण.  संकेतस्थळ- www.aisfm.edu.in ई-मेल- info@aisfm.edu.in

* एम.जी.आर. गव्हर्नमेंट फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट- संस्थेचे अभ्यासक्रम-

* डिप्लोमा इन डायरेक्शन, स्क्रीनप्ले रायटिंग अ‍ॅण्ड टेलिव्हिजन प्रॉडक्शन. कालावधी- ३ वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.

  • डिप्लोमा इन फिल्म टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड टेलिव्हिजन प्रॉडक्शन (साऊंड रेकॉìडग अ‍ॅण्ड साऊंड इंजिनीअिरग). कालावधी- ३ वष्रे. अर्हता- भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयासह बारावी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग. संपर्क- सीआयटी कॅम्पस, चेन्नई- ६००११३. संकेतस्थळ- tn.gov.in

 

 

 

Story img Loader