बॉब डिलन, त्याला मिळालेला नोबेल साहित्य पुरस्कार आणि आपला सांस्कृतिक अवकाश यावर मला लिहायचंय. लिहिण्याआधी सहज गुगलवर त्याच्या बातम्या बघाव्यात म्हणून खिडकी उघडतो, तर अगदी गरमागरम बातमी समोर येते आहे! पेर व्स्टबर्ग या स्वीडिश लेखकाने- जो नोबेल पुरस्कार समितीचाही सदस्य आहे- नुकतंच एका तासापूर्वी टीव्हीवर म्हटलंय, की बॉब डिलन हा असंस्कृत आणि उद्धट आहे! नोबेल समितीचा साधा फोनही तो उचलत नाही. त्या स्वीडिश लेखकाचा वैताग मी समजू शकतो, कारण बॉबच्या अधिकृत वेबसाइटवरही केवळ एक ओळ नोबेल पुरस्कारासंदर्भात उशिराने भरती झाली. आणि आज ती नाहीशी झाली आहे. हा लेख तुम्ही वाचणार आहात तोवर अजूनही घडेल अधिक काही! पण एकंदर दिवाळीच्या शुभमुहूर्ती नोबेल-फटाके वाजायला सुरुवात झाली आहे, हे नक्की. त्या उठवळ गीतलेखकाला मुदलात हा पुरस्कार मिळायला नको होता, असं म्हणणारे समीक्षक ताज्या घटनांमुळे आपलं मत कसं ग्राह्य़ होतं, हे आनंदाने वेबवर छापत सुटले आहेत. दुसरीकडे बॉबचे चाहते- आणि ज्यांत उत्तम लेखकही आहेत- त्याची सुप्त बंडखोरी इथे प्रतीत होते आहे असं सांगत आहेत. बॉबच्या चाहत्यांमध्ये यावेळी नोबेल मिळू शकले असते ते सलमान रश्दीही आहेत. त्यांना नेमाडे आवडत नसले तरी बॉब डिलन आवडतो. एकेकाची मर्जी आणि एकेकाचं राजकारण. मला मात्र वाटतंय, या उत्तम गुणाच्या बॉबने एक तर सरळ नोबेल पुरस्कार नाकारावा- जांॅ पॉल सात्र्ने १९६४ साली नाकारलेला तसा- किंवा आनंदाने स्वीकारावा. आणि असंही वाटतंय, की पुरस्कार किंवा कुठल्याही अन्य तऱ्हेने बघताना कलाकार नजरेआड करावा; त्याची कला बघावी. तीच अखेर दीर्घजीवी आहे!  आणि फिरून जाणवतंय, की ‘पर्सनल इज पोलिटिकल’ हे इथंही तितकंच खरं नाही का? कुणास ठावूक, तो वृद्ध बॉब डिलन आता गुणगुणत असेल त्याचंच गाणं :

kNobody feels any pain

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
review of ramachandra guha s speaking with nature book
दखल : मानवी भविष्यासाठी…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान

tonight as I stand

inside the rain’

प्रसिद्धीच्या वर्षांवात भिजणारा तो बॉब आणि त्याच्या आतली ती अस्सल, टणक असंतोषाची रग! स्वीडिश मंडळींनी नोबेल पुरस्कार देताना बॉबविषयी म्हटलंय की, त्याने समृद्ध अमेरिका-गीत परंपरेला नवे आयाम दिले. (New poetic expressions within great American Song tradition.) पण मला पुढे जाऊन म्हणावंसं वाटतंय, की केवळ अनुभवांचे नवे आकार त्याने दिले नाहीत, तर त्याने त्याच्या गाण्यांमधून नवे अनुभवच मांडले. आर्थिक समृद्धीने उतू जाणारं अमेरिकेचं १९५० चं दशक, त्या देशाची वाढलेली भूक आणि मस्ती, युद्धखोरीचे संकेत व प्रत्यय आणि अशा वेळी एल्व्हिस प्रेस्ले अजूनही गाताहेत चंद्राची, वाऱ्याची, पोरींची गाणी! देताहेत झटके ड्रम्सच्या तालावर. अमेरिकेची नवी श्रीमंत टीनेजर पिढी कमरेला झटके देत त्याचं अनुकरण करत मागून गाते आहे!

अर्थात सगळे तरुण असे नाहीत. जागतिक राजकारण कळणारे ते अस्वस्थ जीव आहेत. ते मूर्खही नाहीत आणि असंवेदनशीलही नाहीत! ते गर्दी करताहेत साध्याशा स्टेजपुढय़ात. त्या स्टेजवर बॉब डिलन साधीशी गिटार घेऊन गाऊ लागला बघा :

kCome you masters of war

you, that build big guns

you, that build big bombs

you, that hide behind the walls

you, that hide behind the desks

I just want you to know

I can see through your masksl

‘युद्धाच्या जनकांनो, या असे समोर

तुम्हीच.. बंदुका तयार करणाऱ्यांनो

तुम्हीच.. बॉम्बगोळे बनवणाऱ्यांनो

तुम्हीच.. जे आता लपलात भिंतीआड

तुम्हीच.. जे लपला आहात खणांआड

तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मला, की

मुखवटय़ाआडचा तुमचा चेहरा

दिसतोय मला काळाभोर

युद्धाच्या जनकांनो, या! या२२ असे समोर’

आणि मग ते तरुण पागल होताहेत. त्यांच्या भावनांना हा कलाकार योग्य शब्द देतो आहे. योग्य सूर तिथे आहेत. उगाच गोंडसही नव्हेत. बॉब डिलनचा आवाज हा काही खास नाही. त्याच्या गळ्याला अनेक तांत्रिक मर्यादा आहेत. पण त्या गळ्याने जे संवेदन मांडलं, ते मांडायला अनेक कसलेले गळे घाबरले, हे नक्की. धाडसीच आहे हा बॉब डिलन.

आणि नोबेल पुरस्काराची ही सद्य:समितीही मला धाडसीच वाटते आहे. गीतकाराला नोबेल? कविता व्यासपीठावर गाणाऱ्याला चक्क नोबेल? जो पुरेसा लोकांना आवडतो; ज्याला ऑस्कर, ग्रॅमी वगैरे आधीच पुरस्कार मिळालेत- त्याला चक्क साहित्याचं नोबेल? अभिजनवाद्यांच्या लेखी हा गुन्हाच आहे की! ग. दि. माडगूळकर किंवा शांता शेळके यांना साहित्य अकादमी पुरस्कार द्यायचा असतो का? पण या नोबेल समितीने फार विचारपूर्वक हा निर्णय केला असणार असं तिच्या विधानांवरून वाटतंय. एकतर यामुळे जगभरच्या साहित्य पुरस्कारांचे जे सध्या घट्ट निकष असतात ते बदलायला लागणार असं वाटतंय. समितीनं म्हटलंय, होमर अडीच हजार वर्षांपूर्वी वाद्ये सोबत घेऊन गातच असे. आज त्या महाकवीची कविता आपण (न ऐकता) वाचतो! हे खरंच. ज्ञानेश्वरीही तो करुणेचा महानिधी असलेला तेजस्वी युवक जनसामान्यांपुढे ऐकवत नव्हता का? ‘आता देईजो अवधान। तुम्ही बोलविल्या मी बोलेन..’ नुसती लिहिली-वाचली गेली नाही मग कुठली ओवी. बोलली गेली; ऐकली गेली.  कवितेला जसं दृश्यरूप असतं, तसं श्राव्यरूप असतंच. दृश्यरूपाची वाखाणणी अभिजन समीक्षक करतात. श्राव्य-रूपाकडे त्यांचं पटकन् लक्ष जात नाही. कवितेचे नादपट्टे हे कधी मनात वाचताना जाणवतात. कधी कुणी त्याचं रचलेलं गीत गातो तसे समजत जातात. आणि बॉब डिलनच्या कवितेची नुसती नादवत्ता नव्हे, तर अर्थाची गुणवत्ताही सरसच आहे. नोबेल जाऊ दे, पण मी म्हणेन, तो गाता लेखक आहे! दोन डिस्कोर्स- संगीत व साहित्य नावाचे स्वयंभू डिस्कोर्स- तो सहज एकवटतो आहे. अनुभवाचं समग्र रूप कधी कधी शब्द आणि सूर एकवटत येतं. बॉब डिलनसारख्यांच्या रूपाने ते समोर येत राहतं.

मी परवाच एका वृत्तवाहिनीवर बॉब डिलनवर बोलत होतो. त्याचं ते ‘कम यू मास्टर्स ऑफ वॉर’ हे गाणं मी गायलो तिथे आणि गाता गाता मला जाणवलं, की आजही बॉब डिलनचं ते काव्य तितकंच प्रस्तुत आहे.. रिलेव्हंट आहे. जगभर ते जिथे जिथे कुरुक्षेत्रं आहेत, तिथे ते भेदक गीत आजही लागू होतं. आणि आताशा युद्धंही किती तऱ्हांची असतात. उरीला झालेलं युद्ध थेट आणि दहशतवादाविरुद्धचं असतं. पाटणला जे झालं तेही छोटं युद्धच असतं; पण हेतूंचा थांग लागत नाही; अभिव्यक्ती बाजूलाच राहते! बॉब डिलन उरीमध्ये आहे; बॉब डिलन पाटणमध्येही आहे! बॉब जितका त्या साठीच्या अस्वस्थ अमेरिकन तरुणांचा होता, तितकाच आज आसपासचा गदारोळ नीट पारखणाऱ्या फेसबुकीय मराठी तरुण पिढीचाही आहे! आणि म्हणूनच ‘वा म्हणताना’ मध्ये इंग्रजीत लिहिणारे लेखक नसतात; तरी तो आज इथे आहे! बॉब डिलनचं गाणं इंग्रजी आहे; बॉबचं संवेदन मराठीही आहे!

बॉब डिलनसारखं कुणी मराठीत आहे का? स्वत:चं गीत रचून गाणारं? गदिमा, शांता शेळके, सुधीर मोघे ते गुरू ठाकूर, अश्विनी शेंडे अशी उत्तम गीतकारांची परंपरा मराठीत आहे. त्यांची सगळी गीतं कवितेत मोडता आली नाहीत, तरी बव्हंशी मोडता येतात. (आणि सगळ्याचं छापील कविताही नेहमीच काव्यात्मकता बाळगून नसतात!) पण काहीसं विद्रोही संवेदन बॉबसारखं कुणी गातंय का? संभाजी भगतचं नाव मला स्मरतंय. आणि त्या गाण्यांवर मी याच सदरात पूर्वी सविस्तर लिहिलं आहेच. पण एकदम मला जाणवतंय, की पु. ल. देशपांडय़ांमध्ये ही ‘व्हेन’ होती. ती त्यांनी पुरेशी दर्शवलेली नाही. त्यांच्या ‘चौपाटीवर’ या कवितेत ते म्हणतात (हो! पु. लं.ची कविता) :

‘चौपाटीच्या सभेत आता

आडवे बांबू करतात दाटी

स्विमिंग पूलशी गर्दी जमते

तरण्यापेक्षा चरण्यासाठी

टिळकांचाही पुतळा आता

सारे काही पाहून थकला

मर्सिडीजचा तारा म्हणतो

बळवंतराव, होरा चुकला’

होरा चुकलेल्या टिळकांचं गाणं पु. लं.नी पेटी वाजवत गायलं नाही! त्यांनी ते जरा सारं सौम्य करत ‘बटाटय़ाच्या चाळी’त ‘रसिका, सरले रामायण, हीच रोजची कथा, हेच या चाळीतील जीवन’ असं काहीसं उपरोधानं म्हणणारं गाणं गायलं. त्यातला सौम्य उपरोध हशा-टाळ्यांच्या कडकडाटात वाहूनही गेला!

काळाच्या ओघात बॉब डिलनचाही वाहून गेला. तो व्यवस्थेला विकला गेला, अशी टीका नित्य होत असते. अली सादसारखा जाणता फ्रेंच समाजशास्त्रज्ञ जेव्हा बॉबच्या इस्रायल-प्रेमावर ताशेरे ओढतो, तेव्हा आपल्यालाही आश्चर्य वाटतं. युद्धविरोधी गीतांपासून इस्रायलच्या युद्धखोर भूमिकेला पाठिंबा देणारा बॉब डिलनचा प्रवास हा तसा स्वाभाविकच. कुठलाच माणूस.. सर्जक माणूस एका खांबावर अडकत नाही. माणसाची धारणा ही एक परिवर्तनीय घटना असते. कधी ते परिवर्तन तुम्हाला रूचतं; कधी नाही. पण माझा युद्धापेक्षाही प्रेमाच्या ताकदीवर अधिक विश्वास आहे. आणि ज्याला प्रेम कळतं, त्यालाच युद्धाचे सारे अन्वयार्थ कळतात असंही मला वाटतं.

बॉब डिलनला युद्ध कळलं होतंच; पण मुळात त्याला प्रेमही सापडलं होतं. त्याच्यासारखंच लोकसंगीत गिटारीनिशी गाणाऱ्या जोन बेझ हिच्यासोबत त्याचा स्नेह तीनेक वर्षांचाच होता. पुढे ते वेगळेही झालेच. पण त्या तीन वर्षांत त्याने तीनशे गाणी रचली. तावावर ताव फाडून लिहावं तसं तो गिटारच्या सुरांवर गीत लिहीत असे. शेजारी असलेली त्याची प्रेयसी जोन बेझ ही ती गीतं कानात प्राण गोळा करून ऐकत असे, लिहून ठेवत असे. स्पर्शाचं प्रेम जसं एक असतं, तसं एक श्रवणाचंही प्रेम असणार.. ध्वनिलहरींतून पसरणारं.. बोलताना जी लय लागते त्यानेच समोरच्यावर गारूड घालणारं! लंडनच्या खोलीत हा बॉब रचतोय गीत आणि प्रेमात काठोकाठ बुडालेली जोन बेझ तिच्या निर्मळ आवाजात गातेय- Love is just a four letter word…. प्रेम म्हणजे केवळ एक शब्द. बस्स! आणि असं म्हणतानाच त्यात अर्थाच्या किती शक्यता आपल्याला जाणवताहेत. एकाच वेळी हे विधान अस्तित्ववादी आहे आणि रोमँटिकही. बॉब डिलनला नोबेल साहित्य पुरस्कार मिळाला आहे- या घटनेसारखंच. आणि तो बॉब डिलन गातोय आताही लासवेगासमध्ये. त्याचे दौरे चालूच आहेत. ‘अस्सल लाकूड, भक्कम गाठ, ताठर कणा, टणक पाठ, वारा खात, गारा खात, बाभुळझाड उभेच आहे..’ असं वसंत बापट त्यांच्या एका कवितेमध्ये लिहिते झाले आहेत. सारखं वाटतंय, चित्रकारासमोर मॉडेल बसलेलं असतं तसा बापटांसमोर त्या ओळी लिहिताना बॉब डिलन बसला होता का? अस्सल, भक्कम, ताठर आणि टणक!

ashudentist@gmail.com