चीझलिंग

साहित्य : पाव किलो मैदा, चार चीझ क्यूब, अगदी थोडं मीठ (कारण चीझ खारट असते.) गरम तेलाचे मोहन.

कृती : मैद्यात चीझ, मीठ व दोन टेबल स्पून (गरम तेल) घालून चांगले एकत्र करा. पिठात पाणी घालून ते पीठ घट्टसर मळून घ्यावे. १५ ते २० मि. झाकून ठेवावे.

पिठाचे गोळे करावेत. त्या गोळय़ाची पोळी लाटावी व कातण्याने अगदी बारीक बारीक चौकोन कापून घ्यावेत व मंद आचेवर तळून घ्यावेत.

 

नमकीन स्टिक्स

साहित्य :  मैदा पाव किलो, ओवा लहान चमचा १, मीठ, १ पळी गरम तेल.

कृती : पाव किलो मैद्यात ओवा, मीठ व गरम तेल एकत्र करावे. पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ जरा घट्ट भिजवावे. भिजवून झाल्यावर ते पीठ अर्धा तास झाकून ठेवावे. अध्र्या तासानंतर त्या पिठाचे गोळे करावेत. पोळीसारखे जरा जाडसर लाटून घ्यावेत व कातण्याने लांब कापून घ्यावेत. अगदी मंद गॅसवर या नमकीन स्टिक्स तळाव्यात.

 

राऊन्ड टिट-बिट बिस्किट्स

साहित्य : १ वाटी साखर, १ वाटी तूप (साजूक), १ वाटी दूध, कॉर्नफ्लोर

२ चमचे, तांदूळ पिठी २ चमचे.

कृती : १ वाटी तूप, १ वाटी दुधात १ वाटी साखर विरघळेपर्यंत हलवत राहा. त्या मिश्रणात मावेल तेवढा मैदा घाला. त्या मिश्रणात कॉर्नफ्लोर व तांदूळ पिठी घालावी. चांगलं घट्ट पीठ मळून घ्या. पिठाचे गोळे तयार करा व पोळीप्रमाणे जरा जाडसर पोळी लाटून घ्या. लहान बाटलीच्या झाकणाने त्या पोळीवर झाकण दाबून गोल-गोल िरग्ज काढून घ्या व ते तेलात किंवा तुपात मंद आचेवर तळून घ्या.
चारुता परांजपे –