शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नामवंत संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती
गंधर्व महाविद्यालय, दिल्ली :
या संस्थेमार्फत कंठसंगीताचे आणि वाद्यसंगीताचे प्रवेशिका (पहिले आणि दुसरे वर्ष), मध्यमा (तिसरे आणि चौथे वर्ष), विशारद (पाचवे आणि सहावे वर्षे), अलंकार (सातवे आणि आठवे वर्ष) हे अभ्यासक्रम चालविण्यात येतात.
ही संस्था नवी मुंबईच्या अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाशी संलग्न आहे तसेच या संस्थेमार्फत शास्त्रीय नृत्याचेही प्रवेशिका (पहिले आणि दुसरे वर्ष), मध्यमा (तिसरा आणि चौथे वर्ष), विशारद (पाचवे आणि सहावे वर्ष), अलंकार (सातवे आणि आठवे वर्ष) हे अभ्यासक्रम चालविण्यात येतात. संपर्क- २१२, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- ११०००२.
संकेतस्थळ- www.gandharvamahavidyalayanewdelhi.org
ईमेल-gandharvamahavidyalayanewdelhi@rediffmail.com
गंधर्व महाविद्यालय मंडळ :
या संस्थेचे मुख्य संगीत विद्यालय वाशी येथे असून देशभरातील १,२०० संस्था संलग्न आहेत आणि ८०० परीक्षा केंद्रे आहेत. या संस्थेत प्रारंभिक अभ्यासक्रम ते संगीत आचार्य (पीएच.डी.) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या विद्यालयात कंठसंगीत तसेच हार्मोनियम आणि बासरी, व्हायोलीन, सतार, तबला, कथ्थक, भरतनाटय़म यांचे प्रशिक्षण दिले जाते.
संपर्क- गंधर्व निकेतन, प्लॉट नंबर ५, सेक्टर- ९ अ, वाशी, नवी मुंबई- ४००७०३.
वेबसाइट- abgmvm.org,vashi_abgm@rediffmail.com
गंधर्व महाविद्यालय, पुणे :
या संस्थेमार्फत वाद्यसंगीत- तबला, हार्मोनियम, नृत्याचे- कथ्थक, भरतनाटय़म आणि सुगम संगीत यांचे प्रशिक्षण दिले जाते. संपर्क- ४९५, शनिवार पेठ, अप्पा बळवंत चौकाजवळ,
पुणे- ४११०३०. संकेतस्थळ- www.gandharvapune.org
ईमेल- info@gandharvapune.org
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्ट्स :
- बॅचलर ऑफ आर्ट्स इन म्युझिक, डान्स अॅण्ड थिएटर हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कालावधी- तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. प्रवेशाकरता विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षा द्यावी लागते.
- मास्टर ऑफ आर्ट्स इन म्युझिक डान्स अॅण्ड थिएटर. कालावधी- तीन वष्रे. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. संपर्क- ललित कला केंद्र (गुरूकुल), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्ट्स, पुणे- ४११००७.
भारती विद्यापीठ, स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्ट्स :
संस्थेने बॅचलर ऑफ आर्ट्स इन म्युझिक हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- तीन वष्रे. यामध्ये कंठसंगीत आणि वाद्यसंगीत आणि परक्युशन संगीताचे प्रशिक्षण दिले जाते. कंठ संगीतात खयाल किंवा ध्रुपद यांत स्पेशलायझेशन करता येते. वाद्य संगीतामध्ये हार्मोनियम, सतार, बासरी, संतूर, सरोद, शहनाई, सुंदरी, सारंगी यांपकी कोणतेही एक वाद्य स्पेशलायझेशनसाठी निवडता येते. परक्युशन संगीतामध्ये तबला आणि पखवाज या दोन वाद्यांची स्पेशलायझेशनसाठी निवड केली जाते.
संपर्क- स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्ट्स, भारती विद्यापीठ, युनिव्हर्सटिी एज्युकेशन कॉम्प्लेक्स, पुणे रोड, पुणे.
संकेतस्थळ- spa.bharatividyapeeth.edu
ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, संगीत विभाग :
- बॅचलर ऑफ आर्ट्स इन म्युझिक : कालावधी- तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. निवडीसाठी या उमेदवाराला ऑडिशन चाळणी उत्तीर्ण व्हावी लागते.
- एम.ए, इन म्युझिक : कालावधी- दोन वष्रे.
अर्हता- संगीत विषयातील पदवी किंवा कोणत्याही विषयातील पदवी आणि संगीतविशारद परीक्षा अथवा या परीक्षेशी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.
संपर्क- १. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, नाथीबाई ठाकरसी रोड, मुंबई- ४०००२०.
२. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, जुहू रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई- ४०००४०.
३. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, कर्वे रोड, पुणे- ४११०३८. संकेतस्थळ- musicmumbai.sndt.ac.in , musicpune.sndt.ac.in
नॅशनल सेंटर फॉर परफॉìमग आर्ट्स (एनसीपीए) :
- एनसीपीए स्पेशल म्युझिक प्रोग्रॅम.
- गुरू-शिष्य इंडियन म्युझिक.
- कलाशाळा म्युझिक फॉर किड्स.
- एनसीपीए ज्युनिअर िस्ट्रग्ज प्रोग्रॅम.
संपर्क- नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स, एनसीपीए मार्ग, मुंबई- ४४००२१. संकेतस्थळ- ww.ncpamumbai.com
मुंबई विद्यापीठ, संगीत विभाग :
- प्री डिप्लोमा कोर्स इन िहदुस्थानी क्लासिकल व्होकल म्युझिक : कालावधी- एक वर्ष. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
- डिप्लोमा कोर्स इन िहदुस्थानी क्लासिकल व्होकल/ लाइट व्होकल/ सतार/ तबला : कालावधी- दोन वर्षे. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
- बॅचलर ऑफ म्युझिक इन िहदुस्थानी क्लासिकल व्होकल/ सतार/तबला : कालावधी तीन वर्षे. अर्हता- बारावी उत्तीर्ण आणि मध्यमा पूर्ण.
- मास्टर ऑफ म्युझिक कोर्स इन िहदुस्थानी क्लासिकल व्होकल : कालावधी दोन वर्षे. अर्हता- पदवी उत्तीर्ण आणि विशारद.
- पीएच.डी प्रोग्रॅम इन म्युझिक.
- सर्टििफकेट कोर्स इन साऊंड इंजिनीअिरग अॅण्ड रिप्रॉडक्शन कोर्स : कालावधी सहा महिने. अर्हता- बारावी उत्तीर्ण.
- सर्टििफकेट कोर्स इन म्युझिक कंपोझिशन अॅण्ड डायरेक्शन : कालावधी चार महिने. अर्हता- बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी ऑडिशन टेस्ट जून महिन्यात घेतली जाते. जूनच्या अंतिम आठवडय़ात निवड यादी जाहीर केली जाते. संपर्क- संगीत विभाग, मुंबई विद्यापीठ, विद्यापीठ विद्यार्थी भवन, बी रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०.
अॅमिटी स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्ट्स :
- बॅचलर ऑफ म्युझिक- क्लासिकल डान्स.
- बॅचलर ऑफ म्युझिक- क्लासिकल िहदुस्थानी व्होकल.
- बॅचलर ऑफ म्युझिक- िहदुस्थानी क्लासिकल इन्स्ट्रमेन्टल. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी तीन वर्षे. ल्लडिप्लोमा इन क्लासिकल इन्स्ट्रमेन्टल- सतार/ तबला/ सरोद/ व्हायोलीन.
- डिप्लोमा इन िहदुस्थानी क्लासिकल व्होकल म्युझिक. ल्लडिप्लोमा इन क्लासिकल डान्स- भरतनाटय़म/ कथ्थक/ कुचिपुडी.
या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी दोन वष्रे.
- सर्टििफकेट कोर्स इन क्लासिकल इन्स्ट्रमेन्टल- सतार/ तबला/ सरोद/ व्हायोलीन.
- सर्टििफकेट कोर्स इन िहदुस्थानी क्लासिकल व्होकल म्युझिक.
- सर्टििफकेट कोर्स इन क्लासिकल डान्स- भरतनाटय़म/ कथ्थक/ कुचिपुडी. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी एक वर्ष.
संपर्क- अॅमिटी युनिव्हर्सटिी कॅम्पस, सेक्टर- १२५, एक्स्प्रेस हायवे, नॉयडा- २०१३०३. संकेतस्थळ- www.amity.edu