परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षांची सखोल माहिती.
जर्मनी सोडल्यास इतर सर्व देशांमध्ये इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व ही त्या देशातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी पहिली अट समजली जाते. जर्मनीतील काही शैक्षणिक संस्थांमध्ये अभ्यासक्रम इंग्रजी आणि जर्मनी या दोन्ही भाषांमध्ये करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाते. जर्मनीमध्ये विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षणाचा पदव्युत्तर पदवी स्तरावरील खर्च अल्प असल्याने बऱ्याच भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा जर्मनीतील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याकडे असतो. परदेशातील नामवंत संस्था प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाची चाचपणी करतात. त्यासाठी काही चाळणी परीक्षांमधील गुण या संस्था ग्राह्य़ धरतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर विद्यार्थ्यांसमकक्ष भारतीय विद्यार्थ्यांचा दर्जा आहे किंवा नाही ही बाब जाणून घेण्यासाठी या परीक्षांची संरचना केलेली असते. अशा काही चाळणी परीक्षा पुढीलप्रमाणे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जीमॅट (GMAT)- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अॅप्टिटय़ूड टेस्ट – अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा देशातील पदव्युत्तर पदवीस्तरावरील व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. संपर्क संकेतस्थळ- http://start.gmat.com
जीआरई (GRE) ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन – अमेरिका आणि सिंगापूर देशातील प्रत्येक विद्यापीठातील अभियांत्रिकी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा द्यावी लागते. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा आणि न्यूझीलंड देशातील महत्त्वाच्या संस्था जीआरईमधील गुणांचा प्रवेशासाठी विचार करतात. संपर्क- http://www.ets.org/gre
सॅट (SAT) स्कालॅस्टिक अॅप्टिटय़ूड टेस्ट- अमेरिका आणि सिंगापूर देशांतील प्रत्येक विद्यापीठातील अभियांत्रिकी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांतील पदवी आणि अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा द्यावी लागते. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा आणि इतर देशातील काही महत्त्वाच्या संस्थासुद्धा जीआरईमधील गुणांचा प्रवेशासाठी विचार करतात. संपर्क- collegereadiness.collegeboard.org/sat
पीटीई – ही परीक्षा पिअर्सन पीएलसी समूहामार्फत घेतली जाते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आर्यलड, कॅनडा या देशातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी या चाचणीचे गुणग्राहय़ धरले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या श्रवण, वाचन, लेखन, संवाद क्षमतेची चाचणी घेतली जाते. पिअर्सन टेस्ट ही दर आठवडय़ाला देशातील अनेक केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर या केंद्रांचा समावेश आहे. दोन ते पाच आठवडय़ांत याचा निकाल घोषित केला जातो. या चाळणीतील गुण दोन वर्षांसाठी ग्राह्य़ धरले जातात. यामध्ये तीन मुख्य भाग असतात. ल्लएकत्रितरीत्या संवाद कौशल्य आणि लेखन कौशल्य ल्लवाचन कौशल्य, ल्लश्रवण क्षमता चाचणी. प्रत्येक चाळणीसाठी गुणांक हे १० ते ९० या प्रमाणात दिले जातात. दर्जेदार शैक्षणिक संस्थातील प्रवेशासाठी किमान ७० गुण व प्रत्येक चाळणीमध्ये किमान ६५ गुण मिळणे आवश्यक. ही परीक्षा देऊ इच्छिणारे उमेदवार तीनही घटकांसाठी सराव चाळणी परीक्षा देऊ शकतात. संस्थेमार्फत या चाळणी परीक्षेच्या तयारीसाठी ४५ तासांच्या प्रशिक्षणाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. संपर्क- http://pearsonpte.com
टोफेल- आयबीटी (TOEFLiBT): टेस्ट ऑफ इंग्लिश एज फॉरेन लँग्वेज- ही परीक्षा भारतात ईटीएस या संस्थेमार्फत घेतली जाते. ही टेस्ट ऑनलाइन स्वरूपाची आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या श्रवण, वाचन, लेखन, संवाद क्षमतेची चाचणी घेतली जाते. या परीक्षेत वाचन क्षमता चाळणी ६० ते ८० मिनिटे, श्रवण क्षमता ६० ते ९० मिनिटे, संवाद कौशल्य चाचणीसाठी २० मिनिटे आणि लेखन क्षमता चाळणीचा कालावधी ५० मिनिटांचा असतो. दर्जेदार शिक्षण संस्था १२० गुणांपकी १०४ किंवा त्यापेक्षा अधिक गुणांची अपेक्षा करतात. या परीक्षेचा निकाल ८ ते १० दिवसांत लागतो. हे गुण दोन वर्षांसाठी ग्राह्य़ धरले जातात. संपर्क- http://www.toeflgoanywhere.org
आयईएलटीएस- (IELTS) – इंग्लिश लँग्वेज टेस्टिग सिस्टीम)- ही परीक्षा ब्रिटिश काउंसिल आणि आयडीपी या संस्थेमार्फत घेतली जाते. या चाळणीमध्ये चार भाग असतात. श्रवण चाळणी- ३० मिनिटे, वाचन चाळणी- ६० मिनिटे, लिखान क्षमता चाळणी- ६० मिनिटे आणि संवाद कौशल्य- ११ ते १४ मिनिटे. चाळणीचा एकूण कालावधी- २ तास ४५ मिनिटे. एका बठकीतच श्रवण, वाचन आणि लेखन क्षमता चाळण्या पार पाडल्या जातात. उमेदवारांना प्रत्येक चाळणीमध्ये १ ते ९ या प्रमाणात श्रेणी दिली जाते. सर्व चाळण्यांमधील श्रेणींवर आधारित अंतिम गुणांकन केले जाते. भारतातील प्रत्येक प्रमुख शहरात ही चाळणी परीक्षा देण्याची सोय आहे. ही परीक्षा साधारणत: दर आठवडय़ाला होते. या चाळणी परीक्षेचा निकाल आठ ते दहा दिवसांत लावला जातो. हे गुणांक पुढील दोन वर्षांसाठी ग्राह्य़ धरले जातात. युनायटेड किंगडम व्हिसा अॅण्ड इमिग्रेशन संस्थेने मान्यता प्रदान केलेल्या केंद्रांवरच परीक्षा दिलेल्या उमेदवारांना इंग्लंडमधील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था या परीक्षेचे गुण प्रवेशासाठी स्वीकारतात.
संपर्क- http://www.britishcouncil.in/exam/ielts
कार्डिफ युनिव्हर्सटिी इंटरनॅशनल स्कॉलरशिप :
या योजनेंतर्गत इंग्लंडमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती रक्कम ५ हजार पौंड. शिष्यवृत्तीचा विचार मानसशास्त्र, समाजशास्त्र, पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यक शास्त्र, राजकारण व आंतरराष्ट्रीय संबंध, नियोजन व भूगोल, भौतिकशास्त्र, औषधीनिर्माणशास्त्र, संगीत, आधुनिक भाषा, गणित, विधी शाखा, पत्रकारिता, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, व्यवसाय, अभियांत्रिकी, इंग्रजी, संवाद संप्रेषण आणि तत्त्वज्ञान विषयांतील अभ्यासक्रमांसाठी होऊ शकतो.
संकेतस्थळ- http://www.cardiff.ac.uk,
ई-मेल- international@cardiff.ac.uk आणि
ahss-scholarship@cardiff.ac.in
युनिव्हर्सटिी ऑफ अॅडेलेड, इंटरनॅशनल स्टुडंट स्कॉलरशिप :
ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सटिी ऑफ अॅडेलेड मार्फत इंटरनॅशनल स्टुडंट स्कॉलरशिप योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत या विद्यापीठातील कृषी, विधी शाखा, व्यवसाय, अभियांत्रिकी, गणितीय आणि संगणकशास्त्र, दंतवैद्यकशास्त्र, मानव्यशास्त्र, समाजशास्त्र, संगीत, अध्यापन, विज्ञान या विषयांच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तींतर्गत वार्षकि फी २५ टक्क्यांपर्यंत माफ केली जाते. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना या विद्यापीठात प्रवेश मिळणे आवश्यक.
संपर्क : संकेतस्थळ- http://international.adelaide.edu.au
रोटरी पीस फेलोशिप :
रोटरी क्लबमार्फत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी फेलोशिप दिली जाते. शिकवणी व इतर फी, निवास खर्च, परिवहन खर्च, इंटर्नशिप आदी बाबींचा समावेश आहे. डय़ुक युनिव्हर्सटिी व युनिव्हर्सटिी नॉर्थ कॅरोलिना (अमेरिका), इंटरनॅशनल ख्रिस्तियन युनिव्हर्सटिी (जपान), युनिव्हर्सटिी ऑफ ब्रॅडफोर्ड (इंग्लंड), युनिव्हर्सटिी ऑफ क्वीन्सलॅण्ड (ऑस्ट्रेलिया), उप्पसॅला युनिव्हर्सटिी (स्वीडन) या शैक्षणिक संस्थांमधील ५० पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. संपर्क संकेतस्थळ- http://www.rotary.org/en/ get-involved/ exchange-ideas/ peace-fellowship-application (समाप्त)