कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : रेल्वे उपनगरीय गाड्या व रेल्वे स्थानकात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. यंदाच्या वर्षात वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत एक हजार ९८ गुन्हे घडले आहेत. त्यातील ९८० गुन्हे हे मोबाइल चोरीचे आहेत.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड ते वैतरणा अशा सात रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. मागील काही वर्षांपासून या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा फायदा भुरट्या चोरांनी घेतला आहे. मोबाइल चोरी, पाकीट मारी, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे असे विविध प्रकारचे गुन्हे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात घडत आहेत.

हेही वाचा >>> वर्सोवा-विरार सागरी सेतू : मच्छिमारांचे मने वळविण्यासाठी एमएमआरडीएचे मत्स्य व्यवसाय विभागाला साकडे

विशेषत: विरार, नालासोपारा, नायगाव, वसई या स्थानकांत सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असते. यंदाच्या वर्षात मीरारोड ते वैतरणा यादरम्यान १०९८ इतके गुन्हे घडले आहेत, त्यापैकी ३८७ गुन्हे उघडकीस आले आहेत. हे प्रमाण ३५ टक्के असून उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १५० ने गुन्ह्यात वाढ आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी गस्त घालणे, संशयितांची तपासणी, जनजागृती मोहिमा असे उपक्रम राबविले जात आहेत. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली आहे. पोलीस रेल्वे स्थानकात गस्त जरी घालत असले तरी अनेक घटना पटकन नजरेस पडत नाहीत. त्यामुळे रेल्वे स्थानकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे अधिकच फायदेशीर ठरत आहे. बहुतांश गुन्हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघड झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

रेल्वेत घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण हे मागील वर्षांपासून वाढले आहे. ते कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत. प्रवाशांनीसुद्धा काळजीपूर्वक प्रवास करावा किंवा प्रवासादरम्यान आक्षेपार्ह काही आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करावा.

– सचिन इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस ठाणे.

मोबाइल चोरी अधिक

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून मोबाइल लंपास करण्याच्या घटना अधिकच वाढू लागल्या आहेत. मोठ्या संख्येने प्रवासी हे मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी ९८० गुन्हे मोबाइल चोरीला गेल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे

गुन्ह्यांचा तपशील

वर्ष       गुन्हे       उघड गुन्हे

२०२३ –  १०९८                ३८७

२०२२ –  ९५३               ३९४