फॅशन स्टायलिंग क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या करिअरमध्ये आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यांची आणि उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती..
फॅशन स्टायलिस्ट आपल्या ग्राहकांचे ब्रँडिंग करण्याचे काम करतात. या क्षेत्रात महत्त्वाकांक्षी काम करू इच्छिणाऱ्या युवावर्गासाठी करिअरच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. म्युझिक व्हिडीओ, जाहिराती, टीव्ही लाइव्ह शो, रिअॅलिटी शो, चित्रपट आदी क्षेत्रांत फॅशन स्टायलिस्ट करिअर करू शकतात. आपल्या ग्राहकांच्या सकारात्मक बाबींना उत्तम पद्धतीने सामोरे आणणे फॅशन स्टायलिस्ट्सकडून अपेक्षित असते. उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या ग्राहकांसाठी प्रसंगानुरूप वेशभूषा-केशभूषा ते अलंकारांची निवड करण्याचे आव्हानात्मक काम त्यांनी करणे अपेक्षित आहे.
फॅशन स्टायलिस्ट्ना आपल्या ग्राहकांच्या इमेज ब्रँडिंगगसाठी समकालीन फॅशन ट्रेंड्स आणि फॅशन उद्योगाविषयी उत्तम माहिती असणे आवश्यक ठरते. फॅशन स्टायलिस्ट्सना डिझायनर्स, टेलर्स, मॉडेल्स, फोटोग्राफर, हेअर आणि मेकअप आर्टस्टि, रिटेलर्स, माध्यमे, सेलिब्रेटीज, प्रसिद्धीयंत्रणा यांच्यासोबत समन्वयाने काम करावे लागते. ग्राहकांच्या प्रतिमेशी सुसंगत फॅशन अॅक्सेसरीजच्या गरजा आणि पेहरावाच्या निर्मितीसाठी योग्य वस्त्रप्रावरणांचा शोध घ्यावा लागतो. जगभरातील नव्या फॅशनच्या वस्त्रप्रावरणांवर लक्ष ठेवून योग्यवेळी त्याचा अचूक वापर करता येण्याचे कौशल्य प्राप्त करावे लागते. ग्राहकांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होण्याकरता फॅशन स्टायलिस्ट्सना फॅशन ट्रेंडची पूर्वकल्पना असणे आवश्यक आहे. त्याला रंगसंगती, कला, डिझाइनचे ज्ञान आवश्यक ठरते. विविध प्रकारची देहयष्टी, चेहरे यांचा अभ्यास आणि त्यानुसार वस्त्रप्रावरणांची निर्मिती, मार्केटिंग, नेटवìकग, जाहिरात यांसारखे व्यावसायिक कौशल्य फॅशन स्टायलिस्ट्सना आवश्यक ठरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा