माहिती-तंत्रज्ञानातील विविध संधींची आणि अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख..
नॅशनल असोशिएशन ऑफ सॉफ्टवेअर अॅण्ड सíव्हसेस कमिशन या संस्थेच्या निरीक्षणानुसार देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची वार्षकि वाढ ११ ते १२ टक्क्यांनी होत आहे. ही वाढ लक्षात घेत या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी जाणून घ्यायला हव्या. यासंबंधीची काही क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
क्लाउड कॉम्प्युटिंग- कोणत्याही भौतिक साधनांशिवाय इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा साठा करण्याची ही प्रकिया अथवा कार्यपद्धती आहे. सध्या क्लाउड कॉम्प्युटिंग तंत्रज्ञांना
ई-कॉमर्स, सोशल मीडिया, बँकिंग या क्षेत्रांत मोठी मागणी आहे.
माहितीचे विश्लेषण- या विषयातील तज्ज्ञ व्यावसायिक संस्थेला सद्य व्यावसायिक प्रवाह आणि कल याबाबत वस्तुनिष्ठ माहिती देतात. याकरता उत्कृष्ट विश्लेषण कौशल्य, अचूक कारणमीमांसा करण्याचे कौशल्य आणि नव्या संगणकीय प्रोग्रॅमच्या निर्मितीचे कौशल्य आवश्यक ठरते. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना विविध संगणकीय भाषांवर प्रभुत्व मिळवावे लागते. सध्या या तज्ज्ञांना वित्त आणि विमा क्षेत्र, तंत्रज्ञान, संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रांत मागणी आहे.
एथिकल हॅकिंग- संगणकाबाबतच्या संभाव्य धोक्यांपासून सावधगिरी बाळगण्यापासून माहिती सुरक्षित राखण्यापर्यंतचे कार्य करणाऱ्या तज्ज्ञांना एथिकल हॅकर्स म्हणून संबोधले जाते. संस्थेच्या माहिती साठय़ाचे संरक्षण करणे, माहिती प्रक्रियेतील कच्च्या दुव्यांचा शोध घेणे, त्यावर उपाय सुचवणे इत्यादी बाबी या तज्ज्ञांना कराव्या लागतात.
बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, अनेक शासकीय संस्था यांना अशा एथिकल हॅकर्सची गरज भासते. या क्षेत्रातील तंत्रज्ञ, सुरक्षा संशोधक, माहिती सुरक्षा सल्लागार, माहिती सुरक्षा विश्लेषक, सायबर सुरक्षा व्यावसायिक, नेटवर्क सुरक्षा अभियंते, डिजिटल फोरेन्सिक अॅनॅलिसिस म्हणून बँकिंग, आयटी, ई-कॉमर्स आणि समाजमाध्यमे यामध्ये काम करू शकतात.
रोबोटिक्स- स्वयंचलन आणि नव्या बुद्धिमान यंत्रणेशी संबंधित असा हा विषय असून यात स्पेशलायझेशन करू इच्छिणाऱ्यांनी मशीनचा अभ्यास, कृत्रिम बुद्धिमत्ता, ुमनॉइड्स, फीडबॅक नियंत्रण कार्यप्रणाली, मानवी आणि रोबो संपर्क नियंत्रण प्रणाली, अभियांत्रिकी, कॉम्प्युटर व्हिजन, सेिन्सग अॅण्ड सेन्सर, मोबाइल रोबोज, मेकॅट्रॉनिक्स डिझाइन, रोबो तंत्रज्ञानातील सांख्यिकी तंत्रे आदी विषयांचे ज्ञान प्राप्त करणे अपेक्षित आहे.
असिस्टिव्ह डिव्हायसेस अॅण्ड सॉफ्टवेअर- शारीरिकदृष्टय़ा अपंग असणाऱ्या व्यक्तींच्या विविध भौतिक व मानसिक गरजा भागवण्याच्या अनुषंगाने सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची निर्मिती करण्यासाठी विकसित होत असलेले हे नवे क्षेत्र आहे.
यात कार्यरत होण्याकरता मानव संगणक आंतरसंवाद, अॅप्लाइड बायोमेकॅनिक्स, मोटार कंट्रोल इंटरफेस आदी बाबींचे ज्ञान मिळवणे आवश्यक ठरते. साहाय्यक तंत्रज्ञान सॉफ्टवेअर विकासाच्या अनुषंगाने मानवी भावनांशी सांगड घालण्याचे कौशल्य शिकावे लागते. अपंगांसाठी उपयुक्त ठरू शकतील अशा संयंत्रांचा विकास आणि निर्मिती, पर्यायी संवादाची साधने आदी बाबींचे ज्ञान मिळवणे आवश्यक ठरते.
गेम डेव्हलपमेंट- कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विविध प्रकारच्या संगणकीय खेळांचे संकल्पन, विकास आणि निर्मिती करण्याचे कौशल्य उमेदवारांना प्राप्त करावे लागते. या क्षेत्रात स्पेशलायझेशन करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संगणकीय खेळांशी संबंधित ध्वनी संरचना, खेळाचे विविध पलू, खेळाचे विश्लेषण, ध्वनी एक्स्प्रेशन, प्रगत मोबाइल उपकरणे, संगणकीय अॅनिमेशन आदी बाबींचे ज्ञान अवगत करावे लागते.
मल्टीमीडिया टेक्नॉलॉजी- सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि सर्जनशील कला यांच्या समन्वयाचे तंत्र या क्षेत्रातील तंत्रज्ञांना शिकावे लागते. व्हिज्युअल इफेक्ट्स, मोबाइल अॅप्लिकेशन, अॅण्ड्रॉइड अॅप्स, व्हिज्युअल ग्राफिक्स, डिजिटल मीडिया, इंटेलिजंट कंट्रोल, इंटरअॅक्टिव्ह कम्युनिकेशन डिझाइन, सिक्युरिटी अॅण्ड इंटिग्रिटी ऑफ द सिस्टीम आदी विषयांचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमांतर्गत प्राप्त करता येऊ शकते.
कॉम्प्युटर आíकटेक्चर- या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संगणकाच्या कार्यक्षम हार्डवेअरचा विकास आणि निर्मितीकडे लक्ष द्यावे लागते.
या विषयाच्या प्रशिक्षणात कॉम्प्युटर आíकटेक्चर, एम्बेडेड सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक डिझाइन ऑटोमेशन, कॉम्प्युटेशनल इंटेलिजन्स, वायरलेस कम्युनिकेशन, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, एम्बेडेड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ऑपरेटिंग सिस्टीम्स आदींचा समावेश असतो.
तांत्रिक विक्री- माहिती तंत्रज्ञानाचा व्यवसायवृद्धीसाठी कसा वापर करता येईल याकडे हे तज्ज्ञ लक्ष पुरवतात.
व्यवस्था विश्लेषक- या तंत्रज्ञाला व्यवसायाच्या अनुषंगाने येणाऱ्या समस्यांची निश्चिती आणि विश्लेषण करावे लागते. या तज्ज्ञांना प्रकल्प व्यवस्थापक, विकासक, गुणवत्ता विश्लेषक, कार्यप्रणाली अभियंते, ग्राहक यांच्याशी सतत संपर्क आणि समन्वय साधून सर्व घटकांच्या उपयुक्ततेच्या उपाययोजना सुचवाव्या लागतात आणि त्यांची अंमलबजावणीही करावी लागते. व्यवसाय-तंत्रज्ञानाचे समन्वय साधण्याचे कौशल्य प्राप्त होणे गरजेचे असते. त्याअनुषगांने नव्या सॉफ्टवेअरचा प्रभावी वापर करता यायला हवा.
शिक्षण-प्रशिक्षण :
या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी माहिती तंत्रज्ञान या विषयाचा पदवी अथवा पदव्युत्तर स्तरावर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. याद्वारे संगणकीय प्रोग्रॅिमगच्या भाषा, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, प्रकल्प नियोजन, संगणकीय नेटवìकग, माहिती सुरक्षा आदी विषयांचे ज्ञान संपादन करता येते.
या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर प्राप्त ज्ञानाचा प्रभावीरीत्या वापर करणे व त्याचे अपडेशन करणे अत्यावश्यक ठरते. कंपनी अथवा संस्थेच्या गरजांनुसार प्रगत सॉफ्टवेअर हाताळता यायला हवे. माहिती तंत्रज्ञानाच्या विविध पलूंवर हुकमत मिळवणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन एडिटर, वेब डिझायनर, ग्राफिक डिझायनर, लीगल इन्फम्रेशन स्पेश्ॉलिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, जावा डेव्हलपर, इंटरफेस इंजिनीअर, वेब डेव्हलपर, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, सल्लागार म्हणून रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात.
सी-डॅकचे अभ्यासक्रम :
सी-डॅक (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) या संस्थेने संगणकीय अभ्यासक्रमातील काही स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्याचा उपयोग माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर घडविण्यासाठी होऊ शकतो. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सिस्टीम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिग डाटा अॅनॅलिटिक्स.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन व्हीएलएसआय डिझाइन.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मोबाइल कॉम्प्युटिंग.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आयटी इन्फ्रास्ट्रक्चर्स.
सिस्टीम्स अॅण्ड सिक्युरिटी.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरनेट ऑफ िथग्ज.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एम्बेडेड सिस्टीम डिझाइन.

हे अभ्यासक्रम नागपूर, पुणे, नाशिक, पुणे, सोलापूर येथील संस्थेच्या केंद्रामध्ये शिकता येतात.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सी-सीएटी ही परीक्षा
१९ जून २०१६ रोजी घेतली जाणार आहे.
संपर्क- http://www.cdac.in, acts.cdac.in