मार्केटिंग आणि ब्रँडिंग विषयक अभ्यासक्रम विविध अभ्यासक्रमांची ओळख..
मार्केटिंग आणि ब्रँडिंग हे आज कॉर्पोरेट विश्वाचा महत्त्वाचे भाग बनले आहेत. मार्केटिंग कम्युनिकेशनच्या क्षेत्रात आता इंटरनेटही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आंतरशाखीय विषयांच्या योग्य समन्वयातून यशस्वी ब्रँिडगसोबत विक्रीच्या विविध माध्यमांना गती मिळू शकते. व्यवस्थापन आणि विपणन या विषयांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले उमेदवार या क्षेत्रांत वेगाने प्रगती करू शकतात. मार्केटिंगविषयक तज्ज्ञाने कंपनीच्या वस्तूंचा आणि उत्पादनांचा दर्जा उच्च प्रतीचा राहील याकडे कंपनीचे लक्ष सातत्याने वेधणे आवश्यक आहे, कारण कमी प्रतीची गुणवत्ता आणि दर्जाहीन उत्पादनांची विक्री यामुळे मार्केटिंग पुरते अयशस्वी ठरू शकते.
गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या कंपनीला ब्रँिडग करणे शक्य होत नाही. अशा कंपन्या ग्राहकांचा विश्वास प्राप्त करू शकत नाहीत. मार्केटिंग कम्युनिकेटर हा ग्राहक व कंपनी आणि विविध माध्यमे यांच्यातील महत्त्वाचा व प्रभावी दुवा ठरू शकतो. एखाद्या कंपनीचे बाजारपेठेतील सध्याचे स्थान आणि भविष्यात या स्थानात होणारी घट अथवा वाढ याविषयी मार्केटिंग कम्युनिकेटर आपल्या कौशल्याद्वारे अथवा ज्ञानाद्वारे कंपनी व्यवस्थापकांना योग्य अशी माहिती देत सावधगिरीच्या उपयोजनाही सूचित करू शकतात.
मार्केटिंग कम्युनिकेटरला जीवनशैलीत सातत्याने होणारे बदल आणि त्यामुळे विविध वस्तू अथवा उत्पदकांची मागणी अथवा घट यांचा अंदाज येऊ शकतो. त्यानुसार कंपनीच्या विक्री अथवा उत्पादनांच्या बाबतच्या व्यूहनीतीत सातत्याने बदल करता येणे शक्य होऊ शकते. कम्युनिकेशन आणि मॅनेजमेंट या दोन विषयांतील पदवीधर तसेच पदव्युत्तर पदविका प्राप्त उमेदवार मार्केटिंग कम्युनिकेशनच्या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतात.
मुद्रा इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हर्टायजिंग, झेवियर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन या संस्था मार्केटिंग कम्युनिकेशन या विषयांत स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम चालवतात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि कंपन्या, कॉर्पोरेट मीडिया एजन्सीज आणि डिपार्टमेंट्स, कम्युनिकेशन कन्सल्टंट्स यांत मार्केटिंग कम्युनिकेटर विषयक करिअरच्या संधी मिळू शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा