वसई विरार शहरातील एटीएम केंद्र लुटण्याच्या घटना सुरूच आहे. नायगाव पुर्वेला असलेल्या एक्सीस बॅंकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेदहा लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
नायगाव पूर्वेच्या रश्मी स्टारसिटी येथे एक्सीस बॅंकेंचे एटीएम आहे. या एटीएम केंद्राचे सेन्सर बंद करून कटरच्या सहाय्याने यंत्र फोडण्यात आले आणि त्यातील १० लाख ४७ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. चोरांनी केंद्राबाहेरील सीसीटीव्ही काळ्या रंगाचा स्प्रे मारून बंद केला होता. गुरूवारी रात्री ही घटना घडली होती. त्यावेळी पोलीस विसर्जन मिरवणुकीत होते. बॅंकेच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर शुक्रवारी नायगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.
हेही वाचा >>> Video : विरार अर्नाळा येथे खेळताना रस्त्यावर पळत सुटलेल्या मुलाचा अपघात, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
एटीएम केंद्र लुटण्याची ५ वी घटना
जून महिन्यापासून वसई विरार शहरातील एटीएम केंद्र लुटण्याच्या ५ घटना घडल्या आहेत.
३ जून – वसई पूर्वेच्या गोलानी नाका येथील एसबीआय बॅंकेचे एटीएम केंद्र अज्ञात चोरांच्या टोळीने गॅस कटरच्या सहाय्याने फोडून १९ लाखांची रोकड लंपास केली होती.
१७ जुलै- रोजी वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथील हिताची कंपनीच्या एटीएम केंद्रातील यंत्र फोडून १४ लाख रुपयांची रोकड पळवली होती.
२० जुलै – वसई पुर्वेच्या नाईकपाडा येथील हिताची कंपनीचे एटीएम केंद्र आहे. तेथे दोन अज्ञात इसमांनी एटीएम केंद्रात शिरून ते फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र घोक्याची सुचना देणारा अलार्म (भोंगा) वाजल्याने ते निघून गेले. २१ जुलै- वसईतील बाभोळा येथील एसबीआय बॅंकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न