कला आणि तंत्रज्ञानाचा उत्तम संयोग असणाऱ्या सिनेछायाचित्रणाच्या अभ्यासक्रमाविषयी

जागतिक कीर्तीचे सिनेछायाचित्रकार स्वेन निक्विस्ट यांनी सिनेछायाचित्रण कलेचे वर्णन हे प्रकाशाच्या सहाय्याने काढलेले पेंटिग्ज, असे केले आहे. हे वर्णन अगदी वस्तुनिष्ठ असून अनेक अभिजात सिनेमांच्या सिनेछायाचित्रकारांनी ते सिद्धही केले आहे. सिनेछायाचित्रण कला ही सर्जनशील कला जशी आहे तद्वतच त्यात उच्च श्रेणीचे तंत्रज्ञानही दडलेले आहे. उत्कृष्ट सिनेछायाचित्रणकारास इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, रसायने यांची उत्तम जाण असणे गरजेचे ठरते.

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
loksatta kutuhal artificial intelligence for scientific data analysis
कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

कला आणि तंत्रज्ञानाचा उत्तम असा संयोग सिनेछायाचित्रणात बघायला मिळतो. हा तज्ज्ञ दिग्दर्शकाचा डोळा म्हणून कार्यरत असतो. देशविदेशातील भव्य चित्रपटांच्या यशात सिनेछायाचित्रकारांचा मोठा हातभार लागल्याचे दिसून येते. दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या कामगिरीला हे सिनेछायाचित्रकार चार नव्हे तर आठ चाँद लावतात. गेल्या काही वर्षांत तर सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात या तंत्रज्ञांनी मोठी कामगिरी बजावली आहे. दृश्यस्वरूपातील कथेचे सादरीकरण हे तंत्रज्ञ आपल्या कौशल्यातून करत असतात. सिनेमानिर्मितीच्या क्षेत्रात सिनेछायाचित्रकारांचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन या विषयाचे अभ्यासक्रम विविध संस्थांनी सुरू केले आहेत.

काही संस्था :

  • फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया- संस्थेचे अभ्यासक्रम- ल्लपोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन फिल्म. कालावधी-तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या अभ्यासक्रमात सिनेमॅटोग्रॅफी या विषयामध्ये स्पेशलायझेशन करता येते. ल्लपोस्ट ग्रॅज्युएट सर्टििफकेट कोर्स इन टेलिव्हिजन. कालावधी- एक र्वष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या अभ्यासक्रमात टीव्ही माध्यमातील कार्यक्रमांच्या चित्रीकरणासाठी ज्या पद्धतीचे छायाचित्रण करण्याची गरज असते त्याचे प्रशिक्षण दिले जाते. इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफी असे या अभ्यासक्रमांतर्गत स्पेशलायझेशनला संबोधले जाते.

निवड प्रकिया- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लेखी परीक्षा घेतली जाते. परीक्षेचा कालावधी तीन तास. या पेपरमध्ये १०० गुणांचे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न संबंधित उमेदवाराची क्षमता, कल, सर्जनशीलता, चित्रपट माध्यमाची जाण, कार्यकारण भाव, भाषा कौशल्य, सामान्य घडामोडी, तंत्रज्ञानाबाबतची जागृती, सामाजिक प्रश्नाविषयी जाणीव, सहकार्याची भावना या बाबी घेण्याच्या अनुषंगाने विचारले जातात. लेखी परीक्षेच्या गुणांवर आधारित प्रारंभी उमेदवारांची निवड केली जाते. त्यानंतर पुणे येथे ओरिएंटेशन आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते. या तीनही घटकांमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित अंतिम निवड यादी तयार केली जाते.

संपर्क- फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे- ४११००४. संकेत स्थळ-  http://www.ftiindia.com

  • एम. जी. आर गव्हर्नमेंट फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटचे अभ्यासक्रम- ल्लडिप्लोमा इन फिल्म टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड टेलिव्हिजन प्रॉडक्शन (सिनेमॅटोग्राफी). कालावधी- ३ वष्रे. अर्हता- भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयासह १२वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग. ल्लडिप्लोमा इन फिल्म टेक्नॉलॉजी (अ‍ॅनिमेशन अ‍ॅण्ड व्हिज्युएल इफेक्ट्स). कालावधी- ३ वष्रे. अर्हता- बॅचलर ऑफ फाइन आर्टस किंवा बी.एस्सी इन (व्हिज्युएल इफेक्ट्स किंवा अ‍ॅनिमेशन किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा मास कम्युनिकेशन. उमेदवारांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा. कलचाचणी घेतली जाते. संपर्क- सीआयटी कॅम्पस, थारामणी, चेन्नई- ६००११३. संकेतस्थळ- http://www.tn.gov.in
  • सत्यजित रे फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटचा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन सिनेमा अभ्यासक्रम. याअंतर्गत सिनेमॅटोग्राफी या विषयामध्ये स्पेशलायझेशन करता येते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संबंधित विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षा द्यावी लागते. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- तीन वष्रे. संपर्क- सत्यजित रे फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट,

ई.एम. बायपास रोड, पोस्ट ऑफिस- पंचासायार,कोलकता- ७०००९४. संकेतस्थळ- srfti.ac.in

  • व्हिसिलग वूड्स इंटरनॅशनलचा बी.एस्सी/ बी.ए इन फिल्ममेकिंग वुइथ स्पेशलायझेशन इन सिनेमॅटोग्राफी अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमासाठी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेचे सहकार्य घेण्यात आले आहे. कालावधी- ३ वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या संस्थेने डिप्लोमा इन फिल्ममेकिंग वुइथ स्पेशलायझेशन इन सिनेमॅटोग्राफी हा अभ्यासक्रमही सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. संपर्क- फिल्मसिटी कॉम्प्लेक्स, गोरेगाव- पूर्व, मुंबई- ४०००६५.

ईमेल- admissions@whistlingwoods.net,

संकेतस्थळ- www.whistlingwoods.net

  • एशियन अ‍ॅकॅडेमी ऑफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन (एएएफटी) स्कूल ऑफ सिनेमाचे अभ्यासक्रम ल्लबी.एस्सी इन सिनेमा अ‍ॅण्ड डिप्लोमा इन सिनेमॅटोग्राफी. अर्हता- कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण. कालावधी- तीन वष्रे. ल्लएम. एस्सी इन सिनेमा अ‍ॅण्ड डिप्लोमा इन सिनेमॅटोग्राफी- अर्हता- बी.एस्सी इन सिनेमा अ‍ॅण्ड डिप्लोमा इन सिनेमॅटोग्राफी. कालावधी- दोन वष्रे. संपर्क- मारवाह स्टुडिओ कॉम्प्लेक्स, एफसी-१४/ १५, फिल्म सिटी, सेक्टर-१६ ए, नॉयडा उत्तर प्रदेश, संकेतस्थळ- aaft.com ईमेल- help@aaft.com
  • डिजिटल अ‍ॅकॅडेमी (द फिल्म स्कूल)चा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन सिनेमॅटोग्राफी अभ्यासक्रम. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- एक र्वष. संपर्क- हेड ऑफिस सेंटर अ‍ॅण्ड स्टुडिओ, प्लाट नंबर, सी-३, स्ट्रीट नंबर-११, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ९३.

ईमेल- response@dafilmschool.com, संकेतस्थळ –  http://www.dafilmschool.com

  • झी इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया आर्ट्स या संस्थेने सहा महिने कालावधीचा सिनेमॅटोग्रॅफीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. संपर्क- ३, आशिकी बंगला, शास्त्रीनगर पहिली गल्ली, एचडीएफसी बँकेच्या विरुद्ध दिशेला, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी-पश्चिम, मुंबई- ४०००५३.

संकेतस्थळ- http://www.zimainstitute.com/ cinematography

  • इन्स्टिटय़ूट ऑफ क्रिएटिव्ह एक्सलंस संस्थेचा सिनेमॅटोग्राफी विषयाचा अभ्यासक्रम. संपर्क- तळ मजला, लोडस्टार बििल्डग, किल्लिक निक्सन कम्पाउंड, साकी विहार रोड, चांदिवली पेट्रोल पंपाजवळ, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००७२. संकेतस्थळ- http://www.theiceinstitute.com/ courses-cinematography.php
  • मुंबई फिल्म अ‍ॅकॅडेमी- संस्थेचे बेसिक फाउंडेशन कोर्स इन सिनेमॅटोग्रॅफी, अ‍ॅडव्हान्स्ड सिनेमॅटोग्राफी आणि प्रोफेशनल डिप्लोमा कोर्स इन सिनेमॅटोग्राफी अभ्यासक्रम. संपर्क- बंगला नंबर- ४०, एसव्हीपी नगर, वर्सोवा दूरध्वनी केंद्र, लोखंडवाला, अंधेरी-पश्चिम, मुंबई- ४०००५३.

संकेतस्थळ- http://www.mumbaifilmacademy.co,

ईमेल- mumbaifilmacademy@gmail.com

  • सेंटर फॉर रिसर्च इन आर्ट ऑफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन- संस्थेचा एक र्वष कालावधीचा सिनेमॅटोग्राफी अभ्यासक्रम. संपर्क- सेंटर फॉर रिसर्च इन आर्ट ऑफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन फिल्म स्कूल, २७२, कार मार्केट, सेक्टर- ७, न्यू दिल्ली- ११००८५. संकेतस्थळ- http://log2craft.org,

ईमेल-  info@log2craft.org