एखाद्या अभ्यासक्र माला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची आवड, त्या विषयातील गती समजून घेणे आवश्यक असते. त्याविषयी..
अभ्यासक्रम आणि संस्थेची निवड करताना पालकांनी मुलाच्या क्षमतांचा विचार अवश्य करायला हवा. चित्रकलेमध्ये गती असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांला विधीविषयक अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी भरीस घातले तर तो या क्षेत्राचे ज्ञान बळेबळेच मिळवेल, त्याला त्या अभ्यासाचे ओझे वाटेल, जेमतेम डिग्री मिळवण्यासाठी त्याला आटोकोट प्रयत्न करावे लागतील आणि मग पुढे त्यासंबंधित क्षेत्रात काम करण्याचा त्याला ना उत्साह राहील, ना संधी मिळेल!

Story img Loader