जाहिरात, जनसंपर्क, प्रसिद्धी माध्यम अशा अनेक क्षेत्रांत संधी असणाऱ्या ग्राफिक डिझायनशी संबंधित विविध अभ्यासक्रम.

एखादी वस्तू वा उत्पादनांच्या ब्रँिडग आणि विक्रीसाठी ग्राफिक डिझायनर्सचे योगदान महत्त्वाचे ठरते. माहिती पुस्तिका आणि लोगोची निर्मिती या तज्ज्ञांना करावी लागते. या क्षेत्रातील उमेदवारांना ग्राफिक आर्टस्टि, कम्युनिकेशन डिझायनर्स म्हणूनही संबोधले जाते. त्यांना जाहिरातदार आणि जनसंपर्क क्षेत्रातील व्यावसायिक आणि मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी समन्वय साधावा लागतो. ग्राफिक डिझायनर्सना लिखित शब्द आणि आकृती यांच्याशी कार्य करावे लागते. टाइप, फाँट, साइज, रंग, शीर्षक याविषयी निर्णय घ्यावे लागतात. मुद्रित आणि वेब माध्यमांमध्ये कल्पना आणि चित्र यांची प्रभावीरीत्या सांगड घालावी लागते. कोणत्याही सांख्यिकी माहितीस रंग आणि आलेख (ग्रॉफ) यांच्याद्वारे दृष्यात्मक स्वरूपात रूपांतर करण्याचे कौशल्य या तज्ज्ञांमध्ये असते. एकसुरी व कंटाळवाणी वा समजण्यास कठीण जाऊ शकणाऱ्या माहितीला दृष्यात्मक स्वरूप देऊन ती माहिती योग्यरीत्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे कौशल्य या तज्ज्ञांनी प्राप्त केलेले असते. त्यासाठी त्यांना छायाचित्रे, अ‍ॅनिमेनश, रंगसंगती, रेखांकने विविध प्रकारच्या डिझाइन तंत्रांचा सुयोग्य वापर करता येणे गरजेचे आहे.

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता

ग्राफिक डिझायिनगच्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करता येते. काही ग्राफिक डिझायनर्स हे नियतकालिके, वृत्तपत्रे, पुस्तके यांच्या डिझाइनमध्ये कौशल्य प्राप्त करतात. काहीजण वस्तू वा उत्पादनांच्या कलात्मक पॅकेजिंगमध्ये, काहीजण अ‍ॅनिमेशनमध्ये कौशल्य प्राप्त करतात. सध्या इंटरनेटरद्वारे होणाऱ्या ई-मार्केटिंगच्या क्षेत्रातही ग्रॅफिक डिझायनर्सची गरज भासते आहे.

ग्राहकांच्या गरजा स्पष्टतेने समजून घेणे, त्यानुसार ग्राहकांना आकर्षति करून घेईल अशा दृष्यात्मक साहित्याची निर्मिती करणे यावर ग्राफिक डिझायनर्सना लक्ष केंद्रित करावे लागते. त्यासाठी त्यांना ग्राहकांची मानसिकता समजून घेणे, सर्जनशील कल्पनांचा विकास करणे, संशोधन करणे, कला दिग्दर्शकाशी समन्वय साधणे या बाबीही कराव्या लागतात.

ग्राफिक डिझायनर्सच्या क्षेत्रात उत्तम करिअर संधी असल्या तरी या क्षेत्रासाठी स्वत:चा कल आहे किंवा नाही ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण हे क्षेत्र सर्जनशील असून नव्या संकल्पनांची निर्मिती आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे कौशल्य प्राप्त करता आले नाही तर करिअरमध्ये प्रगती करणे अवघड जाऊ शकते. चित्रकला, रेखांकने, संगणक, छायाचित्रण, मुद्रित माध्यमांच्या अनुषंगाने छपाई तंत्राची माहिती अवगत करून घेणे आवश्यक ठरते.

करिअर संधी – * जाहिरात आणि विक्री व्यवस्थापकऱ्या उमेदवारांना एखादी वस्तू वा सेवेच्या अनुषंगाने ग्राहकांमध्ये रस निर्माण व्हावा यासाठी प्रसिद्धीविषयक नियोजन करावे लागते. * आर्ट डायरेक्टर- नियतकालिके, वृत्तपत्रे, वस्तू किंवा उत्पदनांचे पॅकेजिंग, चित्रपट टीव्हीमधील नेपथ्यासाठी सर्जनशील दृष्यात्मक बाबींचे नियोजन व त्याबरहुकूम त्याची अंमलबजावणी या उमेदवारांना करावी लागते. एखाद्या उत्पादनाचे वा सेटचे आकर्षून घेणारे डिझाइन आणि लेआऊट यांना तयार करावे लागते. * ललित कला आणि कलाकुसर- विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, पेंटिग्ज, चित्र यांची निर्मिती आणि विक्री करण्याचे कौशल्य या क्षेत्रातील उमेदवारांना प्राप्त करावे लागते. * डेस्क टॉप पब्लिशर्स- या क्षेत्रातील तज्ज्ञ उमेदवारांना संगणकाच्या साहाय्याने वृत्तपत्रे, पुस्तके, घडी पुस्तिका अशासारख्या ज्या बाबींची छपाई आणि प्रकाशन करणे गरजेचे असते त्यांचे डिझाइन करावे लागते. * ड्रॉफ्टर्स- अभियंते आणि वास्तुकलारचनाकारांच्या रेखांकनास तांत्रिक चित्रांकनामध्ये रूपांतरित करण्याचे कौशल्य या उमेदवारांनी प्राप्त केलेले असते. * इंडस्ट्रियल डिझायनर्स- कार, घरगुती वापरासाठीच्या वस्तू व इतर उत्पादने, खेळणी आदींचे डिझाइन्स तयार करतात. नव्या उत्पादनाचे डिझाइन करताना या उमेदवारांना सौंदर्य, उपयुक्तता, कार्यात्मकता, निर्मिती मूल्य यांचा सुयोग्य समन्वय साधावा लागतो. * मल्टिमीडिया आर्टस्टि व अ‍ॅनिमेटर्स- या क्षेत्रातील उमेदवारांना चित्रपट टीव्ही, व्हिडीओ खेळासाठी अ‍ॅनिमेशन आणि दृष्यात्मक बाबींची सर्जनशीलरीत्या निर्मिती करावी लागते. * वेब डिझायनर- संकेतस्थळाच्या कलात्मक निर्मितीत या तज्ज्ञांचा हातभार लागतो. या तज्ज्ञांना संकेतस्थळाची कार्यक्षमता व कार्यान्वयन या तांत्रिक बाबी आणि संकेतस्थळावरील माहिती व साहित्य याकडे लक्ष पुरवावे लागते. * टेक्निकल रायटर्स- या तज्ज्ञांना टेक्निकल कम्युनिकेटर्स असे संबोधले जाते. यांना तांत्रिक बाबींच्या माहितीपुस्तिका तयार कराव्या लागतात. व्यामिश्र स्वरूपाची माहिती सोप्या रीतीने समजावून सांगण्याचे तंत्र या उमेदवारांनी हस्तगत केलेले असते. ग्राफिक डिझायनर्सकडे विश्लेषणात्मक, संवादात्मक, संगणकीय, कलात्मक, सर्जनशील, वेळ व व्यवस्थापकीय कौशल्य गरजेचे आहे.

काही संस्था- 

  • झी इन्स्टिटय़ूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट- संस्थेचा ग्राफिक डिझाइन, वेब डिझाइन या विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम. संपर्क- * झी इन्स्टिटय़ूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट, लेव्हल वन, फन रिपब्लिक, न्यू िलक रोड अंधेरी पश्चिम, मुंबई- ४०००५३. ई-मेल- andheri@zica.org , * झी इन्स्टिटय़ूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट, १५८६, ऑफिस क्रमांक- ६८७, सदाशिव पेठ, टिळक रस्ता, शिवानंदन इमारत, महाराष्ट्र मंडळ शाळेच्या विरुद्ध दिशेला पुणे- ४११०३०. ई-मेल- zicapune@gmail.com , संकेतस्थळ- http://www.zica.org
  • माया अ‍ॅकॅडेमी ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड सिनेमॅटिक्स- संस्थेचा अभ्यासक्रम- प्रोग्रॅम इन ग्राफिक डिझाइन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमेशन.

संपर्क- * पहिला माळा, ध्रुवतारा अपार्टमेंट, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट, लॉ कॉलेज रोड पुणे- ४११००४/ २३, शाह इंडस्ट्रियल इस्टेट, वीरा देसाई रोड, अंधेरी- पश्चिम, मुंबई-४०००५३.संकेतस्थळ – http://www.maacindia.com

एरिना मल्टिमीडिया – संस्थेचा ग्राफिक्स, वेब डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अभ्यासक्रम. संपर्क- * भक्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, मुंबई-पुणे हायवे, िपपरी-चिंचवड महापालिका इमारत, पुणे- १८, * दुसरा माळा, सोनावाला इमारत, २९, बँक स्ट्रीट, फोर्ट-व्हीटी, जुने कस्टम हाऊस, स्टॉक एक्स्चेंजजवळ, मुंबई-४००००१. संकेतस्थळ- http://www.arena-multimedia.com

  • फ्रेमबॉक्स संस्थेचा अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स इन वेब टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड ग्राफिक डिझाइन अभ्याक्रम. संपर्क-ल्लफ्रेमबॉक्स अ‍ॅनिमेशन/ व्हिज्युएल इफेक्ट्स, १०१-१०८, फर्स्ट फ्लोअर, शॉपर्स पॉइंट, अंधेरी पश्चिम, मुंबई- ४०००५८. ई-मेल- info@frameboxx.in,  संकेतस्थळ-  http://www.frameboxx.in
  • पर्ल अ‍ॅकॅडेमी- संस्थेचा पदवीस्तरीय चार वष्रे कालावधीचा कम्युनिकेशन डिझाइन (ग्राफिक्स) अभ्यासक्रम. ल्लएस.एम सेंटर, अंधेरी कुर्ला रोड, मरोळ स्टेशनच्या बाजूला, अंधेरी पश्चिम,मुंबई- ५९. संकेतस्थळ- http://pearlacademy.com ई-मेल- counsellor@http://pearlacademy.com
  • डब्ल्यूएलसीआय अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड ग्राफिक डिझायिनग स्कूल- संस्थेचे अभ्यासक्रम- ल्लसर्टििफकेट प्रोग्रॅम फॉर अंडर ग्रॅज्युएट ल्लसर्टििफकेट प्रोग्रॅम फॉर ग्रॅज्युएट. संपर्क- ल्लमहालक्ष्मी सिल्क मिल प्रायव्हेट लिमिटेड, मथुरादास मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३. संकेतस्थळ- http://www.wlci.in

ई-मेल- mumbai.enquiry@wlci.in

  • सेंट एॅन्जेलो प्रोफेशन एज्युकेशनचा अभ्यासक्रम- बी.एस्सी इन मीडिया ग्राफिक अ‍ॅण्ड अ‍ॅनिमेशन. संपर्क- ल्लसेंट एॅन्जेलो प्रोफेशन एज्युकेशन, सहावा आणि सातवा माळा, ज्योती प्लाझा, फायर ब्रिगेड, एस.वी.रोड, कांदिवली- पश्चिम मुंबई-४०००६७, संकेतस्थळ- http://www.saintangelos.com