इव्हेंट मॅनेजमेंट विषयक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची आणि असे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्थांची सविस्तर माहिती..
सार्वजनिक तसेच व्यक्तिगत समारंभांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना इव्हेन्ट मॅनेजमेंट क्षेत्राला गेल्या काही वर्षांत मोठी बरकत प्राप्त होत आहे. इव्हेन्ट मॅनेजमेंट विषयक अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या काही संस्था..
नॅशनल अॅकॅडेमी ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट-
या संस्थेने बारावी आणि पदवीनंतरचे या क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
*बीबीए इन इव्हेन्ट मॅनेजमेंट- कालावधी तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो. *डिप्लोमा इन अॅस्पेक्ट्स ऑफ मीडिया, मार्केटिंग अॅण्ड इव्हेन्ट- कालावधी एक वष्रे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो. *डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट- कालावधी एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो. *पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट- कालावधी एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो. *पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅस्पेक्ट्स ऑफ मीडिया, मार्केटिंग अॅण्ड इव्हेन्ट- कालावधी एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो. *एमबीए इन इव्हेन्ट मॅनेजमेंट- कालावधी दोन वष्रे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो. या संस्थेचे अभ्यासक्रम हे भारतीयार विद्यापीठ कोइम्बतूरशी संलग्न आहेत. संपर्क- नॅशनल अॅकॅडेमी ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट, लॉर्ड्स युनिव्र्हसल, टोपीवाला मार्ग, स्टेशन रोडच्या बाजूला, गोरेगाव पश्चिम, मुंबई- ४०००६२. संकेतस्थळ- http://www.naemd.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा