वेगाने विस्तारणाऱ्या रुग्णालय व्यवस्थापन क्षेत्रासंबंधीच्या अभ्यासक्रमांची आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्थांची ओळख..
आरोग्य व्यवस्थेचे व्यवस्थापन ही ज्ञानशाखा गेल्या काही वर्षांत विकसित झाली आहे. देशातील ‘अ’ श्रेणीच्या शहरांमध्ये कॉर्पोरेट्सच्या संकल्पनांनुसार आणि तत्त्वांनुसार आरोग्यसेवा उभ्या राहत आहेत. गेल्या काही वर्षांत आरोग्यसेवेचे रूपांतर मोठय़ा उद्योगामध्ये झाले आहे. मोठी रुग्णालये, अत्याधुनिक यंत्रसामग्री, दर्जेदार वैद्यकीय उपचार अशी काही गुणवैशिष्टय़े या सेवेशी निगडित आहेत. ही सेवा अथवा उद्योग वर्षांकाठी १५ ते १५ टक्के दराने वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ही वाढ आता ‘ब’ श्रेणीच्या शहरांमध्येही होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या संधीही उपलब्ध होत आहेत.
डॉक्टर तसेच इतर आवश्यक मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्य, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा व आर्थिक नियोजन या सर्व बाबींचे नियंत्रण रुग्णालयाचे व्यवस्थापन करत असते. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. हे मनुष्यबळ आरोग्य व्यवस्थापन शाखेशी निगडित आहे. आरोग्य सेवेच्या दर्जाच्या वृद्धीत या तज्ज्ञांचा हातभार लागतो. वैद्यकीय उपचारांसाठी लागणारे सर्व साहित्य, औषधे, यंत्रसामग्री, वाहने, वीज आदी सर्व घटकांच्या पुरवठय़ावर आरोग्य व्यवस्थापकांची सूक्ष्म नजर असते. या बाबींची उपलब्धता, यंत्रसामग्रीची दुरुस्ती आणि देखभाल याकडे ते लक्ष पुरवतात.
रुग्णालयांच्या व्यामिश्र स्वरूपाच्या प्रशासकीय बाबी त्यांना सांभाळाव्या लागतात. विविध पदांवरील मनुष्यबळाची नियुक्ती -निवड, कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन, वेतनवाढ, मनुष्यबळ विकास या बाबींकडे लक्ष पुरवावे लागते. या व्यवस्थापकांचा अंतर्गत समन्वय राखण्याचेही काम करावे लागते. रुग्णालयातील कामगार संघटना, समाजसेवक, स्वंयसेवक यांच्याशी उत्तम संबंध राखून कामकाज व्यवस्थित आणि सुरळीत चालू राहील याची दक्षता घ्यावी लागते. रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा घसरणार नाही आणि रुग्णांच्या तक्रारी येणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते. रुग्णालयाच्या विस्ताराचे आणि विकासाचे नियोजन करावे लागते. त्याचा आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणीसुद्धा करावी लागते.
अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्था
ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली- या संस्थेने दोन वष्रे कालावधीचा मास्टर्स इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. संपर्क- ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, अन्सारी नगर, नवी दिल्ली- ११००२९.
संकेतस्थळ- http://www.aiims.edu
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर- या संस्थेचे अभ्यासक्रम- डिप्लोमा इन हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन. कालावधी दोन वषे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ मॅनेजमेंट. कालावधी- एक वर्ष. अर्हता- एमबीबीएस किंवा बीडीएस/ बी.एस्सी. नìसग/ बी.एस्सी. अलाइड सायन्स/ बी.ए. विथ सोशल सायन्स. संपर्क- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर,
नवी दिल्ली- ११००६७ संकेतस्थळ- nihfw.org
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च- या संस्थेचे अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल अॅण्ड हेल्थ मॅनेजमेंट/ कालावधी दोन वष्रे. कोणत्याही विषयातील ५५ टक्के गुणांसह पदवी. प्रवेशासाठी- CAT/ MAT/ CMAT/ XAT किंवा व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही परीक्षेतील सुयोग्य गुण. संपर्क- आयआयएचएमआर युनिव्हर्सटिी, जयपूर- ३०२९२९.
ईमेल- iihmr@iihmr.edu.in
संकेतस्थळ- iihmr.edu.in
इंटनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च- दिल्लीस्थित या संस्थेने पोस्ट ग्रज्युएट प्रोग्रॅम विथ स्पेशलाझेशन इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, हेल्थ मॅनेजमेंट आणि हेल्थ आयटी मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- दोन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील ५५ टक्के गुणांसह पदवी. प्रवेशासाठी- CAT/ MAT/ CMAT/ XAT या राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही परीक्षेत सुयोग्य गुण.
ईमेल- info.delhi@iihmr.org
संकेतस्थळ- delhi.iihmr.org
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च- बेंगळुरूस्थित या संस्थेचे अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन हेल्थ मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन हेल्थ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी (अभ्यासक्रमांचा कालावधी- दोन वष्रे/अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.) प्रवेशासाठी- CAT/ MAT/ CMAT/ XAT या राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही परीक्षेत सुयोग्य गुण.
संकेतस्थळ- bangalore.iihmr.org
ईमेल- info. bangalore.iihmr.org
अपोलो इन्स्टिटय़ूट ऑफ हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन- हैदराबाद येथील या संस्थेचा अभ्यासक्रम- मास्टर्स इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन. कालावधी- दोन वष्रे. अर्हता- उपयोजित कला शाखा आणि पौर्वात्य भाषेतील पदवी वगळून कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी. हा अभ्यासक्रम उस्मानिया विद्यापीठाशी संलग्न आहे.
संकेतस्थळ- http://www.apolloiha.ac.in
ईमेल – info@apolloiha.ac.in
हिंदुजा इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थकेअर मॅनेजमेंट हैदराबाद- संस्थेचा अभ्यासक्रम – पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स इन हेल्थ केअर मॅनेजमेंट. कालावधी- दोन वष्रे. संकेतस्थळ- http://www.asci.org.in http://www.hindujagroup.com, hindujafoundation/ healthcare.html
केईएम हॉस्पिटल, हेल्थकेअर मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट – या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- केईम हॉस्पिटल, हेल्थकेअर मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट बानू कोयाजी बििल्डग, सहावा मजला, केईएम हॉस्पिटल, रस्तापेठ, पुणे- ४११०११. संकेतस्थळ- kemhospitalhmi.com
देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर – या संस्थेने पाच वष्रे कालावधीचा एमबीए इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑन लाइन चाळणी परीक्षा घेतली जाते. संपर्क- नालंदा कॅम्पस, आरएनटी, रवींद्रनाथ टागोर मार्ग, छोटी ग्वालटोली, इंदौर- ४५२०००. संकेतस्थळ http://www.dauniv.ac.in आणि http://www.mponline.gov.in