नौकानयन अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या आघाडीच्या प्रशिक्षणसंस्था आणि तेथील उपलब्ध अभ्यासक्रमांविषयी..
विश्वकर्मा मेरिटाइम इन्स्टिटय़ूट
=ग्रॅज्युएट इन मेकॅनिकल/नेव्हल आíकटेक्ट्स/ ऑटोमेशन इंजिनीअिरग- या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाची मान्यता प्राप्त आहे. अर्हता- पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला किमान ६० टक्के गुण. दहावी किंवा बारावीमध्ये इंग्रजी विषयात किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय २८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. उमेदवार वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त असावा. उमेदवाराला रातांधळेपणा नसावा. संपर्क: सव्र्हे नंबर- २, कोंढवा बुद्रुक, पुणे- ४११०४८. संकेतस्थळ- vmipune.com
ई-मेल- admission@vmipune.com
=डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स लीिडग टू बी.एस्सी (अॅप्लाइड नॉटिकल सायन्स) : अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या किमान एका वर्षी भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेला असावा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठामधून बी.ई./बी.टेक. पदवी घेतलेली असावी. दहावी-बारावीमध्ये इंग्रजी विषयात किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. अभ्यासक्रम सुरू होण्याच्या तारखेला विद्यार्थ्यांचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. संस्थेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिीमार्फत घेण्यात येणारी सामायिक प्रवेश चाचणी द्यावी लागेल. ही परीक्षा दरवर्षी जानेवारी/फेब्रुवारी आणि जुल/ऑगस्टमध्ये घेतली जाते. या परीक्षेमध्ये सायकोमेट्रिक टेस्ट, लेखी परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश असतो.
महाराष्ट्र अॅकॅडेमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अॅण्ड ट्रेिनग, पुणे या संस्थेने दोन अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
=बी.टेक.- मरिन इंजिनीअिरग. अर्हता- बारावी विज्ञानशाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांत सरासरी
६० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. १ ऑगस्ट रोजी उमेदवाराचे वय २५ पेक्षा कमी नसावे.
=बीएस्सी इन नॉटिकल सायन्स- या अभ्यासक्रमासाठीची अर्हता बीटेक- मरिन इंजिनीअिरग या अभ्यासक्रमासारखी आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर र्मचट शिपवर डेक कॅडेट (ट्रेनी नेव्हिगेटिंग ऑफिसर) म्हणून नियुक्ती मिळू शकते. विशिष्ट कालावधीनंतर व डीजी शििपग यांच्याकडून घेण्यात येणारी सुयोग्यता परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर हे उमेदवार जहाजाच्या कॅप्टन पदासाठी पात्र ठरू शकतात.
मरिन इंजिनीअिरग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ट्रेनी मरिन इंजिनीअर म्हणून नियुक्ती मिळू शकते. र्मचट शिपवर विशिष्ट कालावधी व्यतीत केल्यानंतर आणि डीजी शििपग यांच्याकडून घेतली जाणारी सुयोग्यता परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर हे उमेदवार जहाजाचे मुख्य अभियंता म्हणून काम करण्यासाठी पात्र ठरू शकतात. साधारणत: सहा ते सात वर्षांत अशी संधी मिळू शकते.
पत्ता- १. महाराष्ट्र अॅकॅडेमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अॅण्ड ट्रेिनग,
गट क्रमांक १४०, राजबाग, पुणे-सोलापूर महामार्ग,
लोणी-काळभोर, पुणे- ४१२२०१.
संकेतस्थळ- http://www.manetpune.edu.in
ई-मेल-office@manetpune.com , admissions@manetpune.edu.in
२. महाराष्ट्र अॅकॅडेमी ऑफ इंजिनीअिरग अॅण्ड एज्युकेशन रीसर्च, रस्ता क्रमांक १२४, पौड रोड, कोथरुड, पुणे- ४११०३८. =तोलानी मेरिटाइम इन्स्टिटय़ूूट
बी.एस्सी. नॉटिकल सायन्स आणि बी.टेक- मरिन इंजिनीअिरग हे दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी तोलाणी मेरिटाइम इन्स्टिटय़ूूटतर्फे ऑनलाइन चाचणी व मुलाखत घेतली जाते. ही परीक्षा मे २०१६ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात मुंबई, चेन्नई, दिल्ली, देहरादून, चंदिगढ, बेंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, रांची, गौहाटी, जयपूर येथे घेतली जाईल.
ऑनलाइन चाचणीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, कार्यकारणभाव, सामान्यज्ञान, विश्लेषणात्मक क्षमता या विषयांवर प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान, विषय ज्ञान, कल आणि व्यक्तिमत्त्वाचे पलू जाणून घेण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीनंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाते.
संपर्क- तोलानी मेरिटाइम इन्स्टिटय़ूूट, तळेगाव-चाकण रोड, इंदुरी- ४१०५०७. संकेतस्थळ- http://www.tolani.edu
ई-मेल- info@tmi.tolani.edu
बी.एस्सी. नॉटिकल सायन्स या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीसुद्धा ऑनलाइन चाचणी घेतली जाते. बीट्स पिलाणी संस्थेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागत नाही.
इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिी
इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीच्या मुंबई कॅम्पसअंतर्गत ट्रेिनग शिप चाणक्य, एलबीएस कॉलेज ऑफ अॅडव्हान्स्ड मेरिटाइम स्टडीज रीसर्च आणि मरिन इंजिनीअिरग अॅण्ड रीसर्च इन्स्टिटय़ूूट मुंबई (मेरी) या तीन संस्था कार्यरत आहेत.
=टी.एस. चाणक्य-
प्री सी ट्रेनिंग देणारी ही आपल्या देशातील पहिली संस्था आहे.
टी. एस. चाणक्य कॅम्पस येथे तीन वष्रे कालावधीचा बी.एस्सी. इन नॉटिकल सायन्स, एक वर्ष कालावधीचा डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, फायर फायटिंग कोर्स, बेसिक मॉडय़ुलर कोस्रेस इन-हाऊस कॅडेट्स, फायर प्रीव्हेन्शन अॅण्ड फायर फायटिंग, पर्सनल सेफ्टी अॅण्ड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आदी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
पत्ता- टी. एस. चाणक्य, कारावे, नेरुळ, नवी मुंबई- ४००७०६.
ई-मेल- director.mum@imu.co.in
=मरिन इंजिनीअिरग अॅण्ड रीसर्च इन्स्टिटय़ूट, मुंबई
बी.एस्सी. इन मेरिटाइम सायन्स हा अभ्यासक्रम चालवणारी ही आपल्या देशातील एकमेव संस्था आहे. ‘मेरी’ संस्थेने ग्रॅज्युएट इन मेकॅनिकल इंजिनीअिरग आणि ग्रॅज्युएट इन नेव्हल आíकटेक्चर हे एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. असे अभ्यासक्रम सुरू करणारी ही पहिली संस्था ठरली आहे. मेरी कॅम्पस येथे तीन वष्रे कालावधीचा बी.एस्सी. इन मेरिटाइम सायन्स आणि एक वर्ष कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मरिन इंजिनीअिरग हे अभ्यासक्रम चालवले जातात. या संस्थेच्या परिसरात वसतिगृहाची सोय आहे. पत्ता- एमईआरआय, हे बंदर रोड, मुंबई- ४०००३३.
ई-मेल- headmeri.mum@imu.co.in,
संकेतस्थळ- http://www.imumumbai.edu.in
=एलबीएस कॉलेज ऑफ अॅडव्हान्स्ड मेरिटाइम स्टडीज रीसर्च
एलबीएस कॉलेज ऑफ अॅडव्हान्स्ड मेरिटाइम स्टडीज रीसर्च मर्चन्ट नेव्ही क्षेत्रातील व्यक्तींना आवश्यक ते प्रशिक्षण देणारी संस्था आहे.
नॉटिकल सायन्स आणि मेरिटाइम इंजिनीअिरगमधील अनुक्रमे एक्स्ट्रा मास्टर्स आणि एक्स्ट्रा फर्स्ट क्लास इंजिनीअिरग अभ्यासक्रम या संस्थेत उपलब्ध आहेत.
एलबीएस कॅम्पस येथे सर्टििफकेट ऑफ कॉम्पीटन्सी कोर्स, सिम्युलेटर बेस्ड कोर्स आणि नॉन सिम्युलेटर बेस्ड मॉडय़ुलर कोस्रेस हे अभ्यासक्रम करता येतात. पत्ता- एलबीएस मुंबई,
हे बंदर रोड, मुंबई- ४०००३३.
ई-मेल- headlbs.mum@imu.co.in
संकेतस्थळ- http://www.imu.edu.in
सुरेश वांदिले
नौकानयन प्रशिक्षणक्रम
नौकानयन अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या आघाडीच्या प्रशिक्षणसंस्था आणि तेथील उपलब्ध अभ्यासक्रमांविषयी..
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 26-04-2016 at 07:38 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips for career guidance