साहित्य : पाव वाटी चणा डाळ, एक टेबलस्पून मूग डाळ, १/४ टेबलस्पून मसूर डाळ, एक वाटी काकडीचे तुकडे, एक हिरवी मिरची, अर्धा टीस्पून आले किसून, एक वाटी घट्ट दही, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर.
कृती : सर्व डाळी एक-दीड तास अगोदर भिजवा. नंतर चाळणीत निथळून घ्या. दह्य़ात मीठ, साखर चवीनुसार घाला. आलं बारीक किसून घाला. डाळी घालून दही मिसळा.
वेळेवर काकडीचे तुकडे घाला व वरून फोडणीतली भरली मिरची चुरून मिक्स करा. वरून कोथिंबीरने सजवा. तिखट आवडत असल्यास हिरव्या मिरचीची फोडणी द्या. सजावटीसाठी टोमॅटोचं फूल ठेवा.
मँगो चेक्स
साहित्य : ३ वाटी आंब्याचा रस (पल्प), २ वाटी साखर, मिल्क मसाला, वेलची पावडर.
कृती : एका पॅनमध्ये आंब्याचा रस घेऊन रस आटवून घ्या. रस थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात साखर, खवा, मिल्क मसाला नीट मिसळून घ्या. नंतर पोळपाटावर गोळा जाडसर लाटून घ्या किंवा हाताने प्लेन थापून घ्या. सुरीने व्यवस्थित चेक्स पाडा वरून सजावटीसाठी मेवाचे काप घाला.
चेक्ससाठी आपण आंब्याचा रस ओव्हनमध्ये आटवू शकतो. आंब्याच्या पुरीचेसुद्धा चेक्स करता येतात.
आंब्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व असल्यामुळे उन्हाळ्यात हे चेक्स गृहिणी आवर्जून करतात. त्याप्रमाणे हे चेक्स नाश्त्याच्या थाळीची शोभा, स्वादसुद्धा वाढवतात.
याडणी
साहित्य : १०० ग्रॅम तूर डाळ, १०० ग्रॅम मूग डाळ, १०० ग्रॅम उडद डाळ, १०० ग्रॅम चणा डाळ व १०० ग्रॅम तांदूळ, एक चमचा धणे व जिरे, प्रत्येकी एक चमचा हिरव्या मिरच्या, कोथिंबीर व चवीनुसार मीठ.
कृती : याडणी करण्यापूर्वी सर्व डाळी व तांदूळ एकत्र करून चार तास भिजत घालावे. त्यानंतर मिक्सरमधून धने, जिरे, मिरच्या व डाळी वाटून घ्यावे. दोन तास पीठ झाकण लावून ठेवावे. पीठ इडलीप्रमाणे घट्ट असेल. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालावे. निर्लेपच्या तव्यावर एक चमचा तूप किंवा तेल घालून तयार केलेले पळीभर मिश्रण तव्यावर टाकावे व ते झाकून ठेवावे. पावाप्रमाणे फुगते. त्यानंतर ते परतून त्यावर एक चमचा तूप घालावे. गरम असतानाच नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याच्या कोरडय़ा चटणीसोबत खावयास द्यावे.
या पदार्थात सगळ्या प्रकारच्या डाळी व तांदूळ वापरल्यामुळे आरोग्यासाठी हा पौष्टिक पदार्थ आहे. हा पदार्थ थंड किंवा गरम खाल्ला तरी चविष्ट लागतो.
मुलांचा डब्यात किंवा सहलीला नेण्यासाठी हा पदार्थ सोयीचा आहे.
ममता कळमकर – response.lokprabha@expressindia.com