देशभरातील काही निवडक विद्यापीठांच्या अभियांत्रिकी विद्याशाखेत सुरू झालेल्या काही नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..
बारावीनंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना पारंपरिक विद्याशाखांमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा नावीन्यपूर्ण शाखांमध्ये प्रवेश घ्यावासा वाटतो. अभियांत्रिकीतील असे काही वेगळे अभ्यासक्रम देशातील काही संस्थांमध्ये गेल्या काही वर्षांत सुरू केले आहेत.

सेंट्रल युनिव्हर्सटिी ऑफ झारखंड : संस्थेचे अभियांत्रिकी शाखेतील पाच वष्रे कालावधीचे अभ्यासक्रम- इंटिग्रेटेड एम.टेक इन जिओ- इन्फॉम्रेटिक्स, इंटिग्रेटेड एम.टेक इन एनर्जी इंजिनीअिरग, इंटिग्रेटेड एम.टेक इन वॉटर इंजिनीअिरग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड एम. टेक इन नॅनो टेक्नॉलॉजी. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र किमान ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक. प्रवेशासाठी सेंट्रल युनिव्हर्सटिीज कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CUCET) ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा यंदा २१ मे आणि २२ मे २०१६ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर या केंद्रांचा समावेश आहे. संपर्क- सेंट्रल युनिव्हर्सटिी ऑफ झारखंड, रांची- ८३५२०५.
संकेतस्थळ- http://www.cuj.ac.in

 

धीरुभाई अंबानी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्स : रिलायन्स उद्योग समूहाने स्थापन केलेल्या धीरुभाई अंबानी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्स या संस्थेस युनिव्हर्सटिीचा दर्जा देण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि असोसिएशन ऑफ युनिव्हर्सटिीने या संस्थेस मान्यता प्रदान केली आहे. या संस्थेचे पदवीस्तरीय अभ्यासक्रम- बी. टेक इन इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि बी. टेक ऑनर्स इन इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी विथ मायनर इन कॉम्प्युटेशनल सायन्स. अर्हता- बारावी विज्ञान शाखेची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान किंवा कॉम्प्युटर सायन्स या विषयांसह उत्तीर्ण. प्रवेश – JEE-MAIN २०१६ तील गुणांवर आधारित. संकेतस्थळ – http://www.daiict.ac.in

 

युनिव्हर्सटिी ऑफ एनर्जी अ‍ॅण्ड पेट्रोलियम स्टडीज :
बी. टेक इन अ‍ॅप्लाइड पेट्रोलियम इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन गॅस, बी. टेक इन अ‍ॅप्लाइड पेट्रोलियम इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन अपस्ट्रिम, बी. टेक इन केमिकल इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन रिफायिनग, बी. टेक इन मायिनग इंजिनीअिरग, बी. टेक इन जिओसायन्स इंजिनीअिरग, बी. टेक इन जिओ इन्फॉम्रेटिक्स इंजिनीअिरग, बी. टेक इन सिव्हिल इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, बी. टेक इन एरोस्पेस इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन एव्हिऑनिक्स इंजिनीिरग, बी. टेक इन एरोस्पेस इंजिनीअिरग, बी. टेक इन मेकॅनिकल इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन थर्मल इंजिनीअिरग, बी. टेक इन मेकॅनिकल इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन प्रॉडक्शन इंजिनीअिरग, बी. टेक इन मेकॅनिकल इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन मटेरिअल सायन्स अ‍ॅण्ड नॅनोटेक्नॉलॉजी, बी. टेक इन मेकॅनिकल इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन मशीन डिझाइन, बी. टेक इन ऑटोमोटिव्ह डिझाइन, बी. टेक इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअिरग. संकेतस्थळ- http://www.upes.ac.in
ई-मेल- betch@ upes.ac.in

 

हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स :
या संस्थेने नियमित स्वरूपाच्या अभ्यासक्रमांसोबतच पुढील वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत : बी. टेक इन इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी (मोबाइल कॉम्प्युटिंग), बी. टेक इन इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी (सायबर सिक्युरिटी), बी. टेक इन इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी (क्लाऊड कॉम्प्युटिंग), बी. टेक इन ऑटोमोबाइल इंजिनीअिरग (मोटर स्पोर्ट्स इंजिनीअिरग), बी. टेक इन ऑटोमोबाइल इंजिनीअिरग (ऑटोट्रॉनिक्स), बी. टेक इन सिव्हिल इंजिनीअिरग (मोटर कन्स्ट्रक्शन इंजिनीअिरग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट), बी. टेक इन सिव्हिल इंजिनीअिरग (मोटर स्ट्रक्चरल इंजिनीअिरग), बी. टेक इन सिव्हिल इंजिनीअिरग (एन्व्हारॉन्मेंटल इंजिनीअिरग अ‍ॅण्ड वॉटर रिसोर्स), बी. टेक इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग (एंटरप्राइज इन्फम्रेशन सिस्टीम्स), बी. टेक इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग (इन्फम्रेशन सिक्युरिटी), बी. टेक इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग (डिस्ट्रिब्युटेड एंटरप्राइज सिस्टीम), बी. टेक इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग (बायोमेडिकल इंजिनीअिरग), बी. टेक इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअिरग (रिअल टाइम एम्बेडेड सिस्टीम इंजिनीअिरग), बी. टेक इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअिरग (इंडस्ट्रिअल ऑटोमेशन), बी. टेक इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअिरग (रोबोटिक्स अ‍ॅण्ड कंट्रोल), बी. टेक इन इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग (एनर्जी इंजिनीअिरग), बी. टेक इन इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग (पॉवर सिस्टीम्स), बी. टेक इन एॅरोनॉटिक इंजिनीअिरग (एव्हिऑनिक्स), बी. टेक इन एरोस्पेस इंजिनीअिरग.
हे अभ्यासक्रम गुणांक आधारित निवड पद्धतीवर (चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम) आधारित स्पेशलायझेशनचे विषय आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स इंजिनीअिरग एन्ट्रन्स एक्झामिनेशन (HITSEEE) या परीक्षेद्वारे दिला जातो.
संकेतस्थळ- http://www.hindustanuni.ac.in
ई-मेल- info@hindustanuniv.ac.in

 

एसआरएम युनिव्हर्सटिी : या संस्थेचे अभियांत्रिकी शाखेतील वेगळे अभ्यासक्रम- बी. टेक इन जेनेटिक इंजिनीअिरग, बी. टेक इन फूड अ‍ॅण्ड प्रोसेसिंग इंजिनीअिरग, बी. टेक इन बायोइन्फॉम्रेटिक्स, बी. टेक इन एरोस्पेस इंजिनीअिरग, बी. टेक इन नॅनो टेक्नॉलॉजी, बी. टेक इन न्युक्लिअर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग. प्रवेश- संस्थेच्या चाळणी परीक्षेद्वारे.
संकेतस्थळ- http://www.srmuniv.ac.in
ई-मेल- adimissions.india@srmuniv.ac.in

 

व्हीआयटी युनिव्हर्सटिी : अभ्यासक्रम- बी. टेक इन मेकॅनिकल इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन एनर्जी इंजिनीअिरग, बी. टेक इन मेकॅनिकल इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन ऑटोमोटिव्ह इंजिनीअिरग, बी. टेक इन प्रॉडक्शन अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल इंजिनीअिरग, बी. टेक इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन बायोइन्फॉम्रेटिक्स. या अभ्यासक्रमांना व्हीआयटीईईई (VITEEE)- वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनीअिरग प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. अर्हता- बारावी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्केगुण मिळणे आवश्यक आहे. संपर्क- ऑफिस ऑफ यू. जी. अ‍ॅडमिशन, व्हीआयटी युनिव्हर्सटिी, वेल्लोर- ६३२०१४. संकेतस्थळ- vit.ac.in
ई-मेल- ugadmission@ vit.ac.in

 

मणिपाल विद्यापीठ : या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या मणिपाल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- बी. टेक इन ऑरोनॉटिकल इंजिनीअिरग, बी. टेक इन िपट्र अ‍ॅण्ड मीडिया इंजिनीअिरग, बी. टेक इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअिरग.
या अभ्यासक्रमांना ऑनलाइन टेस्ट आणि त्यानंतर कौन्सेलिंगद्वारे प्रवेश दिला जातो. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत इंग्रजी, भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा संगणकशास्त्र यामध्ये किमान सरासरीने ६० टक्के गुण मिळणे आवश्यक. संपर्क- डायरेक्टर अ‍ॅडमिशन, मणिपाल युनिव्हर्सटिी, मणिपाल, कर्नाटक- ५७६१०४. ई-मेल- admissions@manipal.edu संकेतस्थळ- manipal.edu