इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च अर्थात ‘आयसर’ या संस्थेच्या बीएस-एमएस या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेविषयी..
गेल्या काही वर्षांत विज्ञान संशोधनाला देश-विदेशात उत्तेजन मिळत आहे. जाणीवपूर्वक संशोधन शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे मनासारखे करिअर करता येणे शक्य बनले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे यासाठी केंद्र सरकारतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. याकरता केंद्र सरकारने इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रीसर्च ही वैशिष्टय़पूर्ण संस्था स्थापन केली आहे.
जागजिक दर्जाच्या संशोधनाच्या सोयी-सुविधा, तंत्रज्ञान आणि प्रयोगशाळा उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेकडे या ज्ञानशाखेतील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ या दृष्टीने पाहिले जाते. या संस्थेचे कॅम्पस पुणे, भोपाळ, थिरुवनंतपूरम, मोहाली, तिरुपती, कोलकाता, बेरहमपूर या ठिकाणी आहेत. या सर्व कॅम्पसमध्ये बीएसएमएस अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. यातील ५० टक्के जागा खएए-अऊश्अठउएऊ या परीक्षेतील गुणांवर आधारित तर उर्वरित ५० टक्के जागा या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना व ककरएफ अॅडमिशन टेस्टमधील गुणांवर भरल्या जातात.
या संस्थेचा अभ्यासक्रम बीएस- एमएस या नावाने ओळखला जातो. त्याचा कालावधी पाच वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमास बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
प्रवेश प्रक्रिया
प्रवेशासाठी तीन पद्धतींचा अवलंब केला जातो. त्या पुढीलप्रमाणे आहेत-
किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना-२०१६-१७ च्या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी थेट अर्ज करू शकतात.
बारावीमध्ये ६० गुण मिळायला हवे. तो JEE-ADVANCED परीक्षेतही विशिष्ट गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या दहा हजारांत स्थान मिळायला हवे.
संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा अर्थात- IISER (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च) अॅडमिशन टेस्ट.
या तीनही पद्धतींच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना स्वतंत्ररीत्या अर्ज करावा लागेल. प्रत्येकासाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागेल. अर्ज ऑनलाइनच करावा लागतो.
अर्हता- बारावीमध्ये महाराष्ट्राच्या बोर्डातील खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणांचा किमान कट ऑफ ७९.५ टक्के आहे. शारीरिकदृष्टय़ा अपंग आणि नॉन क्रिमिलेअर इतर मागास वर्ग या संवर्गासाठी या कट ऑफमध्ये ५ टक्के सवलत देण्यात येते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या संवर्गातील उमेदवारांसाठी किमान अर्हता ५५ टक्के आहे.
सर्व कॅम्पससाठी एकच अर्ज भरावा लागतो. विद्यार्थाना मिळालेले गुण आणि त्याने दर्शवलेला पसंतीक्रम लक्षात घेऊन वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये प्रवेश निश्चित केला जातो.
अर्थसाहाय्य
या अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या सर्व उमेदवारांना दरमहा
५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. हा संपूर्णपणे निवासी स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व सोयींनी युक्त वसतीगृह उपलब्ध करून दिले जाते.
या अभ्यासक्रमात पहिल्या दोन वर्षांत मूलभूत विज्ञान शाखेतील सर्व विषय शिकवले जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पेशलायझेशनचा विषय निवडता येतो.
आयसर अॅडमिशन टेस्ट- या परीक्षेद्वारे या संस्थेत प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने अकरावीपासूनच तयारी करायला हवी. या परीक्षेचा अभ्यासक्रम हा एनसीईआरटीच्या (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेिनग) अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. या पेपरमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांवर प्रश्न विचारले जातात. प्रत्येक विषयाचे १५ असे एकूण ६० प्रश्न असतात. प्रत्येक अचूक उत्तरास ३ गुण दिले जातात. न सोडवलेल्या उत्तरास शून्य दिले जाते. चुकलेल्या उत्तरासाठी एका गुणाची कपात केली जाते. प्रश्न बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पद्धतीचे असतात. परीक्षेचा कालावधी- तीन तास. ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे केंद्राचा समावेश आहे. बारावी विज्ञान शाखेत ज्या विद्यार्थ्यांनी गणिताऐवजी जीवशास्त्र आणि जीवशास्त्राऐवजी गणित घेतले असेल त्यांना ही परीक्षा देता येते. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
संपर्क- द चेअरपर्सन, जॉइंट अॅडमिशन कमिटी २०१६, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च कोलकाता, मोहनपूर- ७४१२४६.
संकेतस्थळ- http://www.iiseradmission.in
अर्ज भरण्यासाठी सुरूकरण्यात आलेले पोर्टल २५ मेपासून खुले होईल.
१२ जूनपर्यंत किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत विद्यार्थी अर्ज करू शकतील.
२० जूनपर्यंत IIT JEE-ADVANCED योजनेअंतर्गत विद्यार्थी अर्ज करू शकतील.
२२ जून २०१६ पर्यंत ककरएफ IISER admission test योजनेअंतर्गत विद्यार्थी अर्ज करू शकतील.
३ जून २०१६ ला ककरएफ IISER admission test घेण्यात येईल.
१० जून २०१६ ला ककरएफ IISER admission test चा निकाल घोषित केला जाईल.
मणिपाल विद्यापीठाचे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम
मणिपाल विद्यापीठाने बारावीनंतर करता येतील असे अनेक अभिनव अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते पुढीलप्रमाणे-
* बीबीए इन ई-बँकिंग अॅण्ड फायनान्स
* बीबीए इन फायनान्शियल मार्केट्स
* बीबीए इन लॉजिस्टिक्स अॅण्ड सप्लाय चेन
* बीबीए इन मन रिसोर्स
* बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अॅण्ड टुरिझम
* बीबीए इन इन्शुरन्स अॅण्ड रिस्क मॅनेजमेंट
* बीबीए इन फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट
* बीबीए इन मार्केटिंग
* बी.कॉम इन बिझनेस प्रोसेस सíव्हस
* बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट
* बीए इन कलनरी आर्ट्स
* बीए इन मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन
* बीएस्सी इन अॅनिमेशन
* बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन
* बॅचलर ऑफ डिझाइन इन इंटेरिअर डिझाइन.
संकेतस्थळ- manipal.edu ई-मेल- admissions@manipal.edu
पीआयएमएस-एआयसीईटी-यूजी-२०१६
प्रवरा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेमार्फत एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर पीआयएमएस-एआयसीईटी (प्रवरा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स- ऑल इंडिया कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) यूजी- २०१६ घेतली जाणार आहे.
ही परीक्षा ७ मे २०१६ रोजी दिल्ली, मुंबई, पुणे, कोचीन, औरंगाबाद, चंदिगढ, अहमदाबाद, नवी मुंबई, हैदराबाद आणि लोणी येथे घेतली जाईल. संपर्क- प्रवरा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स, लोणी- ४१३७३६, जिल्हा- अहमदनगर.
संकेतस्थळ- http://www.pravara.com
ई-मेल- admission@pmtpims.org