संगीत, नृत्य व अन्य ललित कलांमधील पारंगत कलावंतांसाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती..

कला क्षेत्रात आवड आणि गती असलेल्या कलावंताना उच्च शिक्षण-प्रशिक्षणाच्या अर्थसाहाय्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत काही योजना राबवण्यात येतात. या योजनेंतर्गत दरवर्षी शिष्यवृत्ती आणि पाठय़वृत्ती दिली जाते. अशा काही पाठय़वृत्ती योजना पुढीलप्रमाणे आहेत-

  • कल्चरल टॅलेन्ट सर्च स्कॉलरशीप स्कीम (सांस्कृतिक प्रज्ञा शोध योजना) : ही योजना सेंटर फॉर कल्चरल रिसोस्रेस अ‍ॅण्ड ट्रेिनग या संस्थेमार्फत राबवण्यात येते. १० ते १४ वष्रे वयोगटातील मुला-मुलींच्या सर्जनशील कलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवली जाते. कला आणि हस्तकला क्षेत्रातील ६२० प्रज्ञावंत मुलांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते.

यांपकी १०० शिष्यवृत्त्या केवळ आदिवासी कलेसाठी राखीव असतात. १२० शिष्यवृत्त्या पारंपरिक कला सादरीकरण आणि दृश्यकलेमध्ये कार्यरत असणाऱ्या कुटुंबीयांच्या मुलांसाठी राखीव आहेत. शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी २० शिष्यवृत्त्या राखीव आहे. खुल्या संवर्गासाठी ३७५ शिष्यवृत्त्या आहेत. या योजनेंतर्गत प्रारंभी दोन वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांची कामगिरी, गुणवत्ता लक्षात घेऊन वयाच्या २० वर्षांपर्यंत शिष्यवृत्तीला मुदतवाढ मिळू शकते.

  • स्कीम फॉर स्कॉलरशीप टू यंग आर्टस्टि इन डिफरंट कल्चरल फिल्ड्स :

या योजनेंतर्गत ४०० युवा कलावंतांना शिष्यवृत्ती मिळते. यांमध्ये पुढील कलाप्रकारांचा समावेश आहे-

भारतीय शास्त्रीय संगीत (िहदुस्थानी आणि कर्नाटकी / कंठ आणि वाद्य) * भारतीय शास्त्रीय नृत्य (भरतनाटय़म, कथ्थक, कुचिपुडी, कथकली, मोहिनीअट्टम, ओडिसी, मणिपुरी, थांगता, गुडिया नृत्य, छाऊ नृत्य, सत्तिरिया नृत्य) =रंगमंच (अभिनय, दिग्दर्शन) * दृश्यात्मक कला (चित्रकला, शिल्पकला, सर्जनशील छायाचित्रणकला, चिनीमातीची भांडीकला, ग्राफिक्स) * लोककला (कठपुतळी, लोकनाटय़, लोकनृत्य, लोकगीत, लोकसंगीत इत्यादी देशी आणि पारंपरिक कला), लोकसंगीत, (विविध प्रदेशांतील स्त्रीगीते, आदिवासी गाणी, धार्मिक संगीत, विविध संप्रदायातील गीते.) * सुगम शास्त्रीय संगीत (ठुमरी, दादरा, टप्पा, कव्वाली, गजल, कर्नाटकी पद्धतीचे सुगम संगीत, रवींद्र संगीत.) * कठपुतळी कला- यामध्ये महाराष्ट्रातील चामडय़ाच्या बाहुल्या, कळसूत्री बाहुल्यांचा समावेश आहे. अर्हता- प्रगत प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेला पुरावा सादर करावा लागेल. संबंधित विद्यार्थ्यांने निवडलेल्या कलेच्या क्षेत्रात किमान ५ वष्रे प्रारंभिक पुरेसे प्रशिक्षण घेतलेले असावे. या कलेचे त्याला उत्तम ज्ञान असावे. अर्ज करण्याच्या वर्षांतील १ एप्रिल रोजी वय १८ वर्षांहून लहान आणि २५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

कालावधी- ही शिष्यवृत्ती दोन वर्षांसाठी दिली जाते. या शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा ५ हजार रु. आहे. शैक्षणिक साहित्य आणि प्रवासाकरता या शिष्यवृत्तीचा उपयोग होणे अपेक्षित आहे.

अर्जासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे- * पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमाची अर्हता सिद्ध करणारी प्रमाणपत्रे, गुणपत्रिका आणि अनुभवाची स्वसाक्षांकित प्रत. * वयाच्या पुराव्यासाठी दहावी शिक्षण मंडळाच्या ज्या प्रमाणपत्रावर जन्मतारीख नमूद आहे त्याची स्वसाक्षांकित प्रत.* पासपोर्ट आकाराचे छायाचित्र. * ही शिष्यवृत्ती प्रगत प्रशिक्षणासाठी असल्याने विद्यार्थ्यांना गुरूंकडे अथवा अधिकृत संस्थेत किमान ५ वर्षांचे प्रारंभिक प्रशिक्षण घेतल्याचे स्वसाक्षांकित प्रमाणपत्र जोडावे लागेल.* ज्या उमेदवारांना एकापेक्षा अधिक गटासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी प्रत्येक गटासाठी स्वतंत्ररीत्या ऑनलाइन अर्ज करावा. * जे कलावंत चित्रकला आणि शिल्पकला आणि उपयोजित कलाशाखेतील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतील त्यांना त्यांच्या मूळ कलाकृतीचे स्वस्वाक्षांकित छायाचित्र अर्जासोबत जोडावे लागेल. दृश्यात्मक कला या गटासाठी किमान शैक्षणिक अर्हता- बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स.

या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना तज्ज्ञांसमोर मुलाखतीसाठी किंवा स्वत:ची कला सादर करण्यासाठी उपस्थित राहावे लागेल. याची वेळ, तारीख आणि ठिकाण ई-मेलने विद्यार्थ्यांना कळवले जाते. उमेदवारांची निवड गुणवत्तेनुसार होते.

  • कनिष्ठ कलावंत पाठय़वृत्ती : ही योजना सेंटर फॉर कल्चरल रिसोस्रेस अ‍ॅण्ड ट्रेिनग संस्थेमार्फत राबवण्यात येते. या योजनेंतर्गत २०० कनिष्ठ आणि २०० वरिष्ठ श्रेणीतील कलावंतांना पाठय़वृत्ती प्रदान केली जाते. कला क्षेत्रात शैक्षणिक आणि सादरीकरणाच्या अनुषंगाने संशोधन करणाऱ्या कलावंतांना ही पाठय़वृत्ती देण्यात येते. या अंतर्गत कामासाठी दरमहा १० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दोन वर्षांसाठी दिले जाते. वयोमर्यादा- उमेदवाराचे वय १ एप्रिल रोजी २५ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी किमान अर्हता पदवी असून ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्जच स्वीकारले जातात.
  • वरिष्ठ श्रेणी पाठय़वृत्ती : कला क्षेत्रात शैक्षणिक आणि सादरीकरणाच्या अनुषंगाने संशोधन करणाऱ्या कलावंतांना ही पाठय़वृत्ती प्रदान केली जाते. या कामासाठी दरमहा २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दोन वर्षांसाठी दिले जाते. वयोमर्यादा- वय २५ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी किमान अर्हता पदवी आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्जच स्वीकारले जातात. यातील काही उमेदवारांना तज्ज्ञांसमोर मुलाखत द्यावी लागते अथवा त्यांच्या कलेचे सादरीकरण करावे लागते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते. संपर्क-

* सेंटर फॉर कल्चरल रिसोस्रेस अ‍ॅण्ड ट्रेिनग, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, १५ ए, सेक्टर- ७, द्वारका, नवी दिल्ली- ११००७५. संकेतस्थळ- www.ccrtindia.gov.in  ई-मेल- dir.ccrt@nic.in

* सेक्शन ऑफिसर (एस अ‍ॅण्ड फ सेक्शन) खोली क्रमांक- २११, दुसरा मजला, पुरातत्त्व भवन, डी ब्लॉक, जीपीओ कॉम्प्लेक्स, आएएनए, नवी दिल्ली- ११००२३.

ई-मेल- scholar-culture@nic.in

एसबीआयकर्जाऊ शिष्यवृत्ती योजना

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘एसबीआय स्कॉलर लोन स्कीम’ अंतर्गत आयआयएम, आयआयटी, एनआयटीसारख्या देशातील प्रमुख १०६ शैक्षणिक संस्थांतील अभ्यासक्रमांसाठी ३० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज दिले जाते.

हे कर्ज अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पुढील १५ ते १६ वर्षांत फेडता येते. हे कर्ज मिळण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये संस्थेचे प्रवेशपत्र, संपूर्ण भरलेला अर्ज, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या खर्चाचे निवेदन, पालकांचे आणि उमेदवाराचे पॅन कार्ड, पालकांचे आणि उमेदवाराचे आधार कार्ड, ओळख पटवणारे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, उमेदवार किंवा सहकर्जधारकाच्या गेल्या सहा महिन्यांतील बँक खात्याचे विवरण, गेल्या दोन वर्षांतील सह-कर्जदाराचे आयकर विवरण पत्र, पालक किंवा सह-कर्जदाराच्या चलअचल संपत्तीचे थोडक्यात विवरण, पालक किंवा सह-कर्जदाराच्या वेतनाचा पुरावा (वेतनपत्रक किंवा फॉर्म १६.)

शैक्षणिक कर्ज घेतलेल्या उमेदवाराच्या पालकांना व्याजपरतफेडीवर आयकर सवलत मिळते. बँकेच्या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करता येतो. अचूक भरलेला अर्ज आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास

कर्ज त्वरित मंजूर केले जाते. कोणतीही प्रक्रिया फी आकारली जात नाही. सध्या या कर्जावरील व्याजाचा वार्षकि दर ९.७० टक्के आहे.

संपर्क- www.sbi.co.in

 

 

 

Story img Loader