शास्त्रीय नृत्याचे रीतसर प्रशिक्षण देणाऱ्या आघाडीच्या संस्थांतील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..
शास्त्रीय नृत्यकौशल्य आत्मसात केल्यास करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. मात्र, त्याकरता शास्त्रीय नृत्याची मनापासून आवड आणि अत्यंत परिश्रम करण्याची तयारी महत्त्वाची ठरते. नृत्य विषयक प्रशिक्षण देणाऱ्या काही आघाडीच्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत..
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कथ्थक डान्स : ही संस्था केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी देशातील सर्वात आघाडीची संस्था मानली जाते. कथ्थक नृत्याच्या समृद्ध परंपरेची जोपासना आणि प्रशिक्षण देणारी ही संस्था १९६४ साली सुरू झाली. या कथ्थक केंद्रात प्रतिभावंत कथ्थक गुरूंमार्फत नव्या कलावंतांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात कला, कौशल्य आणि कल यांचा समन्वय साधला जातो. या केंद्रात कथ्थक नृत्याच्या दोन प्रवाहांवर भर दिला जातो.
संस्थेचे अभ्यासक्रम : प्राथमिक (एलिमेंटरी) अभ्यासक्रम- या अभ्यासक्रमांतर्गत पाच वष्रे कालावधीच्या फाऊंडेशन अभ्यासक्रमाचा आणि तीन वष्रे कालावधीच्या पदविका अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
* प्रगत अभ्यासक्रम- यात तीन वष्रे कालावधीचा पदविका (ऑनर्स) अभ्यासक्रम आणि दोन वष्रे कालावधीचा पोस्ट डिप्लोमा अभ्यासक्रम यांचा समावेश आहे.
* तीन वष्रे कालावधीचा डिप्लोमा पास कोर्स- या अभ्यासक्रमात कथ्थक नृत्याच्या व्यापक तंत्रावर लक्ष केंद्रित केले जाते. वयोमर्यादा- १ जून रोजी १५ ते २० वर्षांदरम्यान असावे. अर्हता- किमान नववी उत्तीर्ण. हिंदी किंवा इंग्रजीमध्ये या विद्यार्थ्यांस लिहिता, वाचता आणि बोलता यायला हवे. विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असावे. प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
प्रगत अभ्यासक्रमात गुरूंच्या मार्गदर्शनाखाली दररोज कथ्थक नृत्याचा सराव, योगाभ्यास, हिंदुस्थानी कंठसंगीत आणि तबला/ पखवाजचे प्रशिक्षण, तज्ज्ञांच्या कार्यशाळा, सादरीकरणाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी, सर्जनशील सादरीकरण या बाबींचा समावेश करण्यात येतो.
तीन वष्रे कालावधीच्या डिप्लोमा ऑनर्स या अभ्यासक्रमात कथ्थक सादरीकरण कौशल्याचा पाया मजबूत करणारे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणास योग, हदुस्थानी कंठसंगीत, तबला/ पखवाज आणि अभिनय कला यांच्या प्रशिक्षणाचीही जोड दिली जाते. वयोमर्यादा- १ जून रोजी १८ ते ३० वष्रे.
अर्हता- कथ्थक केंद्राच्या पदविका परीक्षेमध्ये ६० टक्के गुण किंवा इतर गुरूंकडे प्रशिक्षण घेतले असल्यास किमान आठ वर्षांचे प्रशिक्षण घेतलेले असावे. उमेदवाराला िहदी अथवा इंग्रजीमध्ये लिहिता, वाचता, बोलता यायला हवे. त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असावे.
दोन वष्रे कालावधीच्या पोस्ट डिप्लोमा अभ्यासक्रमात परिपूर्ण कथ्थक नृत्य सादरकर्ता बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. वयोमर्यादा- १ जून रोजी २० ते २६ वष्रे. अर्हता- बारावी, कथ्थक केंद्राच्या डिप्लोमा ऑनर्स परीक्षेत ६५ टक्के गुण आणि इतर सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण. हिंदी किंवा इंग्रजीमध्ये लिहिता, बोलता, वाचता यायला हवे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असावे. नृत्यातले सादरीकरण आणि संगीतातील कलचाचणी घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
फी- फाऊंडेशन- दरमहा २५० रुपये. डिप्लोमा पास- दरमहा- ३०० रुपये, डिप्लोमा ऑनर्स- दरमहा ३५० रुपये, पोस्ट डिप्लोमा दरमहा- ४५० रुपये.
संपर्क- कथ्थक केंद्र, २, सॅन मार्टनि मार्ग, चाणक्यपुरी, न्यू दिल्ली- ११००२१. संकेतस्थळ- kathakkendra.org
ईमेल- connect@kathakkendra.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा