नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाची आणि प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती..
फॅशन उद्योगाशी संबंधित विविध बाबींमध्ये त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञानसुद्धा आवश्यक आहे. कागदावरचे डिझाइन प्रत्यक्ष स्वरूपात येण्यासाठी तांत्रिक कौशल्य, यंत्रासामग्री यांची गरज भासते. ही गरज तंत्रकुशल मनुष्यबळ भागवत असते. फॅशन डिझायिनग इतके फॅशन तंत्रज्ञानही महत्त्वाचे आहे. मात्र फॅशन डिझायिनग अभ्यासक्रमाकडे जेवढा विद्यार्थ्यांचा ओढा दिसतो तेवढा फॅशन तंत्रज्ञान अभ्यासक्रमाकडे दिसत नाही, याचे कारण पालक आणि विद्यार्थ्यांना या क्षेत्राची तितकीशी माहिती नसते. फॅशन डिझायिनगमध्ये जसे करिअर करता येणे शक्य आहे, त्याचप्रमाणे फॅशन तंत्रज्ञानातही करिअर करता येऊ शकते. या अनुषंगानेच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेचे अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ही केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेची स्थापना केंद्र सरकारने १९८६ साली या क्षेत्रातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून केली आहे. या विषयाशी संबंधित फॅशन डिझायिनग, तंत्रज्ञान, फॅशन कम्युनिकेशन आदी शिक्षण-प्रशिक्षण देणारी ही जगातील नामवंत व आघाडीची संस्था आहे.
बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (अॅपेरल प्रॉडक्शन/ वस्त्रे, पेहराव निर्मिती) : या संस्थेने फॅशन उद्योगास आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (बी.एफटेक्) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
या अभ्यासक्रमामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रातील नित्य अशा विविध आव्हानांच सामना करण्याचे कौशल्य उमेदवारांना प्राप्त करून दिले जाते. वस्त्रप्रावरणे निर्मितीसाठी आवश्यक असणारे तंत्रकौशल्य या उमेदवारांनी उत्कृष्टरीत्या प्राप्त करावे या दृष्टीने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.
उपलब्ध संधी
हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना वस्त्रप्रावरणे निर्मिती (गार्मेट प्रॉडक्शन), गुणवत्ता हमी (क्वॉलिटी अॅश्युरन्स), औद्योगिक अभियांत्रिकी (इंडस्ट्रियल इंजिनीअिरग), वस्तुविकास (प्रॉडक्ट डेव्हलपमेंट), प्रकल्प विश्लेषण (प्रोजेक्ट अॅनॅलिसिस), निर्मिती नियोजन (प्रॉडक्शन प्लॅिनग), विक्री (र्मचडायजिंग), संगणकीय उपयोगिता (सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन), कार्यप्रणाली विश्लेषण (सिस्टीम अनॅलिसिस), मनुष्यबळ विकास (हय़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट), उद्योजकता विकास (आंत्र्यप्रेन्युअर डेव्हलपमेंट), संसाधनांची उपलब्धता (सोìसग) आदी क्षेत्रांत करिअरच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.
अर्हता : या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. प्रवेशासाठी शैक्षणिक अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयासह बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण किंवा तंत्रनिकेतनमधील तीन अथवा चार वष्रे कालावधीची कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पदविका. वयोमर्यादा- प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या वर्षांच्या १ ऑक्टोबर रोजी उमेदवाराचे वय कमाल वय २३ वष्रे असावे. अनुसूचित जाती आणि जमाती आणि अपंग या राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत दिली जाते.
प्रवेश प्रक्रिया : या अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या प्रत्यक्ष सात ते आठ महिने आधीच सुरू होते. दर वर्षी शैक्षणिक सत्र जूनमध्ये सुरू होते. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी आदल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच सुरू केली जाते. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात देशभरातील ३२ शहरांमध्ये परीक्षा घेतली जाते. अंतिम निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात ऑनलाइन घोषित केला जातो. त्यानंतर लगेच जून महिन्यातच प्रवेशासाठी कौन्सेिलग सुरू होते.
हा अभ्यासक्रम कोलकाता, कानपूर, कांग्रा, जोधपूर, हैदराबाद, गांधीनगर, चेन्नई, भुवनेश्वर, नवी दिल्ली, मुंबई, पाटणा आणि बेंगळुरू येथील कॅम्पसमध्ये शिकवला जातो. प्रत्येक कॅम्पसमध्ये ३० याप्रमाणे एकूण ३६० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
परीक्षा केंद्रे- चाळणी परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.
परीक्षा- या अभ्यासक्रमासाठीची परीक्षा जनरल एबिलिटी टेस्ट (जीएटी) या नावाने ओळखली जाते. परीक्षेचा कालावधी तीन तास आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीची व बहुपर्यायी उत्तरांची आहे. या परीक्षेत निगेटिव्ह माìकग नाही. या पेपरच्या गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाते.
पेपर पॅटर्न- जनरल एबिलिटी टेस्टमध्ये संख्यात्मक क्षमता (क्वान्टिटेटिव्ह एबिलिटी- ३० प्रश्न), संवादकौशल्य क्षमता आणि इंग्रजी आकलन (कम्युनिकेशन एबिलिटी अॅण्ड इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन- ४५ प्रश्न), विश्लेषणात्मक आणि ताíकक क्षमता (अनॅलिटिकल अॅण्ड लॉजिकल एबिलिटी- २५ प्रश्न), सामान्य ज्ञान आणि चालू घडमोडी (जनरल नॉलेज अॅण्ड करन्ट अफेअर्स- २५ प्रश्न), एखाद्या प्रकरणाचा अभ्यास (केस स्टडी- २५ प्रश्न) यांवर प्रश्न विचारले जातात.
संख्यात्मक क्षमता- यात गुणाकार, भागाकार, टक्केवारी, अंतर, व्याजदर, अपूर्णाक, गुणोत्तर प्रमाण यांवर प्रश्न विचारले जातात. संवादकौशल्य क्षमता आणि इंग्रजी आकलन- दैनंदिन जीवनात उमेदवारांचे इंग्रजी भाषाविषयक क्षमतेचे आकलन होण्यासाठी या भागात प्रश्न विचारले जातात. यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, पर्यायी शब्द, म्हणी, शब्दांची अचूकता, उताऱ्यात दिलेल्या प्रसंगाचे आकलन आदी बाबींवर प्रश्न विचारले जातात. विश्लेषणात्मक आणि ताíकक क्षमता- दिलेल्या माहितीच्या आधारावर उमेदवार कशा पद्धतीने निष्कर्ष काढतो, विश्लेषण करतो, एखाद्या समस्येकडे कशा पद्धतीने बघतो तसेच ही समस्या कशा रीतीने सोडवू इच्छितो या बाबी जोखण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारले जातात. याद्वारे उमेदवाराच्या सर्जनशील आणि वेगळा विचार करण्याच्या क्षमतेचे आकलन केले जाते. केस स्टडी- या भागात फॅशनशी संबंधित एखाद्या प्रकरणावर प्रश्न विचारले जातात. उमेदवाराची व्यवस्थापकीय क्षमता जोखण्यासाठी या प्रश्नांची संरचना केली जाते.
या अभ्यासक्रमांसाठी १५ टक्के जागा अनुसूचित जाती, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती, २७ टक्के जागा नॉन क्रिमीलेअर इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि ३ टक्के जागा अपंगांसाठी राखीव ठेवल्या जातात.
शैक्षणिक कर्ज- या अभ्यासक्रमासाठी संस्थेमार्फत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाचे सहकार्य घेतले जाते. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग व महिला उमेदवारांसाठी व्याज दर हा ११.२५% आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी हा व्याज दर ११.७५ टक्के आहे.
गरजू उमेदवारांना ‘मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप’ योजनेंतर्गत मर्यादित स्वरूपात संस्थेमार्फत आíथक साहाय्य केले जाते. याशिवाय कॅम्पसमध्ये अंशकालीन नोकरीच्या सुविधा पुरवूनसुद्धा उमेदवारांना आíथक साहाय्य केले जाते.
फी- यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी- प्रवेश घेते वेळेस- १ लाख १६५० रुपये, दुसरे सत्र- ७५ हजार ९५० रुपये, तिसरे सत्र- ९४ हजार ४५० रुपये. चौथे सत्र- ८३ हजार ५५० रुपये, पाचवे सत्र- १ लाख ४ हजार रुपये, सहावे सत्र- ९१ हजार ९०० रुपये, सातवे सत्र- १ लाख १४ हजार ३५० रुपये, आठवे सत्र- १ लाख १ हजार ५० रुपये.
संपर्क- एनआयएफटी मुंबई कॅम्पस, प्लॉट नंबर १५, सेक्टर ४ खारघर, नवी मुंबई- ४१०२१०. संकेतस्थळ- http://www.nift.ac.in