नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाची आणि प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती..
फॅशन उद्योगाशी संबंधित विविध बाबींमध्ये त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञानसुद्धा आवश्यक आहे. कागदावरचे डिझाइन प्रत्यक्ष स्वरूपात येण्यासाठी तांत्रिक कौशल्य, यंत्रासामग्री यांची गरज भासते. ही गरज तंत्रकुशल मनुष्यबळ भागवत असते. फॅशन डिझायिनग इतके फॅशन तंत्रज्ञानही महत्त्वाचे आहे. मात्र फॅशन डिझायिनग अभ्यासक्रमाकडे जेवढा विद्यार्थ्यांचा ओढा दिसतो तेवढा फॅशन तंत्रज्ञान अभ्यासक्रमाकडे दिसत नाही, याचे कारण पालक आणि विद्यार्थ्यांना या क्षेत्राची तितकीशी माहिती नसते. फॅशन डिझायिनगमध्ये जसे करिअर करता येणे शक्य आहे, त्याचप्रमाणे फॅशन तंत्रज्ञानातही करिअर करता येऊ शकते. या अनुषंगानेच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेचे अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ही केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेची स्थापना केंद्र सरकारने १९८६ साली या क्षेत्रातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून केली आहे. या विषयाशी संबंधित फॅशन डिझायिनग, तंत्रज्ञान, फॅशन कम्युनिकेशन आदी शिक्षण-प्रशिक्षण देणारी ही जगातील नामवंत व आघाडीची संस्था आहे.
बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (अॅपेरल प्रॉडक्शन/ वस्त्रे, पेहराव निर्मिती) : या संस्थेने फॅशन उद्योगास आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (बी.एफटेक्) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
या अभ्यासक्रमामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रातील नित्य अशा विविध आव्हानांच सामना करण्याचे कौशल्य उमेदवारांना प्राप्त करून दिले जाते. वस्त्रप्रावरणे निर्मितीसाठी आवश्यक असणारे तंत्रकौशल्य या उमेदवारांनी उत्कृष्टरीत्या प्राप्त करावे या दृष्टीने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा